Previous अक्कम्मा (काळ इ. स. सुमारे ११६०) अग्घवणि हंपय्या Next

अंगसोंकिन लिंगतंदे (काळ इ. स. सुमारे ११६०)

पूर्ण नाव: अंगसोंकिन लिंगतंदे
वचनांकित : भोगबंकेश्वरलिंग

वृक्षातील अग्नी आपणहून पेटेल का ?
पाषाणातील दीप्ती, तो प्रकाश आपणहून प्रकाशील का ?
त्याप्रमाणे कुटिलाची भक्ती, क्षुद्राची विरक्ती असे.
मंथनाविना सत्य-असत्य म्हणू नये.
प्रत्यक्ष पडताळल्याविना सत्य-असत्य म्हणून स्वीकारू नये.
गुरू असो, लिंग असो, जंगम असो,
त्याची भक्ती-विरक्ती प्रत्यक्ष पडताळून पहावी,
पडताळून न पाहणा-यांची भक्ती, विरक्ती म्हणजे
छिद्र पडलेल्या घड्यातील पाणी,
सूत्रहीन बाहुली, दृष्टिहीन नेत्र.
उपटलेल्या रोपाला जलसिंचन करतील का ?
म्हणून कोणत्याही क्रियेत भावशुद्ध आचरण करावे.
भोगबंकेश्वरलिंगसंगात शरण सुखी/1375 [1]

याचा काळही इ.स. ११६० असून फक्त अकरा वचने उपलब्ध आहेत. वचनांकित 'भोगबंकेश्वरलिंग' असून वचने अधिकतर तात्त्विक स्वरूपाची आहेत. त्यात आत्मा, आत्मज्ञान यांना लागणारे सद्गुण व दुर्गुण, त्यांचे स्वरूप, साकार-निराकार एक होण्याबद्दलचा वाद, भरितार्पणाची रीत इत्यादी गोष्टींचे प्रतिपादन आहे.

References

[1] Vachanas selected from the book "VACHANA" (Edited in Kannada Dr. M. M. Kalaburgi), Marathi Version Translation by: Shri Shankar M. Patil, Smt. Savita S. Naadkatti. ISBN: 978-93-81457-10-8, 2012, Pub: Basava Samithi, Basava Bhavana Benguluru 560001.

सूचीत परत (index)
*
Previous अक्कम्मा (काळ इ. स. सुमारे ११६०) अग्घवणि हंपय्या Next