Previous लिंगायतमध्ये शरण संगाचे (सत्संगाचे) महत्व लिंगायत विश्व संदेश Next

लिंगायतमध्ये आदर्श दांपत्य

सूचीत परत (index)

लिंगायतमध्ये आदर्श दांपत्य

सती पती दोघे एकदृष्टी होओनी
करतील त्यास सार्थ क्रिया म्हणावे,
तेच कूडलसंगमदेवाचे सामरस्य./ 378 [1]

दांभिक गुरूसी दांभिक शिष्य,
दिखाऊ लिंग, ढोंगी जंगम,
औपचारिक प्रसाद प्राप्त करून,
गुरूसी शिष्य भवाचा दास झाल्याने,
आंधळ्याचा हात आंधळ्याने धरल्यापरी
दोघेही पथभ्रष्ट झाले पहा, गुहेश्वरा./ 471 [1]

सतीपतीनी मिळून केलेली भक्ती शिवाला मान्य होते.
सतीपतीनी एक न होता केलेली भक्ती म्हणजे,
अमृतात विष घातल्यासम पहा, रामनाथ. /1771[1]

पत्नि म्हणता येपार नाही मज बसवेशांची,
पति म्हणता येणार नाही बसवेश माझे
उभय संबंध तोडून झाले मी शिशु बसवय्यांची
बसवेश झाले मम शिशु
प्रथम पुरातनांच्या साक्षिने
पार करूनी कसोटी संगय्यांची,
सामावले मी बसवेशांच्यात

सतिपति एक झालेली भक्ती
अससी मंगलमय शिवास
सतिपति एक न झालेली भक्ती
अमृतात वीष कालविण्या परी.

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायतमध्ये शरण संगाचे (सत्संगाचे) महत्व लिंगायत विश्व संदेश Next