Previous आय्दक्कि मारय्या उग्घडिसुव गबिदेवय्या Next

आय्दक्कि लक्कम्मा

पूर्ण नाव: आय्दक्कि लक्कम्मा
वचनांकित : मारय्यप्रिय अमरेश्वरलिंग


दारिद्रय देहासाठी; मनासी दारिद्र्य कोठून ?
तीक्ष्णता असता छिन्नीच्या अग्रावरी,
बलिष्ठ म्हणती तो पहाड भंगतोच ना ?
थोर शिवभक्तांना दारिद्र्य नाही,
सत्यवंतांना दुष्कर्म नाही.
मारय्यप्रिय अमरेश्वरलिंग असेतो -
मारय्या, मज कोणाची पर्वा नाही. / 1291[1]

आशा वसते राजाठायी,
असते का राया ती शिवभक्तांठायी ?
रोष वसतो यमदूतांठायी;
असतो का राया तो अजातांठायी ?
इतक्या तांदळाची आशा राया, तुम्हांस कशापायी ?
ईश्वरासी नावडे राया.
मारय्यप्रिय अमरेश्वरलिंगापासून
हे दुरावणे असे हो मारय्या. / 1293[1]

आय्दक्कि मारय्याची पत्नी. ही देखील अमरेश्वरचीच. पतिपत्नी बसवेश्वरांची कीर्ती ऐकून कल्याणला जाऊन तांदूळ वेचण्याचा कायक करतात. तिचा काळही इ. स. ११६० असून इष्टदैवत अमरेश्वर होते. 'मारय्यप्रिय अमरेश्वरलिंग' या अंकिताने तिने लिहिलेली २५ वचने मिळाली आहेत. कायक व दासोहाची महती त्यांमध्ये वर्णिली आहे. 'शून्यसंपादना'मध्ये या दंपतीच्या कायकनिष्ठेची कथा रोचकपणे आली आहे.

कायक म्हणून स्वार्थाने हडपलेल्या
वारसा-धनातून भक्त दासोह करू शकतील ?
मन स्थिर राखून, एकाग्र मनाने तो करून,
मन द्विधा होण्यापूर्वीच
मारय्यप्रिय अमरेश्वरलिंगासी अर्पिले पाहिजे हो मारय्या. / 1296[1]

जयाचे मन शुद्ध नसे, तयासी द्रव्याचा अभाव भासे.
शुद्धचित्ते कायकमग्न सद्भक्तास
पहावे तिथे लक्ष्मीचा आपसुख वास;
मारय्यप्रिय अमरेश्वरलिंगाच्या सेवेत
सतत असता निरत. / 1297[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous आय्दक्कि मारय्या उग्घडिसुव गबिदेवय्या Next