Previous लिंगाचार लिंगायत तत्व दर्शन Next

‘इष्टलिंग’ म्हणजे काय ?

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

‘इष्टलिंग’ म्हणजे काय ?

कर्नाटक राज्यात, फार मोठ्या संख्येने असणारा, शेजारी राज्ये, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, तामीळनाडू, या राज्यात, ब-याच संख्येने, व इतर राज्यात आणि राष्ट्रात असणारे ६ कोटी लिंगायाताचे मुख्य चिन्ह 'इष्टलिंग' आहे ! गुरुंच्याकडून, दिक्षाद्वारे, घेऊन, अंगावर सदैव धारण करुन, पूजले जाणारे हे गोलाकार व काळ्या वर्णाचे चिन्ह आहे. अत्यंत चमकणारे गोलाकाराच्या या चिन्हाला 'इष्टलिंग' हे नांव का दिले असावे ?

भारतीय परंपरेत अती मुख्य वाहीनी हिंदू संस्कृतीत 'इष्ट दैव' हे पद वापरण्यात येते. ती इष्ट दैवते वेगवेगळी असून, ती व भक्तांचे संबंध वैयक्तीक असू शकतात ! एकेकांचे इष्ट दैवते त्यांचे इष्टनिष्ट आधारावर एकाच घरात वेगवेगळे राहू शकतात ! अनेक इष्ट दैवतांच्या यातना टाळण्याच्या उद्देशाने जन्मलेल्या या चिन्हाला 'इष्टलिंग' हे सूक्त नांव आहे.

दुसरे म्हणजे ही 'अवडंबराची' वस्तू नसून, मनापासून साधकाने आपले आत्मदर्शन व स्वरुप साक्षात्कार साध्य करण्याचे साधन असल्यामुळे, याला 'इष्टलिंग' म्हंटले जाते ! अनिष्ट विचार आपल्या अंतरंगात अथवा बहिरंगात असतात. घटात अथवा माटात असतात, समाजात असतात त्याचे निर्मूलन करुन, मनोबल, बुध्दीबळ व आत्मबल वाढवणारे जे आहे तेच इष्टलिंग,

पारलौकीक उद्देश ठेवून आत्मानुभूतीचे मुख्य ध्येय ठेवून अर्चना करणारे भक्त फारच थोडे. बरेच लोक लौकीक कामना, इष्टार्थ सिध्दी साठीच पूजा करतात. त्यामुळे मागणा-यांच्या इष्टार्थ सिध्दी पूर्ण करण्यास 'इष्टलिंग' समर्थ आहे.

१) मागेल ते देणारे आमचे लिंगदेव

२) गाईन तर माझ्या मालकाला गाईन,
मागेन तर माझ्या मालकाला मागेन,
म्हणून बसवेश्वरांनी सांगितले या दृष्टीने.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous लिंगाचार लिंगायत तत्व दर्शन Next