Previous उप्परगुडिय सोमिदेवय्या उरिलिंगपेद्दी Next

उरिलिंगदेव

पूर्ण नाव: उरिलिंगदेव
वचनांकित : उरिलिंगदेव
कायक (काम): विद्वान (पंडित)


अंतरंगात सामावून बहिरंगात दाखवितो,
नयनातील मूर्ती मन:पटलावर उमटते,
माझ्या ब्रह्मरंध्रात दिसणारी परंज्योती उरिलिंगदेवा तुम्हीच. / 1532[1]

का हा 'शरण सती, लिंग पती' तत्त्वाचा शरण होता. अवसे कंधार हे त्याचे गाव. याचा काळ इ.स. ११६० असून पुलिगेरेच्या महालिंगदेवाच्या गुरुपरंपरेतील शिवलेक मंचण्णाचा हा शिष्य होता. याची लिंगनिष्ठा पाहण्यासाठी विरोधकांनी त्याच्या झोपडीला आग लावली असता विचलित न होता उरिलिंगदेव आपल्या लिंगपूजेत मग्न राहतो. त्याची निष्ठा पाहून ते विरोधक शरण जातात. श्रेष्ठ विद्वान व दलित वचनकार उरिलिंगपेद्दी त्याचा शिष्य होता.

प्रियकराच्या रूपाने डोळे भरून गेले,
प्रियकराच्या शब्दांनी कान भरून गेले,
प्रियकराच्या सुगंधाने नाक भरून गेले,
प्रियकराच्या चुंबनाने जीभ तृप्त झाली,
प्रियकराच्या आलिंगनाने माझे अंतरंग,
बहिरंग प्रेममय झाले, मन भारावून गेले.
उरिलिंगदेवाच्या मिलनाने सुखी झालो. / 1539[1]

आपले नावच अंकित करून त्याने लिहिलेली ४८ वचने उपलब्ध आहेत. सर्व वचने लिंगपरवशतेने भरलेली असून सरळ भाषा, मधुर भाव व आत्मीय शैली या वैशिष्ट्यांनी युक्त आहेत.

देहाला देह होऊन, प्राणाला प्राण होऊन,
मनाला मन होऊन समागम करतो ग आई, पहा !
प्रियकराच्या मिलनाचे सुख वर्णन कसे करू ? महासुखच !
प्रियकराचे दृष्टिमिलन उपमातीत, महाघन !
मी-तू असा भेदही सांगता येऊ नये,
एवढा एकरूप झालो, उरिलिंगदेवा. / 1538[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous उप्परगुडिय सोमिदेवय्या उरिलिंगपेद्दी Next