Previous आय्दक्कि लक्कम्मा उप्परगुडिय सोमिदेवय्या Next

उग्घडिसुव गबिदेवय्या

पूर्ण नाव: उग्घडिसुव गबिदेवय्या
वचनांकित : कूडल संगमदेवरल्लि बसवण्ण साक्षियागी


ज्ञाना ये, माये जा म्हणुनी पाठवीत आहे.
ज्ञाना ये, अज्ञाना जा म्हणुनी पाठवीत आहे.
निराकारा ये, साकारा जा म्हणुनी पाठवीत आहे.
निष्प्रपंचा ये, संसारीप्रपंचा जा म्हणुनी पाठवीत आहे.
कुडलसंगमदेवाच्या बसवण्णांना जाणणा-यांना आत पाठवीत,
न जाणणा-यांना मी बाहेर थांबवीत आहे. / 1528[1]

श्री बसवेश्वरांच्या महामनेचा द्वारपाल म्हणून कायक करणाऱ्या या शरणाचा काळ इ. स. ११६०. 'कूडल संगमदेवरल्लि बसवण्ण साक्षियागी' या अंकिताने त्याने लिहिलेली दहा वचने उपलब्ध असून आपल्या उद्योगाची भाषा वापरून अगदी सुरसपणे व सरळ भाषेत लिहिलेल्या या वचनांमध्ये विनोद, कायकनिष्ठा व बसवभक्ती व्यक्त झाली आहे.

भावभ्रमितांनो येऊ नका, ज्ञानहीन लोकांनो लवकर जा.
त्रिविधमलात भांडण-कलह करणा-यांनो दूर थांबा.
स्वानुभावनिरत लोकांनी यावे, परब्रह्मस्वरूपी लोकांनी यावे,
एकलिंग निष्ठावंतांनी यावे, दृढश्रद्धावंतांनी यावे,
सन्मार्ग, सत्क्रियावंतांनी यावे, असे करण्याचे कायक
कुडलसंगमदेवाच्या बसवण्णांनी मला दिले. / 1529[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous आय्दक्कि लक्कम्मा उप्परगुडिय सोमिदेवय्या Next