Previous सर्वांग लिंगत्व इष्टलिंग इवलासा झाला परमात्मा Next

सामाधी लिंगपूजा

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

सामाधी लिंगपूजा

स्थावरलिंग पूजा, मुर्तापूजा, झाडझुपांची पूजा, शुद्र दैवतांची पूजा, करणे बसव तत्वाच्या विरुध्द आहे. म्हणून आतापर्यात सांगितलेगेले आहे. आता, शरण संस्कृती अनुसार, समाधीची रचना व समाधी लिंगपूजा याबाबत आपण पाहुया.

लिंगायत धर्मानुसार, लिंगैक्य झाल्यावर सर्वांना मीत पुरतात. विशेष साधना, पूजा व तप केलेल्या ज्ञानी, महात्मा, भूमीत समाधी करुन पुन्हा त्यावर थडगे बांधतात. त्या थडग्यांवर विभूती ठेवून त्याला लिंगाकाराचे कवच करुन, समाधीलिंग बनवतात महात्म्याचे शरीर पूजाध्यानाने, लिंगमय झाल्याने, त्यांच्यापार्थीव शरीराची समाधी केल्या जागी, एक विशेष दैवी प्रभा असते. तो प्रकाश सगळीकडे, पसरत असल्यामुळे त्या क्षेत्राला, जागृत स्थान म्हणतात. काही स्थळ शिवयोगी शरणानी, इच्छामारणी होवून देह सोडला आहे. ते स्थळ महत्वाचे श्रधा केंद्र बनेल आहे. त्या जागी, अनेक मुमुक्षुनी धान जप करताना विशेष अनुभव घेतात.

पिरंतू आज बहुतेक थगडे पुन्हा मंदिर होवून ध्यान, मौन व तपस्याचे केंद्र न होता. व्यापारी केंद्र झाले आहेत. गोंधळाच्या परमावधीसह पुजारीशाही पुन्हा डोके काढले आहे. बसवपथाच्या यागी शरणाच्या थडग्यावर पुन्हा मुखवटे ठेवून रूदाभिषेक इत्यादी सुरू केले आहे. ही शरण धर्माच्या, विकृतीची परमावधी आहे. याही पेक्षा विपरीत आचरण म्हणजे,विरक्तांच्या समाधीवर त्याची मूर्ती ठेवून बाहुलीशी मरणोत्तर त्यांचा विवाह करतात.त्यांच्या जीवीतावस्थेत ते सन्यस्त जीवन जगले असले तरी,त्यांच्याअनुयायी मरणोत्तर त्यांचा विवाह करून समाधान पावतात. हा विपर्याय नव्हे? 'चिक मगळुर’ जिल्हातील, श्री निर्वाण स्वामी,यांच्या थडग्याला मात्र आजसूद्धा,शुद्ध शरण परंपरा आहे. तिथे कोणताही रूदाभिषेक,वगैरे होत नाही.थडगे स्वच्छ धुवुन, भस्मधारण करून पुष्पांलंकार करून धुप घालतात. व आकरा रू, पूजा,एकशेहे एक रूपये पूजा, वगैरे पुजेचा प्रकार तिथे नाही. शांत वातावरण ,सरलता, तिथे आहे.

स्थावरलिंगपूजा व विग्रह पूजा केल्यास घोर नर्क होईल म्हणून शरणानी ,सांगितले आहे.ते ऐकून अनेकाना आश्चर्य वाटेल. मनाला यातना लिंगाचार होतील,परंतू शरणांच्या या टिकांचा अक्षरश: अर्थ न घेता, त्यामागचा सद्भभाव समजुन घेतला पाहिजे. मुळ दुध न पिण्याचा हट्ट करते. तेव्हा आई ,‘भुत येते बघ',अस्वल आले बघ. लवकर दुध पी .नाहीतर तूला गिळेल बघ,"असी भिती घालून दुध पाजते. ते भय घालण्यामागे ,मुलाने दूध प्यावे ही तिची सद्भभावना आसते. तिथे प्रत्यक्षांत ,अस्वल किंवा भुत नसते. परंतू त्याचे भय घालून, मूलाला दुध पाजण्याचा, उद्देश आहे.

त्याचप्रमाणे कत्याचे प्रतिक आसलेले, इष्टलिंग सोडुन अन्य दैवताना भजल्यास थोर नरक,म्हणून मातृस्वरूपी शरणानी म्हणले आहे.

तुमच्या शिवाय अन्य दैवत आहे म्हणणा-यांचे
तोंड फाटूपर्यंत माझा राग जात नाही.
माझा क्रोध जात नाही,
ही माझी विनंती ऐका, कूडलसंगमदेवा
-- धर्म गुरु बसवेश्वर ७५१

सृष्टीकर्ता परमात्म्या शिवाय, अन्य देव आहे म्हणणा-यांचे तोंड फाटले तरी माझा राग जाणार नाही. म्हणून, गुरुबसवेश्वरांनी म्हंटले आहे. हे सांगण्यामागे, त्यांनी कत्र्याला देण्याचे स्थान आत्त्योन्नत आहे. तशा कत्र्याचे स्थान, खाली येणे त्यांना अवडत नाही हे आपल्याला दिसुन येते.

एक शेतकरी आपल्या मळ्याच्या कोप-यात, तीस फूट खोल, खुड्डा खणतो तरी पाणी अगले नाही. आणखी एका कोपयात चाळीस फूट खणतो. पाणी लागत नाही. आणखी एका ठिकाणी पन्नास फूट खणतो. तरी सुध्दा पाणी लागत नाही. तेव्हा एका वयस्क शेतक-याने, सल्ला दिला की, ''पुर्वीच्याच जागी, आणखी वीस फूट खणला असता तर पाणी लोगले आसते. असे तीन ठिकाणी मिळून एकशेहे वीस फूट खणण्याचे श्रम वाचले असते. व पाणीसुध्दा तत्काळ लागले असते. त्याचप्रमाणे मनुष्य सुध्दा ध्येय गाठण्यासाठी एकाच देवात निष्ठा ठेवून लिंगाचाराचे निश्चितपणे अनुष्ठाण केल्यासच शक्य आहे. असे गुरु बसवेश्वर सांगतात.

इस्लाम व ख्रिस्ती समाजात बंधुत्व, ऐक्यभाव, संघटना असण्याचे मुख्य कारण म्हणजे ते निश्चितपणे ऐकदेव निष्ठा व एक गुरु निष्ठेचे पालन करतात. त्यांच्यासारखा हिंदु समाजात ऐक्य, भाव, बंधुत्व, प्रेम, संघटना, ख्रिस्त, वाढावी असल्यास एकदेवोपासना अति अवश्यक आहे बसवेश्वरांचा लिंगाचार या हिंदू समाजाला सहकार्य होईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे.

आणखी एक म्हणजे ख्रिश्चन व महंमदीयात, महत्वाची व अनुकरणीय बाब म्हणजे रविवारी ख्रिश्चन चर्चमध्ये जमून सामूहीक प्रार्थना करतात. व मुसलमान दर शुक्रवारी मशिदीत नमाज करतात. या सामूहीक प्रार्थनाचा प्रभावाने त्या समाजात बंधुप्रेम वाढायला वाव आहे. तसेच लिंगायत धर्मानुयायीसुध्दा प्रत्येक गावी, प्रत्येक शहरी बसव मंटप बांधून . आठवड्यातून एकदा सर्वांनी मिळून प्रार्थना केली पाहीजे. सध्या कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र,तामीळनाडू इथे राष्ट्रीय बसव दलाच्या वतीने सामूहीक प्रार्थना (शरण संगम) चालते. सामूहीक प्रार्थने शिवाय समाज संघटनेला पर्यायी मार्गच नाही.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous सर्वांग लिंगत्व इष्टलिंग इवलासा झाला परमात्मा Next