Previous लिंगायत धर्मगुरु गुरु बसव बसवेश्वरच इष्टलिंगाचे जनक Next

वचन साहित्याच लिंगायत धर्माची संहिता

सूचीत परत (index)

वचन साहित्याच लिंगायत धर्माची संहिता

आद्यांचे वचन परिसासम असे पहा :
तेच सदाशिवलिंग, असा विश्वास ठेवावा,
विश्वास ठेवताच तू विजयी पहा.
अधरास कडू, उदरास गोड,
कुडलसंगाच्या शरणांचे वचन
कडूलिंब चाखल्यागत. /39 [1]

दुधाच्या प्रवाहात गुळाचा चिखल, साखरेची रेती,
शर्करीनच्या फेसाळ लाटांसम आहेत आद्यांची वचने.
दुसरी विहीर खोदून, खारे पाणी पिणा-याच्या कर्मासारखी,
कुडलसंगमदेवा, झाली असे माझी मती. / 404 [1]

पाताळातील शुद्ध जल काढता येईल का,
दोराविना अथवा सोपानांच्या आधाराविना ?
शब्दसोपान बांधुनी चालविले शरणांनी,
देवलोकाचा हाच मार्ग पहा.
मर्त्य मानवाच्या मनाची मलिनता जावी म्हणून,
गीतबोलरूपी ज्योती प्रकाशित करून दिली,
कूडल चेन्नसंगय्याच्या शरणगणांनी. / 833 [1]

आमच्या वचनाच्या एका पारायणाला,
व्यासाचे एक पुराण समबळ नव्हे.
आमच्या वचनाच्या एकशे आठ वाचनाला
शतरुद्रीय होम समबळ नव्हे.
आमच्या वचनाच्या सहस्त्र पारायणाला
लक्ष गायत्रीजप समबळ नव्हे,
कपिलसिद्ध मल्लिकार्जुना. / 969 [1]

या वचनाच्या अनुभावामधील अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणांमध्ये असे पहा.
या वचनाच्या अनुभावामध्ये नसलेला अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणांमध्येही नसे पहा.
या वचनाच्या अनुभावाचा अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणांनाही अगम्य पहा.
या वचनाच्या अनुभावाचा अर्थ
सर्व वेदागमशास्त्रपुराणातीत पहा,
अप्रमाण कुडलसंगमदेवा. / 2441[1]

प्रमंथाची वचने परीसा परी पहा
सदाशिव हे लिंग अत्यंत विश्वासाचे,
ते विश्वशासल्यास तुजा विजय निश्चित
जिव्हेला कडु, उदराला गोड पहा
कूडलसंगय्याच्या शरणांची वचने निंब चाखणयापरी. (ब.व.973)

दूघाच्या प्रवाहास गुळाचा चिखल,
साखरेची वाळू अमृताच्या फेसाळ लाटा,
अशी प्रमथांची वचने असता, दुसरी विहीर काडून
खारट पाणी पिण्यापरी झाली माझा मती, कूडलसंगमदेव,
तुमजी वचने न ऐकता, अन्य पुराणे ऐकून नाश झाले

खीळ नसलेली बैलगाडि न पाडता पळविणे शक्य?
खीळच बैलगाडीस आधार,
हा मस्तिचा दर्प चढलेल्या देहाच्या गाडीस
शिवशरणांच्या उपदेशांचे बोलच
त्याला खीळ पहा! रामनाथ

हत्ती दिलास तरी नको, ऐश्वर्य दिलेस तरी नको,
मोठे राज्य दिलेस तरी नको,
तुमच्या शरणांच्या उपदेशच्या गोष्टि
आधी घटका जरि ऐकावयास मिळाल्यास
तुमचे नित्य दर्शन झाल्याचे भाग्य
समजेन रामनाथ.

खोल विहिरीतील पाणी दोरीविना
पायत्या साहाय्याविना काढणे शक्य?
शब्दरूपी पायात्या बांधून चालविले आमच्या
पुरातनांनी देव लोकाची वाट दाविली.
मानवांच्या मनाची मलीनता नष्ट करण्या,
वचनशास्त्र नावाची ज्योत उजाळून दिली,
कूडलचेन्नसंगय्याच्या शरणांनी

वेदांना अभेद्य आशा परिशिवास
भेद्य पाहिले पाहा शरणांनी
शास्त्रांना असाध्य आशा पर शिवास
साधून पाहिले पाहा शरणांनी
आगम इतिहासाच्या तर्कांना आशक्य आशा
परशिवास शोधून पाहिले पाहा शरणांनी
अगम्य अप्रमाण आशा परशिवास प्रमाणून
पाहून आत शिरून एकरूप झाले पाहा
आमच्या अखंडेश्वराचे शरण

आमच्या वचनाच्या एका पारायणाची बरोबरी
व्यासाचे एक पूराण करु शकत नाही
आमच्या वचनाच्या 108 अध्ययानाची बरोबरी
शतरुद्र याग करू शकत नाही
आमच्या वचनाच्या हजार पारायणाची बरोबरी
गायत्रि लक्ष जप करू शकत नाही
कपिलसिद्धमल्लिकार्जुन

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायत धर्मगुरु गुरु बसव बसवेश्वरच इष्टलिंगाचे जनक Next