Previous लिंगायतमध्ये वार, तिथि, मुहूर्त नक्षत्र पाहू नयेत लिंगायतमध्ये स्थावर लिंग, अन्य दैवांची पूजा करू नये Next

लिंगायतमध्ये तिर्थ क्षेत्रभ्रमंती करूनही नच लाभे चंचल मन चित्तात स्थिर केल्यास

सूचीत परत (index)
*

लिंगायतमध्ये दूरदूरपर्यंत क्षेत्रभ्रमंती करूनही नच लाभे. चंचल मन चित्तात स्थिर केल्यास,

मन परिशुद्ध होईतो, तनू नग्न असुनी काय ?
भाव निर्भाव होईतो, शिरमुंडन करुनी काय ?
इंद्रियवृत्ती निग्रहपूर्वक भस्मसात करतो,
भस्मधारणा करुनी काय ?
वैराग्याच्या अशा सोंगाढोंगाला
गुहेश्वरा, तव साक्षीने ‘छि:' म्हणे मी./ 530 [1]

स्नान करून देवपूजा करतो म्हणणा-या
संदेही मानवा तू ऐक हो,
माशाला स्नान घडतेच ना ? मगरीला स्नान घडतेच ना ?
आपण स्नान केले तरी मन शुचिर्भूत नसता,
हा ढोंगीपणा आवडेल का आमच्या गुहेश्वराला ? /593 [1]

दूरदूरपर्यंत क्षेत्रभ्रमंती करूनही नच लाभे.
गंगातीर्थी लक्ष स्नान करूनही नच लाभे.
मेरुगिरीच्या शिखरावरून सादवूनही नच लाभे.
नित्य व्रत-नेमांनी तनू शिणवूनही नच लाभे.
नित्य विषयस्मरणात रमणारे,
विषयांमागे क्षणोक्षणी धावणारे,
चंचल मन चित्तात स्थिर केल्यास,
गुहेश्वरलिंग केवळ परमज्ञानप्रकाश. / 625 [1]

दूध हाती धरून लोणी शोधा जाल का?
लिंग हाती धरून पुण्याक्षेत्राला जाल का?,
लिंगसंग करणात्यास अन्य देवतांची भचने कशाला?
आशा पातकास, अघोर नरक चुकणार नाही,
कूडलचन्नसंगमदेवा

बांधलेले लिंग कमी लेखून
पर्वताचे लिंग महान म्हणून पुजिणात्या
मूर्ख अज्ञानीना पाहाताच
डाव्यायातील वहाण काडून मारावी
म्हणाला अमचा अंबिगर चौडय्या निजशरण.

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous लिंगायतमध्ये वार, तिथि, मुहूर्त नक्षत्र पाहू नयेत लिंगायतमध्ये स्थावर लिंग, अन्य दैवांची पूजा करू नये Next