Back to Top
Previous सकळेश मादरस वचन हडपद अप्पण्णा वचन Next

सगरद बोम्मण्णा , सत्तिगे कायकचा मारय्या , सिद्धान्ति वीरसंगय्या , सुंकद बंकण्णा , सोडळ बाचरस वचन

सूचीत परत (index)
वाचनाची निवड करा:

निवडलेल्या वचना
*

सगरद बोम्मण्णा


तुमच्या दर्शनाने डोळ्यांचा विटाळ गेला.
तुमच्या आठवणीने मनाचा विटाळ गेला.
तुमच्या शाश्वत ज्ञानाने
सर्व स्पर्शाचा भ्रम मिटून गेला.
असे अनेक भेदभाव जे होते,
ते तुमच्या कारुण्यातच विलीन झाले.
सगरच्या बोम्मचा मालक तनुमन संगमेश्वरा, / 2094
शरीरातील गुणांसमवेत राहून
इंद्रियांच्या मनासारखे केले नाही तर,
शरीराची संगत बरी.
इंद्रियांच्या संगतीत राहून,
इंद्रियांचा उपयोग कसा करावा हे ओळखले तर,
इंद्रियांची संगत बरी.
अवगुणांचा नाश करून,
अवगुणात राहून, आपला मृत्यू ओळखला तर,
तो मृत्यू चांगला.
सगरच्या बोम्मचा मालक तनुमन
संगमेश्वरलिंगाचे ठिकाणी समरस झाला. / 2095
भिंतीच्या आड उभे राहून युद्ध करणा-यांना कसली भीती ?
फरशीची जमीन असतानाही,
डोळे असलेल्या पांगळ्याला कसली भीती ?
सगळ्या सुखदु:खात साथ देण्यासाठी
तू पुढे आणि मी मागे असताना मला कसली भीती ?
नोकराचा अपमान हा राजाचा अपमान.
सगरच्या बोम्मचा मालक तनुमन
संगमेश्वरलिंगा, तू असताना मला कसली भीती ? / 2096
शरीरातल्या शरीरात समरसलेला कोण ?
मनातल्या आठवणीत आठवून घेणारा कोण ?
तोंडातल्या तोंडाने जेवणारा कोण ?
डोळ्यातल्या डोळ्यांनी पाहणारा कोण ?
मी आणि तू यात, काय फरक सांग,
सगरच्या बोम्मचा मालक तनुमन संगमेश्वरा ? / 2097
फूल खुडता येईल;
फुलाचा सुगंध कसा खुडता येईल ?
बोलता येईल;
बोलण्यातल्या फरकाचा भाव कुणी पाहिला आहे ?
ही नीतीची उपयुक्तता.
निहित कर्तव्य करत असताना भाव शुद्ध असला पाहिजे.
समजून घेऊन बोलताना,
बोलण्याची पद्धत आपण पाळली पाहिजे.
ते कूटस्थ आहे, सगरच्या बोम्मचा मालक तनुमन संगमेश्वरा. / 2098

सत्तिगे कायकचा मारय्या


उदयसमयी उत्पत्ती पावून, मध्यान्हसमयी स्थिती होऊन,
अस्तमानसमयी देहाचा लय झाला.
निश्चिंतपणे राहून कष्ट सोडवण्याचा मार्ग दाखव.
दिवसा तहान-भूक, रात्री विषयांची भूक,
अशा शरीरात शिरून,
पंचभूतात्मक देह झालात ऐघंटेश्वरलिंगा. / 2099
कायक करत असताना,
चोरासारखे बायका पोरांसाठी म्हणून
टोपली भरून ठेवून घेऊन,
ते व्याजाने वा उसने दिल्यास,
ती गुरू, पर, चर या तिघांची वस्तू नव्हे.
तो शिवभक्त आहे म्हणून,
त्याच्या घरात जाऊन जेवण केले तर,
कुत्र्याने मांस खाऊन झाल्यावर,
उरलेले कोल्ह्याने खाल्ल्यासारखे,
ऐघटेश्वरलिंगच साक्ष आहे. / 2100

सिद्धान्ति वीरसंगय्या


पाण्यापासून झालेला मोती
शांत जलाशयात टाकला तर,
आपले पूर्वीचे पाणी आले
म्हणून ते घनीभूत होत नाही,
हा मोती पाणी होत नाही.
मोती पाण्यात अव्यक्त रूपात आहे.
या दोहोतला फरक कळला तर,
द्वैत आणि अद्वैत यातला फरक कळला म्हणेन.
असे न करता, त्याच्या हार-जीतसाठी झगडणा-या
पाषाणहृदयींना गोळकाकार विश्वविरहित लिंग
कसे प्रसन्न होईल? / 2101

सुंकद बंकण्णा


अंगात राहून स्थिरचित्त हो.
भावात राहून भवच्छेदक हो.
सुखात राहून प्राणनिग्रह कर.
सगळ्या भोगात राहून भोगविरक्त हो
मन श्रेष्ठतमाठायी लय करून
बंकेश्वरलिंगाकडे बघत न बघितल्यासारखे रहा. / 2102
अन्नावरची जशी आवड,
निद्रेची जशी ओढ,
स्त्रियांबद्दल जसे आकर्षण,
तसे लिंगाबद्दल असावे.
मोह शिवलिंगात स्थिर करून टाकला की,
आमचा चेन्नबंकनाथदेव प्रसन्न होतो. / 2103

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

*
Previous सकळेश मादरस वचन हडपद अप्पण्णा वचन Next