Previous आनंदय्या आय्दक्कि लक्कम्मा Next

आय्दक्कि मारय्या

पूर्ण नाव: आय्दक्कि मारय्या
वचनांकित : अमरेश्वरलिंग


कायकात गुंतले असता गुरुदर्शनाचे विस्मरण व्हावे,
लिंगपूजेचे विस्मरण व्हावे,
जंगम समोर असला, तरी पर्वा करू नये.
कायक हेच कैलास असल्याने अमरेश्वरलिंग कायकात आहे. / 1520[1]

नेम, व्रत करतो म्हणून, कायक न करता भक्ताघरी जाऊन,
पैसा, सुवर्ण मागणे सद्भक्ताला कमीपणा नाही का ?
हा गुण अमरेश्वरलिंगापासून दूर करतो. / 1524[1]

हा रायचूर जिल्ह्यातील लिंगसूर तालुक्यामधील अमरेश्वर गावचा रहिवासी. त्याची पत्नी लक्कम्मा. अमरेश्वर हे त्याचे आराध्य दैवत होय. त्याचा काळ इ. स. ११६०. पत्नीसह कल्याणला आल्यानंतर अंगणात पडलेले तांदूळ वेचण्याचा कायक स्वीकारतो. कायक-दासोहनिष्ठ शरणांमध्ये तो अग्रेसर होता. 'कायकच कैलास' हे त्याच्या जीवनाचे ध्येयवाक्य होते. 'अमरेश्वरलिंग' अंकिताने त्याने लिहिलेली ३२ वचने उपलब्ध आहेत. त्यांमध्ये कायक तत्त्वाबद्दल मुख्यत्वे विचार आला आहे.

भक्ताला गरीबी असते का ? सत्यवंताला कर्म असते का ?
चित्त शुद्ध ठेवून कायकसेवा करणा-या भक्ताला
मर्त्यलोक, कैलास असे असते का ?
तो राहत असलेले स्थळच सुक्षेत्र असते.
त्याचे अंगच अमरेश्वरलिंगाचे संगसुख आहे. / 1526[1]

ज्ञाना ये, माये जा म्हणुनी पाठवीत आहे.
ज्ञाना ये, अज्ञाना जा म्हणुनी पाठवीत आहे.
निराकारा ये, साकारा जा म्हणुनी पाठवीत आहे.
निष्प्रपंचा ये, संसारीप्रपंचा जा म्हणुनी पाठवीत आहे.
कुडलसंगमदेवाच्या बसवण्णांना जाणणा-यांना आत पाठवीत,
न जाणणा-यांना मी बाहेर थांबवीत आहे. / 1528[1]

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous आनंदय्या आय्दक्कि लक्कम्मा Next