Previous (लिंग) इष्टलिंग पादोदक-प्रसाद Next

विभूती-रूद्राक्ष-मंत्र

*

आपल्या शरीरावरील वस्त्र थंडी, ऊन पावसापासून रक्षण केल्याप्रमाणे अष्टावरण हा दुर्व्यसन, दर्गुण, दुष्टकामना यापासून रक्षण करतो. चुलीतील विस्तव विझू नये म्हणून त्यावर राख झाकल्याप्रमाणे अंतरातील अध्यात्मिक तेज बाह्य विषय वासनेच्या वा-याने विझवू न देता तसेच ठेवायचे असल्यास विभूती, भस्मरूपी राखेने झाकावे महायोगीनी अक्कमहादेवी म्हणते "मी सर्वांगाला लावलेले हे भस्म कामाल जाळलेले आहे" अंतरातील दुष्ट कामना, दुर्गुण जाळल्ला संकेतच भस्म होय. भस्म धारण केलेल्या व्यक्तीची मुखमद्रा सात्विक तेजाने उजळत असते.

अक्ष म्हणजे डोळा, रूद्राक्ष म्हणजे दैवी दृष्टी. कुद्दष्टी राऊन सम्यक दृष्टी, समदृष्टी असलेली संकेत म्हणून रूद्राक्ष धारण करावे. म्हणजे त्याची दृष्टी दिव्य दृष्टी बनते. विभूती आणि रूद्राक्ष हे पूज्य वस्तूला प्रसन्न करण्याची दोन साधने असून, मंत्र हे तिसरे साधन होय. ज्याचे मनन केल्याने भवसागर पार करण्यास सहाय्यक होतो तोच मंत्र होय 'ॐ नम: शिवाय’ या षडाक्षरी मंत्रात 'ॐ श्री गुरूबसव लिंगायनम:" या द्वादश मंत्रात अचलश्रद्धा ठेऊन नित्य नियमाने जो पठण करतो तोच लिंगायत. लिंगायत धर्माचे आणि गुरूबसवेश्वरानी परंपरागत आलेला षडक्षरी मंत्र हा पवित्र मानून पठण केला पण ते स्वत: मंत्रपुरूष असल्याने त्यांचे नावच मंत्ररूप आहे. बसवद्वादश मंत्र लिंगायातांचा श्रेष्ठ गुरूमंत्र आहे षडाक्षरी मंत्र हा देवमंत्र आहे.

टीप: मी इथे एक सल्ला देऊ इच्छिते. प्रार्थनामधे तीन प्रकार आहेत. वैयक्तिक प्रार्थना, सामूहिक प्रार्थना आणि राष्ट्रीय प्रार्थना. नित्य नियमाने लिंगपूजा करणे ही वैयक्तिक प्रार्थना, राष्ट्रीय सभा सभारंभात राष्ट्रीय प्रार्थना आपण करतो पण लिंगायत समाजात सामूहायीक प्रार्थना व्यवस्थितपणे करण्याची पद्दत प्रचारात नाही. बसवकल्याण मधील अनुभव मंटप ही अध्यात्मिक संस्था होती. तेथे भजन प्रार्थना करण्याचा परिपाठ असला पाहिजे. त्याचप्रमाणे आजच्या लिंगायत समाजात बसव मंटपाचे निर्माण होऊन सामूहीक प्रार्थन, भजन चालल्यासच हा धर्म व समाज टिकून राहील. क्रिस्चन व इस्लां समाज सुसंघटित असल्याचे प्रमुख आणि प्रबल कारण म्हण्जे सामूहिक प्राथनाच होय. याप्रमाणे लिंगायतांनी आपली वैयक्तिक पूजा करतेवेळी “ॐ लिंगाय नम:" या मंत्राचा उपयोग करून आठवातून एकदा सामूहिकपणे एका ठिकाणी जमून "ॐ श्री गुरू बसवलिंगाय नम:" या गुरू मंत्राचा जप केल्यास फारच श्रेयस्कर होईल.

Reference: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

सूचीत परत (index)
*
Previous (लिंग) इष्टलिंग पादोदक-प्रसाद Next