Previous अंगावरील लिंग अलग होवू नये लिंगायतमध्ये पंच सूतक पाळू नयेत Next

भक्तांनी भवींचा संग करून नये

सूचीत परत (index)
भवीचा संग सोडून भक्त झाल्यावर
भक्तास भविसंग अघोर नरक
शरण सति लिंग पति झाल्यावर
शरणास सतिसंग अघोर नरक
चन्नमल्लिकार्जुना,
प्राणगुण नाश न झालेल्यांचा संग नाशास कारण

भविपण घालवून भक्त झाल्यावर,
भवि आप्तसंबंधी म्हणून जावून राहू नये
आप्त म्हणून त्यांच्या इच्छेप्रमाणे
भविबरोबर सहभोजन केल्यास
वराहाच्या तोंडाचा घास
श्वानाने ओढून खाल्यापरी पाहा ! रामनाथ

शरण संबंध नीट जाणल्यानंतर
परत भविच्यात मिसळू नये, मिसळल्यास ती
ब्रह्महत्या प्राणहत्या वैतरणि, दुर्गति,
पंचमहापातकापेक्षा अधिक पाहा
दूराशेने भविसह जेवल्यास तो भक्त नव्हे
कूडलसंगमदेव

भाऊ, बहिण, बाप एकाच गोत्राचे झाले तरी काय?
लिंग साहित्य नसलेले माझे म्हणणार नाही
आप्त भक्ति घोर नरकासम पाहा कूडलसंगमदेवा

भविपणास वीट योवून भक्त झाल्यावर,
भवींचा संग नाशास कारण समजावे
भविंचा संग कारणारे
कूडलचन्नसंगय्या ते इकडचे पण नव्हेत तिकडचे पण नव्हेत
*
Previous अंगावरील लिंग अलग होवू नये लिंगायतमध्ये पंच सूतक पाळू नयेत Next