Previous *इष्टलिंग* का हवे आहे ? साक्षात्कार Next

इष्टलिंगाचे साकार रूप

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंगाचे साकार रूप

इष्टलिंगाची अवश्यकता पाहील्यावर आता अम्ही, त्या लिंगाचा 'अर्थ' 'आकार' व सुंदरता याबाबत समजुन घेऊया लिंगायतांचे तळहाती विराजणाच्या लिंगाच्या गोलाकाराचे रहस्य त्या गोलाकारात, 'गर्भिकृत करून ठेवलेले पंचसूत्र लिंगाचे रहस्य व चमकणाच्या काळ्या वर्णाची सुंदरता' याबाबत समजुन घेण्यापूर्वी, इष्टलिंग पदाचा अर्थ आपण समजून घेऊन पुढे जाऊ या.

आम्ही जे मागू ते देतोच लिंगदेव म्हणून मंत्रपुरूष बसवेश्वरानी सांगीतले आहे. इष्ट म्हणजे इच्छा पूर्ण करणारे देवाचे चिन्ह इष्टलिंग आहे अंतरंग व बहीरंगातील जगतामध्ये असलेले व घरी असलेले सर्व अनिष्ट घालवून 'समता', 'शांती' सत्य न्याय, प्रेम, दया, क्षमा इत्यादी इष्ट देणारेच इष्टलिंग, अनिष्टाशी लढून शुभ मिळविण्यासाठीच इष्टलिंग पूजा करावी असे सांगणारा शरणधर्म आहे. तसे करणारेच शरण हेच विश्वकुटुंबी अशा विशाल तत्व व तत्वानुष्ठान करण्याची शक्ती देणारे इष्टलिंग पूजा करण्यास योग्य चिन्ह आहे. निराकार व अव्यक्तरूपी लिंगदेव हे विशाल विश्वातच प्रगट होते, म्हणजे परमात्म्याचे साकार शरीरच हे विश्व किंवा ब्रम्हांड आहे. हे विश्व देवाचे असल्यामुळे या स्वरूपाविणा, इतर काही आकासत देवाचे वर्णन करणे योग्य नाही. म्हणून बसवेश्वरानी विश्वाच्या आकारात इष्टलिंगाची निर्मिती केली. इष्टलिंग अशा विश्वाचे चिन्ह म्हणून आजपर्यंत शरणानी त्यावर विश्वास ठेवला आहे. विश्व हे गोलाकार आहे. अंड्याच्या आकारात आहे त्याला अनेक पुरावे देऊ शकतो. सामान्य मानव सुद्धा विश्वाला पाहून हे गोल आहे. म्हणून तर्क करू शकतो. अनेक विज्ञानी, दर्शनकार, लिंगानुभावी, तत्वज्ञानी व खगोल शास्त्रज्ञानी सुद्धा हाच अभिप्राय दिला आहे. 'मनुस्मृतीत सुद्धा याचा उल्लेख आहे. ग्रीक तत्वज्ञानी प्लेटो.यांच्या टीमीएस (Timaeus) या नावाच्या ग्रंथातसुद्धा याचा उल्लेख आहे. या विचार धारेला अनेक ग्रीक तत्वज्ञान्यानी मान्यता दिली आहे. आधुनिक खगोलशास्त्रज्ञानी सुद्धा, सर्व संमत अभिप्राय दिला आहे. श्रीमती एच. पी. प्लावटस्कीनी यानी असे सांगीतले आहे की, 'अंड्याची उपमा योग शास्त्र शिकवणा-या घटनेला विव्हरण देते. परमाणू पासून विश्वापर्यंत मानवापासून महादेवापर्यंत दिसणाच्या वस्तूंचे मुळ स्वरूप गोलाकाराच आहे. सर्व जनांगाच्या लोकांना, गोलाकार अनादी अनंताचे चिन्ह झाले आहे.'

आधुनिक भौतीक शास्त्रात महान् क्रांती केलेल्या आइनस्टाईनने हे विश्वपरबोला आकृतीत (गोल आकृतीत) आहे, असे म्हंटले आहे. विश्वामध्ये सदैव चालत असलेल्या सूर्य, चंद्र, नक्षत्र इत्यादी गोलच आहेत तसेच अनेक त-हेची धान्ये, बीज, फळे वगैरे गोलच आहेत. भू॒ एक विचित्र बाब म्हणजे, निसर्गातले अत्यंत सुंदर पुष्प, नागलिंग व महालिंग वेलाचे बीज, लिगासारखेच आहेत. असे विश्वात मुलत:सर्वच गोलाकार आहेत.

परमात्मा आहे याचा पुरावा म्हणजे ब्रम्हांड, जीवात्मा आहे म्हणायला पुरावा म्हणजे पिंडाड किंवा शरीर त्याचकारणे लिंगदेवाचे चिन्ह झालेले इष्टलिंग हे ब्रम्हांडाच्या आकारात साकार होवून तळहाती आले आहे. आत्म्याचे चिन्ह पंचसुत्र लिंग हे देहाच्या आकारात साकार होवून शांभवी मुद्राचे रुप धारण करुन तळहाती आले आहे. शांभवी मुद्रेत म्हणजे लिंगपुजा करताना डाव्या हातात लिंग ठेवून पुजा करण्याची आकृती. खालील पद्मासनच पीठ होवून मस्तक गोलक होवून पुढे पसरलेले हातच पन्हाळी प्रमाणे दिसते. या पिंडांडाच्या आकारात पंचसुत्र लिंग गुरु बसवेश्वरानी रचीले. हे योगी शिवाचे प्रतीक नसून आत्मतत्वाचे संकेत आहे. त्यामुळे इष्टलिंगोपासना ही शिवपूजा नसून आत्मपूजा व परमात्म्याची पूजा आहे. असे शरणानी पूजायचे परमनिरंजनाचे चिन्ह झालेले इष्टलिंग या स्वरूपात निर्माण झाले. बाह्यलिंग अर्थात वरील काळे कवच ब्रम्हांडाचे अंड्याच्या आकारात त्याच्यात असलेले पंचसुत्र लिंग पिंडाचे व शरणाच्या पूजेच्या वेळची शांभवी मुद्रेच्या आकारात रचली गेली आहे. गोलाकार कवच्या मध्ये पंचसुत्र लिंग ठेवून साकार रुपात इष्टलिंगाची निर्मिती केली गेली आहे.

असे एकात एक झाकून ठेवण्याचे कारण काय ? देवाच्या गर्भात जीव आहे, ब्रम्हांडात पिंडांड आहे हे महासत्य पटवण्यासाठीच गोलाकार कवचात पंचसुत्र लिंग झाकून 'तुझ्यात मी लिंगदेवा माझ्यात तू आम्हा दोघात भेदाभेद नाही हे समजून घेतल्यास' असे म्हंटले आहे.

(टीप देहाच्या आकारात निर्मिती झालेले आत्म्याचे प्रतीक पंचसुत्र लिंग विशिष्ट प्रमाणात असते. १. गोलाभोवतीचे माप जितके असेल तितकेच उंचीचे असावे. २. अध्र्या मापाचे गोमुख असते. त्याच्या अध्र्या मापाचे गोमुखाग्र असते. व त्याच्या अध्र्या मापाची पन्हाळी असते. गोलाभोवतीच्या मापाच्या चार पट पीठ असावे.)

‘पिंड ब्रम्हांड योरैक्यम्' हे शास्त्र वाक्य इथे आचरणात आले आहे.

इष्टलिंगाचे प्रमाण

इष्टलिंगाचा आकार आपण समजून घेतला, आता त्याचे प्रमाण समजून घेवू या, इष्टलिंग विश्वाच्या आकारात गोल असले तरी नारळ किंवा पेरू सारखे मोठे नसून करवंदासारखे लहान नसून जांभूळासारखे हाताच्या आंगठ्याप्रमाणे असते. अंगठ्याप्रमाणे करायलासुद्धा अनेक कारणे आहेत. देहात परमात्मा आहे हे सर्व अनुभंविचे अभिमत आहे. हृदयातील कोष आंगठ्याप्रमाणेच आहे. म्हणून उपनिषद् व इतर ग्रंथात सांगितले
आहे.

अंगुष्ठ मात्रः पुरूषोंतरात्म
सदाजनानाम- ध्यये सान्निविष्ठ
हृदय मनिषा, मनसाभिक्लैप्तो
ययतद्द विदुरामृतास्ते भवंती
श्वेताश्वेत रोपनिषत्: अ. ३. श्लोक १३

हृदय, बुद्धी व मनाच्या अनुभवाला वेद्य होवून अंगुष्ठा प्रमाणे असणारा पुरुष म्हणजे अंतरत्मा. सदैव मानवाच्या हृदयकोषात असतो. हे तत्व जाणणारे अमर होतात. अंगठ्याप्रमाणे स्थीर व ॐ कार स्वरूप असणा-या परमात्म्याचे ध्यान करावे असे अनेक पुराव्यातून सिद्ध होते की, हृदयस्थ, झालेले चेतन्य,अंतरात्मा, प्राणलिंग अंगठ्याप्रमाणे हृदयकमलात आहे.

त्याकरीता इष्टलिंग निर्माण कत्र्या, श्री गुरु बसवेश्वरांनी परमात्म्याला उद्देशून म्हंटले आहे की,''अंतरंगात असणा-या निरवयव लिंगाला सावयव करुन माझ्या तळहाती आणून दिले. श्रीगुरु (बसव,वचन दिप्ती नं. १३४६) इथे श्री गुरु म्हणजे त्यांनी साक्षात देवालाच म्हटले आहे'' गुरु बसवेश्वरच प्रवादी असल्यामुळे त्यांना लौकीक गुरु नाही.

'अनादी असलेले श्री गुरु ज्ञानमय अंतर्गत प्राण लिंगाला आपल्या भाव, मन, दृष्टीने बाहेर आणून बाहेरच्या इंद्रियाला दिसण्यासारखे करून क्रिया दिक्षाद्वारे अनुग्रह केल्यास ते आपल्या पुर्वस्थितीप्रमाणे आत व बाहेरच्या शरीरात एकच झाल्यामूळे क्रिया विश्रांती घेतलेल्या शरणांच्या मार्गाबाबत काय सांगु शकतो' असे मग्गे मायीदेवानी सांगितले आहे.

इष्टलिंग कुठे धारण करावे ?

अनाहत चक्रात(हृदयकमल) लपून बसलेला अंतरात्मा अंगावर इष्टलिंग होवून आल्यामुळे त्याला छातीवरच धारण केले पाहिजे. काही लोक विशुद्धी चक्र असणा-या मानेवर लिंग बांधून घेतात. आणखी कांही जण दंडात बांधून घेतात. तर आणखी कांहीजण बेंबीच्या खाली जाईल असे बांधून घेतात. आजचे फॅशनयुगी तरूण गळ्यातून उजव्या किंवा डाव्या बाजूला बांधून घेतात. या सर्व चुकीच्या पद्धती आहेत. अंतरात्म्याचे प्रतीक असलेले इष्टलिंग अनाहत चक्राच्या स्थानावर म्हणजे छातीवरच असावे. याला आणखी एक महत्वाचा आधार म्हणजे योगदृष्टीने आभारचक्रात जीवात्मा आहे. ब्रम्हरंध्रात परमात्मा आहे. हृदय किंवा अनाहत चक्रात अंतरात्मा लपून बसला आहे. म्हणून शास्त्रे सांगतात. तपस्या अनुष्ठान किंवा पुग्नेने अधोमुख असलेला जीवात्मा उर्ध्वमुखी होवून एकेक चक्रावर चढत येतो. या प्रमाणानुसार ब्रम्हरंध्रात परमात्मा खाली उतरतो. असे म्हटलेजाते. जीव वर चढण्याच्या क्रमाला उत्क्रांती तत्व म्हटले जाते, देवाची चेतना खाली उतरण्याच्या क्रमाला उद्धारक तत्व म्हणतात. जीव व देव अनाहत चक्रातच सामावतात. खालून वर उसळून जाणारी भक्ती, वरून खाली वाहून येणारी दिव्य शक्ती या दोन्हीची हृदय कमळात सामावण्याची क्रिया म्हणजेच मुक्ती. हा शिवयोगींचा अभिप्राय, इष्टलिंग हे मुक्तीचा प्रतिनिधी आहे. हे मुक्ती देणारे चिन्ह असल्यामुळे, त्याला छातीवरच घारण केले पाहिजे.

लिंगायत धर्मानुसार केवळ मंदिरात नेलेला नैवेद्य किंवा घरी कोणत्यातरी प्रतिमेला नैवेद्य म्हणून दाखवलेला पदार्थच प्रसाद नव्हे, तर अम्ही सेवन करीत असलेला प्रत्येक पदार्थ प्रसाद होण्यासाठी जेवणापूर्वी लिंगाला अर्पित केले पाहीजे. नंतर जेवताना प्रत्येक घासाला देवाचे नामस्मरण करत त्याला अर्पित करून स्विकारले पाहीजे. छातीवर इष्टलिंग असल्यास आपोआपच प्रत्येक घास त्याला अर्पित होतो. तसा प्रसाद स्विकारल्याने मानवी शरीर प्रसाद काया बनते. जीवन पावन होते

छातीवर लिंग धारण करायला आणखी एक कारण म्हणजे, असा देव आपल्या पुढे असल्याने आम्ही कुठेही जाताना देव पुढे आहे, मी त्याच्यामागे पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. अशी उद्दात कल्पना असते. त्यामुळे आम्हाला कधीही अपयश येणार नाही.देवाच्या बरोबर चालणा-याला, विघ्न येणे शक्यच नाही. त्यासाठी इष्टलिंग धारकाला अकस्मीक किंवा अकाळ मृत्यू येत नाही. असे पूर्वजानी सांगत आलेल्या गोष्टीत तथ्य नाही असे नाही. त्यासाठी सदैव छातीवर लिंग असलेच पाहीजे. पूजा करून उतरून ठेवू नये. सृष्टीकर्ता माझ्यात आहे त्याला सोडून मी एक क्षण सुद्धा नाही. ही सद्भावना जागृत होण्यासाठी अंगावर सदैव इष्टलिंग असणे मंगलमय आहे.

इष्टलिंगाच्या आणखी एक प्रकाराचे तात्वीक चिंतन पाहूया, शंकराव्दैती सर्वम खल्वीदम् ब्रम्हा, ‘ब्रम्ह सत्यम् जगन्मिथ्या' असे सांगून केवळ ब्रम्ह तत्व एकच मानतात. माध्व मताचे द्वैती जीवात्मा, परमात्मा दोन्ही तत्वे मान्य करून जीव शिवात, जीव जीवात, जीव जडात, जड शिवात, जड जडात भेद आहे म्हणून पंचभेदाचे प्रतिपादन करतात. रामानुज मताचे विशिष्ठ अद्वैती चित् अचित् व ईश्वर हे तीन तत्व मान्य करतात. परंतू लिंगायत धर्माचे शक्ती विशिष्ठाद्वैत सिद्धांत प्रकृती, पुरुष, पराशक्ती, परशिव या चार तत्वाना मानतो. ही चारही तत्वे लिंगात कशी समाविष्ठ आहेत हे पाहूया.

प्रकृतीला अविद्या मायाशक्ती किंवा माया म्हणून समजणे ही रुढी आहे. ही प्रकृती त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज, तम, या तीन गुणाचा समावेश सृष्टीत आहे. हे तीन चित्रीत करून दाखवायचे झाल्यास 🔺असे समभुज त्रिकोन आकृतीने दाखवू शकतो, पराशक्तीला चित्शक्ती किंवा विमर्षशक्ती म्हटले जाते. हे सुद्धा सत्, चित्, आनंद रुपी तीन शक्तीपासूनच झाले आहेत. त्यासाठीच चित्शक्ती सचिदानंदाची माया झाली आहे. या पराशक्तीच्या तीन गुणाला चित्रित करून दाखवणे म्हणजे 🔺 असे आणखी एक समभुज त्रिकोण आकृती काढून दाखवू शकतो. प्रकृती किंवा मायेला अपरा प्रकृती असे म्हंटले जाते. कारण ती खाली आहे. उर्वमुखी आहे. चित्शक्तीला पराप्रकृती म्हणतात कारण ती वर आहे. उर्ध्वमुखी आहे. याना एकावर एक ठेवून दाखवणे म्हणजे ती अशी अकृती बनेल, विद्या, विद्य, परा, पर, या दोन्ही तत्वाला अतित एक अनुपम तत्व आहे. ते जड नाही चेतना नाही. ते साकार नव्हे निराकार नव्हे तेच परमात्मा तत्व असे परमात्मा तत्व परीपूर्ण आहे. परिपूर्णता बिंबवणारे एकमेव चिन्ह O असे एक शुन्यच लिहीणे अनिवार्य आहे. म्हणजे आतापर्यंतच्या त्या चित्राची O/⧖옷 अशी आकृती होईल. अशा परवस्तूच्या अनुसंधानाने संसार वर्तुळ ओलांडणा-या शरण किंवा जीवी सरळ रेखा व्हावे अनुभवी शरणांचे व्यक्तीत्व दाखवणे म्हणजे असे सरळ रेखेपासूनच दाखवणे योग्य होईल. कारण लिंगानुभव संसार चक्राला आडवे होते. म्हणजे आतापर्यंत चित्ररुपाने दाखवलेली आकृती अशी इष्टलिंगाची आकृती झाली आहे. इष्टलिंगाची महती अशी आहे. अशा तात्वीक विश्वमानवतेचे प्रतिक पुजायला सोपे व वर्ण, लिंग, जात इत्यादी कोणतेही भेद न करता प्रत्येक मानवाला पुजण्यासाठी अनुकूल झालेले हे इष्टलिंग, विश्वाविभूती बसवेश्वरानी दिले आहे.

आता आपण इष्टलिंगाचे प्रमाण, आकार, आकृती इत्यादी तात्वीक बाब समजून घेतली आहे. इथून पुढे लिंगाचे रुप सुंक्ष्मता म्हणजे त्याच्या काळ्या वर्णाचे मर्म समजून घेऊ या.

लिंगाच्यावर असलेले काळे कवच किंवा आवरणाला कंते, कंथे, व कांती, ही सर्व नांवे आहेत. याला अष्ठ बंध , सज्ज रस म्हणून शास्त्रात उल्लेख आहे. ही कांती तयार करण्यासाठी, बिब्याचे तेल, गोडे तेल, तुप, कापूर, काजळ, यांचे मिश्रण वापरतात. साधारण किंवा राखेच्या मिश्रणातून केलेले तितके चमकदार नसते. गोडे तेल कांती, त्याच्या पेक्षा उत्तम व तुपाची कांती त्याहून उत्तम. कापराची व काजळाची कांती अती उत्तम, ती नील वर्ण मिश्रीत काळ्या रंगाची असून इतकी चमकदार की त्यात आपण तोंड सुद्धा पाहू शकतो. आतील पंचसुत्र लिंग(बळपद कल्ल) पिट्टी दगडाचे तयार करतात. संस्थापक शरणाच्या काळात लोहचुंबक दगडातून पंचसुत्र लिंग करत असत. असे वाडवडील सांगतात. वर सांगितल्याप्रमाणे तयार केलेल्या कांतीचा त्यावर लेप देऊन चकाकी आणतात. लिंगाला कांतीने काळा रंग येतो. तो फारच आकर्षीत असतो. दिक्षेच्यावेळी चित्कळा, दिल्यावर तर त्या लिंगाला पहात रहावे असे वाटते. कांतीला काळा रंगच का दिले ? (Black absorbs white reflects) या वैज्ञानिक नियमानुसार काळ्या रंगाची कांती डोळ्यातील काळ्या बुबळाना आकर्षित करते. बुबुळही व कांती ही काळी हे एकमेकाना सामावून घेतात. तेव्हा लिंग पुजकांची दृष्टी लिंगात एकाग्र होवून लिंगागसामरसी बनतो. यालाच त्राटक योग म्हणतात. चामरस कवी लिंग त्राटकाच्या माहीती बाबत असे वर्णन करतात की,

बुबुळे थांबल्यास, श्वासही थांबतो
श्वास थांबल्यास मनही थांबते, मन थांबल्यास
बिंदू थांबले, लिलेने तो बिंदू थांबल्यास
कालकर्म जिंकून मायेला समुळ नष्ट करणे शक्य आहे बसवा

लिंगानुसंधानाने मायेला जिंकून लिंगदेवात सामावणे शक्य आहे. असा भाव वरील काव्यात सांगितले आहे. लिंगानुसंधान कसे साधावे याबाबत आता समजून घेऊ या.

उत्तम कांतीचे लिंग सद्गुरुकडून दिक्षाद्वारे घेऊन डाव्या हातात ठेवून साधना केली पाहीजे. नाकाच्या शेंड्याला दहा ते बारा बोटे सरळ रेसेत धरावे, डोळ्यावर बाहेरचा प्रकाश येऊ देवू नये. आपल्या मागे एक लहान व प्रशांतपणे जळणारी एरंडेलची ज्योत ठेवावी. ज्योतीचे लहान बिंदू प्रतिफलित होऊन हातातील लिंगात दिसते. त्या ज्योतीच्या बिंदूला अध्र्या दृष्टीने पापणी न मारता पहावे, या बाबत शरण मग्गे मायीदेवानी आपल्या काव्यात सुंदर रुपात सांगितले आहे.

इष्टलिंगामध्ये दृष्टीस्थीर झाल्यावर त्या दृष्टीत मन एकाग्र झाल्यावर त्या मनात भाव अढळ झाल्यावर त्या भावात परमात्म लिंग, अचल झाल्यावर त्या महालिंगात सामावून चिरपरिणामी झालेल्या शरणाना बाहेरची संवेदना कुठे ?

असे लिंगानुसंधानाचे विधान प्रत्यक्ष गुरुंच्या कडून समजून घेतले पाहीजे. या लिंगानुसंधानाने साधक, परमाश्रय मिळवतो. लिंगानुभावी बनतो. या सर्वाला कारण चमकणाच्या आवरणाची कांती. याला आपण विसरू नये. पांढ-या भिंतीवर काळे टिंब देऊन पहाण्याची पद्धत कांही ख्रिश्चन पंथात आहे. असे म्हटले जाते. बहुश: काळा रंग डोळ्याला अकर्षीक करणे, दृष्टी, मन, एकाग्र करणे, साधन झालेले आहे. तरी इष्टलिंगाची क्रांती फार अकर्षणीय असते. ती डोळ्या हवी असलेली ज्योत पुरवते. इष्टलिंगाच्या नित्य त्राटकापासून, मंद झालेली डोळ्याची दृष्टी वाढते. इतकेच नव्हे तर, शंभरवर्षापर्यंत ती मंद न होता निरोगीपणे, स्पसृपणे वस्तू पहाण्यांची शक्ती ठेवते. डोळ्याच्या दृष्टीला शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याची शक्ती लिंगाच्या कांतीत आहे. भौतीक, नैतिक, व बौद्धीक दृष्टीने डोळे बिघडलेल्या व्यक्ती लिंगाच्या निरिक्षणाने सुधारल्याचे प्रत्यक्ष पहाण्यात आल्या आहेत. इतकेच नाहीतर ज्ञानज्योतीची वृद्धी होते. लिंग त्राटकाचे मिलन लिंगसमन्वयाला कारण होते. या लिंगत्राटकाचा अनुभव प्रभूदेवानी आपल्या वचनात सांगीतले आहे.

निरीक्षणच मिलन, मिलनच प्राण
प्राणच एक, एकच समन्वय
समन्वयच लिंग, लिंगच परिपूर्ण
परिपूर्णच, परब्रम्ह, परब्रम्हच मी
हे सत्य गृहेश्वर जाणतो, त्याला सोडल्यास
डोळे बिघडून घेतलेल्याना कसे कळणार? --अल्लमप्रभूदेवांचे वचन

दृष्टी समन्वयापासून लिंग, व त्याच्याशी असणा-या समन्वय भावाला फार मार्मीक पणे म्हटले आहे.

इष्टलिंगाच्या कांतीत दृष्टि ग्रहण करण्याची शक्ती आहे. कांतीत दृष्टी थांबवण्याची व लय करण्याची सुद्धा शक्ती आहे. इतकेच का अंतरंगाचे ज्ञान साधून साधकाला परमात्म्याकडे नेण्याची शक्ती ज्योतीत आहे.

इष्टलिंगात सुप्त विद्युत शक्ती आहे. कारण बिब्याच्या तेलाने कांती करतात, या कांतीच्या इष्टलिंगाला रेश्मी किंवा लोकरीच्या कापडाला घासून डाव्या हातात ठेवून पूजा करताना लिंग पुजकाच्या रट्ट्याच्या शिरेद्वारे विद्युत शक्ती वहाते. पूर्ण शरीर जागृत होवून विना वाजल्याप्रमाणे होते. त्याचे कारण, पुजा, ध्यान लिंगत्राटक करायला बसताना जागृत झालेली प्राण विद्युत भूमीत वाया वाहून जाऊ नये म्हणून घोंगडे, आसन, चटई, पाय, असे काहीतरी अंथरूनच बसावे असा नियम आहे.

ही विद्युतशक्ती हृदयकोशात शिरून आत्मतेजाला जागृत करून वर चढून चिदाकाशात संचार करून साधकाला भावपुलकीत करतो. शरण शतकोटी सुर्याचाप्रकाश पाहिल्यासारखा भावपुलकीत होतो, परंतू ही भौतिक विद्युत नसून प्राण विद्युत आहे. याला समजून घ्यावे या प्राण विद्युतेचा संचार झाल्यावर साधकाला विशेष अनुभव येतात. ते
अक्कामहादेवीच्या वचनात पाहू या.

काटी रवी चंद्राहून प्रखर प्रकाश झाला
माझ्या तळहाती- त्यातून ओलांडीले मी भवाचे खड्डे
उमटणारे शब्द ऐकून, जळणारी ज्योत पाहून
गळणारे अमृत प्राशील्या कारणे
दूर केले जनन मरण मी

हृदयकमालात उमटणारा नाद ऐकून भूमध्यात जळणारी परमज्योत पाहून ब्रम्हरंध्रात असलेले अमृत पिल्यामुळे भवबंधन जनन मरण दूर केले. म्हणून अक्कमहादेवीनी म्हटले आहे. अत्यंत अश्रुपाचे विशेष अनुभव लिंगागयोगी शरणानी मिळविले. इष्टलिंग नसल्यास हे शक्य नाही. इष्टलिंगाद्वारेच त्याना अतिंद्रिय अनुभव घेणे शक्य झाले. त्याला अक्कमहादेवी आपल्या एका वचनात खालीलप्रमाणे सांगीतले आहे.

अष्टावरणाचे फळ, ओसाड पटांगणात असल्यास
अष्टांग योग करुन थकून जातात
दृष्टी ठवने विसरले आहेत

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous *इष्टलिंग* का हवे आहे ? साक्षात्कार Next