Previous लिंगांग योग व अनुभव इष्टलिंगाचे साकार रूप Next

" इष्टलिंग " का हवे आहे ?

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंग'हे लिंगायत धर्माचा केद्रबिंदु वैशिष्ट आहे.

‘इष्टलिंग'हे लिंगायत धर्माचा केद्रबिंदु वैशिष्ट आहे. भारत देशात साकारवस्तूची कमतरता नव्हती. तेहतीस कोटी देवतांचा समुहच होता. तरीसुध्दा विश्वगुरू बसवेश्वरांनी 'इष्टलिंगारूपी साकार वस्तु शोधून दिली. त्याची फार अवशक्ता आहे म्हणून धर्म व समाजाचा केद्रबिंदु म्हणून ठेवुन त्याच्या भोवती आपल्या क्रांतीचा विस्तार केला. त्या इष्टलिंगाचे महत्व काय ? आता पाहू या

आकाशात उडणा-या पतंगाला सुध्दा मुळ सुत्र पाहीजे
शूर असला तरी हत्याराविणा चालत नाही
जमीन नसल्यास गाडी, चालेल का ?
अंगाला लिंगसंग नसल्यास, निसंग होता येत नाही
कुडल चन्नसंगम देवात संग विणा
निस्संगी मानणे शक्य आहे का?
--श्री चन्न बसवेश्वर १२५

पतंग आकाशात उडत असला तरी त्याचे सुत्र धरून जमिनीवर राहून उडवावे लागेल. कितीही शूर असलातरी लढण्यासाठी हत्यार पाहीजे. प्रवासासाठी वाहन असले तरी त्याला आधार जमिनीचाच आहे. त्याचप्रमाणे 'इष्टलिंगसंगाविणा भवबंधन सुटणे शक्य नाही. म्हणून चन्नबसवेश्वरांनी सुंदर उपमाव्दारे इष्टलिंगाची अवशकता सांगितली आहे.

परमात्म्याच्या दर्शनाची ‘हाव' असलीतरी,त्याला योग्य साधनाची गरज आसते. प्रवचन ऐकण्याची अपेक्षा असली तरी, त्याला वाहनाची गरज आहे. शेवटी पाय तरी हवेतच.तसेच देवापर्यंत पोहचण्यासाठी इष्ठलिंग एक वाहन आहे.

कितीही शूर व्यक्ती असो, त्याच्या हातात हत्यार पाहीजेच. हत्यार नसल्यास तो शत्रुशी लढू शकत नाही. तसे कितीही ज्ञानी असला तरी त्याच्या हाती धर्मचिन्ह रूपी हत्यार पाहीजेच. तसे हत्यार 'इष्टलिंग आहे.

मनुष्याला तीन शरीर असतात. स्थूल' ‘सूक्ष’व सूक्ष्मातीसूक्ष्म असलेले कारण शरीर, कारणशरीरात'भावलिंग' असते. ते निसर्गदत्त असून, अंतर्गत असते. तसेच'मनोशरीर झालेल्या सूक्ष्म देहात ‘प्राणलिंग' असते. ते ही निसर्गदत्त आहे, स्थूलशरीलासुध्दा एक पाहीजे, तेच 'इष्टलिंग' त्याला गुरू समजुन देतात. याला 'श्री सिध्दलिंगश्वरांनी असे म्हंटले आहे की --

भावमनाला, लिंगधारण करूण
अंगावर लिंग नसल्यास चालेल का ?
भक्त होवून,एक अंग भवी झालेले
भ्रमीतांचे मुख बघु नये
तन,मन,भावात, लिंग धारण करून
लिंगभयाला,अंगत्रयातुन वेगळे न करता
स्थीर झाला,महा लिंग गुरूशिवसिध्देश्वर प्रभू
--तोंटद सिध्दलिंगेश्वर १८२

मानवाच्या तीन शरीराला,तीन लिंगसंबंधाची गरज आहे. मन व भावाला लिंग धारण करुन अंगावर इष्टलिंग धारण न केल्यास ते लिंगाचर होत नाही. अंगावर इष्टलिंग धारण न केल्यास ते लिंगाचार होत नाही. आम्ही लिंगत्रय मध्ये अचल पद मिळवलो म्हणून शिवयोगीनी आपले अनुभव सांगितले आहेत.

साकार धरुन, अर्चन, पूजन केले पाहीजे पण
निराकराचा विश्वास धरता येत नाही. श्री गुरु प्राण लिंगाला
करस्थलात आणून दिल्यावर,
वज्रामध्ये पोकळी शोधणार का ?
उरीलिंग पेद्दी प्रिय विश्वेशवरा
--उरीलिंग पेद्दी २११

साकार धरुन पूजा केली पाहीजे. केवळ निराकाराचा विश्वास धरू नये. सद्गुरुनी प्राणलिंगाला तळहाती आणून दिल्यावर त्यातच घनवस्तू समजून सामावून घ्यावे असे उरीलिंग पेद्दी शरणानी सांगितले

सती संग, अति सुख, म्हणून समजले तरी काय ? गणसाक्षीत
लग्न न झाल्यास ? डोळ्यांना दिसते म्हंटल्यावर
आंधारात दिसेल का ? दिवा नसताना ?
सुर्याच्या उजेडात मी स्वत:च पाहीले
म्हणणे,म्हणीसारखे झाले.अंग सोडुन आत्मा आहे का ?
शक्तीला सोडून शिव आहे का ?
कारण,स्थूल सूक्ष्म कारणरूपी तीन शरीर असल्यावर?
इष्ट, प्राण,सूक्ष्म भावरूपी त्रीविध लिंगसंबंध
नको म्हंटल्यास, असंख्यात प्रमथगण मानतील काय?
याचकारणे कूडल चन्नसंगैय्यात
इष्टलिंगसंबंध नसलेल्याचे तोंड
बघू वाटत नाही, प्रभुदेव
--चन्नबसवेश्वर १२७

समाजाच्या साक्षीने पत्नीशी लग्न होवुन रती सुखाचा अनुभव न घेता, सती संगात सुख आहे म्हणून केवळ समजुत करून घेतल्याने काय उपयोग?अंधारात दिव्याच्या सहाय्याने दिवसा सूर्य प्रकाशात आम्ही पाहू शकतो.परंतू आम्हीच आमच्या डोळ्याने पाहीले असे म्हणणे, अहंकाराचे होईल. तसेच करस्थलाची ज्योत धरून, परवस्तू पहावी देहाला सोडून आत्मा, शक्तीला सोडून शिव,ज्या प्रमाणे राहू शकत नाही तसेच इष्टलिंग सोडून जीवी भक्त असू नये. त्याकरिता स्थूल, सूक्ष, कारण शरीराला, 'इष्ट' प्राण व भाव हे लिंगत्रय संबंध करून घेणे आवश्यक आहे. हे शरणांचे अभिमत आहे. त्याचकारणे इष्टलिंगाविणा रहाणे योग्य नाही.म्हणून, श्री चन्नबसवेश्वरानी सांगितले आहे.

तिळात सत्व असेल तरच ते तेलात येईल
देहावर,इष्टलिंगधारण केल्याशिवाय
प्राण लिंग संबंध शक्य नाही. याच कारणे,
आमच्या गुहेश्वर लिंगात,इष्टलिंगसंबंध न झाल्यास
प्राण लिंग संबंध शक्य नाही पहा सिध्दरामय्या
--अल्लमप्रभुदेव ११४६

या प्रकारे प्रभुदेवानी,सिध्दरामेश्वरांना उपदेश केले आहे.
ज्ञान असून काय उपयोग,सक्रीया आचरण नसल्यास ?
स्मरण केल्याने दिसेल का क्रिया नसल्यास ?
आंधळ्याला वाट दिसत नाही, लंगड्याला चालता येत नाही
एक नसल्यास दुसरे होत नाही
ज्ञान नसलेली क्रिया व्यर्थ, क्रिया नसलेले ज्ञान भ्रांत
याकारणे, सिध्द सोमनाथमध्ये दोन्ही पाहीजेत --अमुगीदेव व .सा.स.१६५

के वळ ज्ञानातून कळल्यास उपयोग नाही. साधकासाठीची,सक्रिया आचरण पाहीजे. केवळ देवाचे स्मरण केल्यास तो दिसणार नाही.लंगड्याला चालता येत नाही, आंधळ्याला वाट दिसत नाही. आंधळ्याच्या खांदयावर लंगडा बसुन वाट दाखवल्यास,आंधळा त्याला वाहून नेतो.दोघे मिळून ध्येयाप्रत पोहचतात. त्याचप्रमाणे,ज्ञानविना क्रिया जड असते. क्रियेविणा ज्ञान भ्रांती असते. त्याकरिता साधकाला ज्ञान (प्राण)लिंग व क्रिया (इष्ट)लिंग हे दोन्ही पाहीजेत. म्हणून सांगितले आहे.

क्रियात्मक इष्टलिंग पूजेमूळे साधकाच्या अंगी आचार सामावतो. ज्ञानात्मक भावलिंग पूजेतुन भावनेत अनूभव साठतो,आचार ज्ञान व अनुभवाव्दारे 'शरण ‘परमात्म्यात सामावतो. हा 'शरण सिध्दांत

गुरूने दाखवलेले हे लिंग मनाचे साहित्य झाले असून
वायु थोपवून समजून घेतो म्हंटल्यास तोच द्रोह
ईड,पिंगळ, सुषुम्न, या वाहिनीतून समजेन म्हंटल्यास
लिंगदेव नाक कापल्याविना सोडेल का ?
--धर्म गुरु बसवेश्वर ७९९

योग साधनेत अत्यंत कठीण असलेले म्हणजे, चक्रभेद इष्टलिंग हे केवळ भक्तीच्या तृप्तीसाठी नसून योगसाधनेला सुद्धा, सहाय्यक व्हावे. म्हणूनच संशोधन करुन दिले. यातून कुंडलिनी शक्तीची जागृती करुन घेऊ शकतो. विशेष अनुभव घेऊ शकतो. असे असताना केवळ हटयोग करायला जाऊ नये म्हणून बसवेश्वरांनी इशारा दिला आहे.

प्राणायामापासून शरीराचे आरोग्य रचू शकतो परंतू, त्यातून आत्मसाक्षात्कार शक्य नाही. गुरुनी दिलेल्या इष्टलिंगातूनच प्राणलिंग समजून घेऊन लिंगांग सौख्य मिळवले पाहीजे, असे गुरु बसवेश्वरांनी सांगितले आहे.

श्रुती मानू नको, श्रुती मानू नको, श्रुती हे शिवचरण न पहाता
श्रुती चकीतम्भीदत्ते म्हणता, शोधून शोधून,
थकून गेले, श्रुतीच्या सांगण्यावरुन जाऊन थकू नये --श्री अल्लमप्रभू १०८५

असे अल्लमप्रभूदेवांनी, श्री सिद्धरामेश्वरांना पटवून दिले वेद व उपनिषदाच्या अभ्यासाने देवाचा साक्षात्कार शक्य नाही. बौद्धाप्रमाणे इष्टलिंगाची अवशक्ता शून्याला शरण जाऊन शोधले तरी परमात्मा भेटणे शक्य नाही. हृदयाच्य अनाहत चक्रात असो, भूमध्यांचे अग्न्या चक्र असो, किंवा ब्रम्हरंध्राचे सहस्त्र चक्र असो यात देवसाक्षातकारासाठी प्रयत्न करू नये. देवाचा निश्चितपणे साक्षात्कार करून घेण्यास माझे गुरु अनिमिष देवासारखे तुमच्या तळहाती इष्टलिंगाचा अनुगृह करून घेऊन एकाग्र व अनिमिष दृष्टीने, लिंगानुसंधान करावे म्हणून अल्लमप्रभूदेवांनी सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांना उपदेशीले. त्यापूर्वी सिद्धरामेश्वर कर्मयोगी, सिद्धीपुरुष होते. इष्टलिंग किंवा लिंगायत धर्माबाबत त्यांना काही कल्पना नव्हती. अल्लमप्रभुंची भेट झाल्यानंतरच, त्यांना गुरु बसवेश्वरांचा परिचय झाला.

अल्लमप्रभूदेवांनी सिद्धरामेश्वरांना इष्टलिंगाचे महत्व याप्रकारे पटवून दिले की रत्नप्रकाश असून काय उपयोग ?ते रत्न सोन्याच्या दागिन्यात जडवल्यावरच त्याची महती वाढते. स्वादिष्ट फळ असले तरी, वृक्षामुळेच त्याची निर्मिती ना ? किंवा एखादे अतिसुंदर तैल चित्र आहे, परंतू ते लोकांच्या समोर आल्याशिवाय त्याचे महत्व वाढेल का ? अंजनासिद्धी द्वारे मातीमधून सोने काढणे महत्वाचे नाही. तर परमात्म्याला जाणणे महत्वाचे आहे. तळहाती ठेवून इष्टलिंगाची पूजा केल्याशिवाय दिव्यदर्शन शक्य नाही. असे अल्लमप्रभूनी सांगितले.

१) केवळ शास्त्रज्ञानाने मीच ब्रम्ह,(अहंमब्रम्हास्मी) म्हंटल्याने उपयोग नाही. तर भक्ती, ज्ञान, वैराग्य या साधनेद्वारे, परब्रम्हरूपी सोने प्राप्त करुन घेतले पाहिजे. आज अनेक अद्वैती कोणतीही साधना न करता, आम्हीच ब्रम्ह असलेच सांगतात. आठ दहा वर्षांची कन्या 'मी माता आहे, असे सांगू लागली तर विश्वास बसेल का? तिला माता होण्याची शक्ती आहे. पण ती स्वप्न रूपात आहे. ती मोठी होवून लग्न झाल्यानंतर पतीशी करून, मुलाला जन्म दिल्यावरच आई बनने शक्य आहे. तसेच आम्ही सर्व मुलत: देवस्वरूप असलो तरी मुक्ती मिळवण्याची इच्छा झाल्यावर दिक्षारूपी लग्नाद्वारे गुरुंच्या साह्याने लिंगपतीचा स्विकार करून त्यांच्याशी समन्वय साधून, स्वानुभवरूपी मुलाना जन्म दिल्यावरच आम्ही देव स्वरूपी बनू शकतो.

२) लिंगायत धर्मानुसार आमच्यात देव आहे, आम्ही देव नाही. जमीनीत पूरलेल्या धनाप्रमाणे देहात असलेला आत्मा, परमात्म्याच्या एकांश आहे. साधनेद्वारे त्याला प्राप्त करून घेतले पाहीजे.

३) शौच्यादी, आष्टांग योगात असलेले कोणतेही साधन असो, इष्टलिंगाद्वारेच केले पाहिजे त्याला सोडून नाही. त्यासाठी सिद्धरामेश्वराना लिंगदिक्षा झालीच पाहीजे म्हणून आठरा दिवस वादविवाद करून त्याना इष्टलिंगाचे महत्व व आवश्यकता पटवून दिली. प्रभूदेवांच्या आदेशानुसार चन्नबसवेश्वरानी सिद्धरामेश्वराना, लिंग दिक्षा दिली. दिक्षा घेऊन शिवयोगी झाल्यानंतर, त्यांच्या अनुग्रहाबाबत असे वर्णीले आहे.

अध्यात्म, अध्यात्म म्हणता आध्यात्म कुणाला?
श्री गुरुस्वामी बृहत लिंगाला सूक्ष्म करुन
तळहाती दिल्यावर वेगळा योग आहे का
आपले हात मस्तकावर ठेवून वायूप्राण मिटवून
लिंगप्राणी बनवून पाच अक्षरात मुक्त केल्यावर
पुन्हा वेगळा योग आहे का ? बसवयोगाला सोडून ?
लिंगार्चन करून, जंगम प्रसाद घेतल्यावर
पुन्हा वेगळ्या योगाला, विवेक स्विकारेल का
हे सर्व घालवून शुद्ध शिवयोगी बनवले, मज चन्नबसवेश्वरांनी
मला आपल्यासारखे बनवलं गुरु चन्नबसवेश्वरांनी,
मी चन्नबसवेश्वरांच्या कृपेने अभ्यासयोग सोडून
शिवयोगात मग्न होवून भक्त, महेश, प्रसादी,
प्राण लिंगी, शरण, ऐक्य या सहा स्थळाला, मी अधिकारी बनलो
तुमच्या शरणांच्या प्रितीला पात्र झालो, चन्नबसवेशांच्या कृपेने
मी बनलो गुरु कपिलसिद्ध मल्लिकार्जून --श्री सिद्धरामेश्वर

सर्व योगापेक्षा श्रेष्ठ शिवयोग (लिंगांगयोग) आहे. प्रथम सिद्धरामजी हटयोग, राजयोग, कर्मयोग, साधून म्हणजे अनेक अभ्यासयोग करून, बरीच अद्भुतसिद्धी(Occult Powers) प्राप्त करून घेतली होती. अग्नीनेत्र प्राप्ती पावली होती. परंतू शिवयोगींच्या समोर सिद्धयोगीना हरावे लागले. सिद्धराम प्रभूदेवाना शरण आले. चन्नबसवेशांच्याकडून इष्टलिंग दिक्षा घेऊन षटस्थळाला अधिकारी बनले. गुरुलिंग जंगमांचा प्रसाद घेऊन पावन झाले.

प्रणव पंचाक्षरीत मुक्त झाले. गुरुस्पर्शाने गुरु झाले. शिवयोग(लिंगांगयोग) एकच परिपूर्णयोग म्हणून समजून घेतले एक आश्चर्यकारक घटना म्हणजे, सिद्धरामेश्वरांच्यात आध्यात्मीक आसक्ती होती, सत्य मानण्याचा विवेक होता. श्रेष्ठता पाहून आनंदीत होण्याची सम्यकदृष्टी होती. ते अत्यंत किर्तीशाली होवूनसुद्धा लिंगबांधून घेऊन लिंगायत झाले, असे प्रांजळ मन सर्वाना नसते, इष्टलिंग का पाहीजे, म्हणून वाद घालणा-यांची संख्या, आज वाढत आहे. स्नान पूजा, जप, तप, न करणारे आळशी आपण फार मोठे विचारवंत म्हणून गैरसमज करुन घेतलेले त्याचबरोबर, आत असलेल्या आत्मलिंग पूजा करण्याचे सामर्थ्य आल्यावर इष्टलिंग का पाहीजे ? म्हणणारे इष्टलिंगाच्या अवश्यकतेबाबत संशय व्यक्त करतात. असे हे इष्टलिंग बांधून घेतल्याने काय उपयोग ? म्हणून बोलणा-यांची संख्या सुशिक्षीतात वाढली आहे. नास्तिकता पसरत असलेल्या आजच्या या काळात ते स्वाभावीकही आहे, आत आत्मलिंग आहे, पण ते भवरोग घालवणार नाही उदा. एक गाय आहे ती पडून तिच्या जांघेत जखम झाली आहे. वेदना होतात, डॉक्टरनी सांगितले की तिला तूप लावून चोळले तर वेदना कमी होतील. तेव्हा गाईचा मालक म्हणतो, ‘गाईच्या कासेत दुध आहे दुधात दही आहे, दह्यात लोणी आहे,लोण्यात तूप आहे, तर मग वरून तूप लावायची गरज काय ?' आपोआप बरी होईल, असे म्हटल्यास बरे का ? नाही त्यासाठी तिची धार काढून ते दूध तापवून विरजन घालून, त्याचे दही झाल्यावर ते रवीने घूसळून कोणी काढून ते लोणी तापवून जे त्याचे तूप होईल ते तूप लावल्याने त्या गाईची जखम बरी होईल तसेच आत असलेल्या आत्मलिंगाने आमचा नाही. त्यासाठी आत्मलिंगाला, सदगुरूच्या कडून इष्टलिंगाला तळहाती घेऊन, अनुसंधान केल्यानेच भवरोग दूर होईल. हाच विचार सांगणारे चन्नबसवेश्वरांचे एक वचन पाहूया.

गाईच्या देहात तूप असले तरी काय ?
ती गाय दिवसे दिवस पुष्ट होते काय ?
त्याकरीता त्या गाईला पोसून धार काढून
ते दूध तापवून, तूप कढवून त्याच गाईला पाजल्यास
ती गाय दिवसे दिवस पुष्ठ होते
तसेच आपल्यात वस्तू असली तरी काय ?
त्या वस्तूला गुरू, मुखाने तळहाती घेऊन
सक्रियाद्वारे प्राणात सामावून घेतल्या विणा ते प्राण लिंग होत नाही
कुडल चन्न संगैय्यात इष्टलिंगाला सक्रियाद्वारे प्राणाला सामावून
मी पणाचे अनिष्ट घालवल्याशिवाय
प्राणलिंग संबंध शक्य नाही
--चन्नबसवेश्वर ८७२

गुरुमुखाने इष्टलिंगाला तळहाती घेऊनच प्राणलिंग पहावे, असे या वचनात सांगीतले आहे.

भक्ती अभिव्यक्त करण्यासाठी किंवा पूजण्यासाठी एक वस्तू हवीच. अंतरंगात असलेला आत्मा असो, ब्रम्हांडात असलेल्या निराकार परमात्मा असो, त्यांना पूजता येत नाही. गर्मीणीच्या पोटात बालक असते तेंव्हा ती आपल्या पोटालाच थोपटत पाळणा गीत म्हटल्यास किती हास्यास्पद दिसेल? तेच बालक जन्मल्यावर, त्याला अंघोळ घालून पाळण्यात घातल्यावर आईने अंगाई गाईल्यास बरे दिसेल का ?

प्राण लिंगच परलिंग करून
इष्टलिंग पूजेचे दृश्य पहा
पाळण्यातल्या मुलाला अंगाई असते
गर्भातल्या शिशुला गायचे असते का
ती एक थट्टा होईल चिक्कैय्याप्रिय
सिद्धलिंग नसल्यामुळे --शरण घट्टीवालैय्या

पोटातले न दिसणारे मुल जन्मल्यानंतर, आईला सूख देऊन तृप्ती करून अंगाई गाऊन घेते. त्याचप्रमाणे देहात असलेले प्राण चैतन्यच परशिव लिंग मानून अज्ञानाने अद्वैत बोलणा-या लोकाना सत्याप्राप्ती शक्य नाही. म्हणून घट्टीबाटैय्या, शरणांनी त्यांच्या वचनात सांगितल आहेत.

पिंडात परमात्मा असलातरी परमानंद शक्य नाही. देहात देही असलातरी दिव्यानंद होणे शक्य नाही. शरीरात आत्मा असलातरी आत्मानंद होत नाही करण, तो सुप्तरूपात आहे. ते कसे म्हणजे आईच्या गर्भात असलेले शिशू तिचे मुख पाहू शकत नाही, ती आई आपल्या गर्भातील शिशूचे स्वरूप जाणू शकत नाही आमच्यावर लिंगदेवाची कृपा पडत नाही. गर्भातील शिशूला आई जन्म देऊन पाळण्यात झोपवून मला घेवून अंगाई गाईल्यास तिला फार आनंद होतो. तसेच अंतरंगात असलेल्या प्राणलिंग, शिशूला 'इष्टलिंग रूपात तळहाताच्या पाळण्यात घालून जोजवताना शरण रूपी आईला होणारा आनंद नास्तिक काय जाणणार वांझेला जशी अपत्याची माया कळणार नाही. तसे नास्तिकाना सुद्धा भक्तीरसाचा आनंद कळणार नाही. त्यासाठी आम्ही आई (भक्त) बनून लिंगानंदाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. हाच विचार व्यक्त करणारे षण्मुखस्वामींचे खालील वचन आपण पाहूया,

बघा ! बघा ! एक विचित्र
शिष्यरूपी पत्नीशी, श्री गुरूरूपी पती
हस्त मस्तक संयोग रूपी समन्वय केल्यास
षडाक्षर मंत्ररूपी विर्य स्खल्लन होवून
त्या शिष्यरूपी पत्नीच्या कर्णरूपी गर्भात प्रवेश केल्याने
मन गभीत होवून नयनरूपी योनीद्वारे
लिंगरूपी शिशूला जन्म देऊन तहहाताच्या पाळण्यात घालून
मंगलगीतरूपी अंगाई गाऊन
अखंडेश्वर म्हणून नाव दिले पहा
या कारणे तुम्ही आता मुलगा झालात
मी तूमची माता बनले अखंडेश्वरा --षण्मुख शिवयोगी ५६३

षण्मुख स्वामी यांनी आपल्या वचनात मार्मीकपणे सांगितले आहे.

' शरण श्री मग्गे मायीदेवानी आपल्या काव्यात सांगितले आहे की, 'लिंगधारणेमूळे मानवातले पाशवी गूण कोप पावतात. लाकडात असलेला अग्नी पेटवून बाहेर काढल्यावर ते लाकूड्च अग्नी बनतो. मग त्याला लाकूड म्हणून जशी भावना रहात नाहीश , तसेच आपल्यात, असलेल्या अतिसुक्ष्म प्राणलिंगाला गुरुने संस्कार विशेषद्वारे बाहेर काढून इष्टलिंग रूपात दाखवल्यावर, 'तत्संबंध,' घेतलेल्या शरणांच्यात अज्ञान कुठे ?

विश्वगुरु बसवेश्वरांची आपल्या एका वचनात सांगितले आहे की,

अंतरंगातील निराकार लिंग साकार लिंग होवून
आले माझ्या तळहाती असे लिंग
अंतरंगात व्यापून अंतर इंद्रियच किरण होवून
ते चमकणारे चित्अंशच प्राण लिंग
ते मुळ चैतन्यच भावलिंग याला जाणून पहाण्याची दृष्टी
भावपरिपूर्ण हावून स्वतः स्वत:ला समजल्या शिवाय
अखंड परिपूर्ण असलेला, लिंगदेव, तो दिसणार नाही
--धर्म गुरु बसवेश्वर १३६

इथे एक घटना आठवते, चर्मरोगाने, रोगी त्रस्त झाल्यास कोणतेही औषध लागू पडत नसेल तर, शेवटी वैद्याने सांगितले की अंगातील रक्त बाहेर काढून पुन्हा शिरवल्यास चर्म रोग बरा होईल, असे म्हणतात.'अंगात रक्त आहे. त्याच्यानेच माझा रोग बरा होईल. असा हट्ट केल्यास रोग कधीच बरा होणार नाही. देहात असलेले रक्त बाहेर येऊन पुन्हा देहात गेल्यावरच होईल.'

आणखी एक उदाहरण असे की, प्राकृतीक चिकित्सेत'स्वमुत्र प्रयोग चिकित्सा', चर्मरोग, नेत्ररोग इत्यादीला ही परिणामकारी चिकित्सा आहे. ताज्या मुत्राचे थेंब डोळ्यात घालणे, नेत्ररोगाला अत्तम परिहार आहे. मुत्राला वायुरहित बाटलीत सात दिवस ठेवून नंतर अंगाला चोळल्यास, चर्मरोग बरा होतो. शरीरातच मूत्र आहे, म्हणून गप्प बसल्यास ते कधीच बरे होणार नाही. ते बाहेर येऊन पक्व होवून, देहात पुन्हा शिरले पाहिजे. त्याचप्रमाणे भवरोगी शरीरातच लिंगदेव आहे. माझा भवरोग बरा होईल म्हंटल्यास ते होणार नाही. सद्गुरु अध्यात्मीक वैद्याने शरीरातील आत्म शक्तीला जागृत करून इष्टलिंग रूपात बाहेर काढून पुन्हा इष्टलिंगाची चित्कला आत घुसून संस्कार झाल्यानेच भवरोगरुपी व्याधीचा नाश होईल.

दगडी कोहशात अव्यक्त व सुप्त रुपाने अग्नी असला तरी त्याला बाहेरून अग्नी देऊन पेटवावे लागते. तेव्हा तो प्रज्वलीत होवून वाफ उत्पन्न करतो, त्या वाफेने आगगाडी ओढली जाते. तद्वत या पिंडात बरीच अध्यात्मशक्ती शक्ती असली तरी ती सूप्त रूपात आहे. गुरू तिला इष्टलिंग दिक्षा रूपी ठिणगीने पेटवल्याने अंतरंग ज्योत रूपी वाफ होवून मनरूपी आगगाडीला परमात्मा रूपी ध्येयाकडे ओढून नेतो.

डोळ्याची ज्योत व सूर्यप्रकाश मिळून वस्तूला पाहू शकतो. तसेच माझ्या व तुमच्या प्रकाशात लिंग दिसून आले. शरणांच्या या वाणीमध्ये गहनतत्व आहे. या बाबत आपण आता पाहू या आम्हाला एक वस्तू दिसावी तर, डोळ्याची ज्योत व सूर्यप्रकाश दोन्ही पाहीजेत. आंधळा असल्यास, सूर्य प्रकाश असला तरी वस्तू दिसत नाही. डोळे असले तरी सूर्यप्रकाश नसल्यास, वस्तू दिसत नाही. इतकेच नाही तर त्या सूर्याला पाहण्यासाठी सुद्धा त्याची रश्मी व आमचे डोळे पाहीजेतच ! त्याचप्रमाणे दिव्याला पहाण्यासाठी दिप्ती व डोळे पाहीजेत! माझ्या व तुमच्या प्रकाशात, लिंग दिसून आले म्हणजे, माझ्या अंतरंगाची ज्योत, (प्राणलिंग) ज्योतरूपी ‘दिप्ती व तुम्ही दिलेली, तळहातातील ज्योत, (इष्टलिंग) रूपी डोळ्याचा प्रकाश, दोन्ही मिळून, 'लिंगदेवरूपी', दिव्याला पाहणे शक्य झाले ! इष्टलिंगरूपी, डोळ्याविणा, आंधळे (भवी) होवून देवरूपी परवस्तूला, पहाणे शक्य नाही ! हा सिध्दांत आहे ! रश्मीने रवीला पहाण्यासारखे, चंद्रिका होवून चंद्राला पहाण्यासारखे दिप्ती होवून दिव्याला पहाण्यासारखे, चिज्ज्योती होवून, परमज्योतीला पहावे ! तेव्हा प्रत्यगात्म्यात, विलीन होतो !

इथे, एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहीजे की, 'वी', रश्मी, चंद्र, चंद्रीका, दिवा, दिप्ती, यांचा संबंध सोडून वेगळा न होणार, मिळून, एक न होणारा, ‘अविनाभाव', संबंध आहे! त्याप्रमाणे, सत्तस्वरुपाचे भावलिंग', चित्तस्वरुपाचे' प्राणलिंग', यांच्यातसुध्दा, अविनाभाव संबंध आहे! दिसायला भिन्न दिसणा-या या दोन्हीला, आनंदरूपी, इष्टलिंग','एकजीव', करतो ! 'भावलिंग व प्राणलिंग' हे वेगवेगळे आहेत. म्हणण्याची भ्रामक कल्पना, घालवून, त्या दोन्हीला एकजीव करण्याचे कार्य इष्टलिंग करते ! त्यासाठी 'इष्टलिंग' आवश्क आहे.

समाजात आणखी एका प्रकाराचे लोक असतात. त्यांच्यात अस्तीक व धार्मीक भावना असते. लिंग बांधून घेण्याची आसक्ती असते. पण त्यांच्या मनात काही गैौसमज असतात. लिंगबांधून घेतल्यावर, 'तीन वेळा किंवा दोनवेळा तर पूजा करावीलागेल,'आम्ही गावोगाव फिरणार, प्रवासात पूजेला, अडथळा येतो, पूजा चुकल्यास देव आमच्यावर रागवले, अम्हाला पाप लागणार, त्यापेक्षा लिंग न बांधलेलेच बरे', असे समाजात, ही फार चुकीची कल्पना' उदाहरणार्थ, 'चार लोक आहेत. त्यात, दोघे, गिरणीत कामाला, शंभर रुपये पगारावर जातात', उरलेले दोघे, निरुद्योगी होवून घरी बसलेत. ते गिरणीत कामाला जात नाहीत कारण, गिरणीत नोकरी धरल्यास अकस्मात आम्ही आजारी पडलो तर कामाला जाणे शक्य होणार नाही , चुकल्यास गिरणीचा ‘मालक' आम्हावर रागवेल व त्यावेळचा पगार देणार नाही अशी त्यांची वेडी कल्पना आहे.

आजारी पडल्यावेळी मालक रजा देतात. हेच माहीत नसल्यामुळे ते असे म्हणतात. त्यातूनही समजा ते गैरहजर राहीले तर फक्त त्या दिवसाचा पगार बुडेल इतर दिवसाचा तर मिळणार ना? असल्या अज्ञानाने ते निरुद्योगी होवून बसले परंतु गिरणीत नोकरी करणारे ते दोघे, महिन्याला तीन हजार रुपये घेतच रहातात त्याचप्रमाणे लिंग बांधून पुजणायाला, कितीतरी लाभ असतो ? पण बिन लिंगी लोक निरुद्योग्या सारखे, नुकसानीतच रहातात. अकस्मात काही घडलेच, तर पूजा न केल्याने लिंगदेव क्षमा करेल हे अम्ही विसरू नये ! तो इतका निर्दयी नाही !

पूजा न केल्याने पाप लागणार नाही. पूजा केल्याने पुण्य मिळणार नाही. पाप व पुण्य हा नैतीक प्रश्न आहे, ‘इतराना पिडल्यास पाप होणार', इतरांचे शुभ चिंतल्यास, पुण्य होणार. इष्टलिंग पूजा, पुण्यप्राप्तीसाठी, नसून परमात्म्याशी जवळीक साधण्यासाठी आहे. एक मात्र खरे की, लिंगपूजा केल्यामुळे पूजकाला पुण्यकरण्याची सद्भाव शक्ती' निर्माण होते. पूजा न करणा-यात पाप करण्याची दुर्भाव शक्ती वाढते. पण पुजा न करणारे सुद्धा पुण्य कार्य करु शकतात. ती मानवता नास्तिक सुद्धा नीतीवंत होवून राहू शकतो. पुण्य कार्य सुद्धा करु शकतो. अनितीवंत सुद्धा धार्मीक आसक्ती भाव असणारे असतात. वेशा अनितीवंत असल्यातरी तिच्यात भक्ती असू शकते. 'नीती व्यक्ती, व्यक्तीत असणा-या गोडसंबंधाचे प्रतिक आहे. 'धर्म, व्यक्ती व परमातमा त्यांच्यातल्या गोड संबंधाचे प्रतिक. तरी सुद्धा नीतीच्या आधारावर असलेला धर्मच श्रेष्ठ म्हणून वेगळे सांगणेची गरज नाही. निती नसलेला धर्म अर्थहीन होइल, त्याकरीता पूजा करणे शक्य नसल्यास, अंगावर लिंग सदैव राहीले पाहीजे. देहावर देव असल्यास त्या देवाला सोडून मी, वेगळा नाही. अशी अस्तीक भावना तरी नकीच असते.

एका खोलीत एक बालक अभ्यास करीत बसला आहे. असे समजूया, बाजूच्या खोलीत त्याचे वडील असतात. 'माझे वडील इथेच आहेत मला पहात आहेत, अशा आदरयुक्त भितीने, तो अभ्यासात रमतो. तसेच अंगावरील लिंग व्यक्तीला, नितीने वागण्याची व सतकार्याची प्रेरणा देते.

एक तरूणी एकटीच रात्री सिनेमा पाहण्यास जाते. येताना तिला फार भिती वाटू लागते, तशीच आणखी एक स्त्रि, आपल्या पतीसह गेलेली असते, तिला मात्र कसलीच भिती नाही. तो पती ‘काडी पहिलवान' असला तरी चालेल. तिला एकप्रकारची हिंमत असत. बरोबर पती असल्यामुळे ती पतीच्या मागून बिनधास्तपणे चालत असते. तसेच, अंगावर लिंग असल्याने 'देव पूढे आहे' रक्षक आहे,अशी हिंमत असते. याबाबत शरण, 'मग्गे' माईदेवानी, आपल्या एका काव्यात या प्रकारे, सांगीतले आहे, ते आपण पाहू.

स्मरण्यापेक्षा निरीक्षण महत्वाचे, स्मरण निरीक्षणापेक्षा
नित्य पूजा करणे महत्वाचे, स्मरण निरीक्षण व
नित्य पूजा करण्यापेक्षा इष्टलिंगाला अंगावर
नुसते धारण करणे महत्वाचे. निरूतम शिवाधव --मग्गेय मायीदेव

‘परवस्तू' झालेल्या इष्टलिंगाच्या स्मरणा पेक्षा 'दर्शन' अधिक महत्वाचे आहे. स्मरण व दर्शनापेक्षा सदैव पुजा करणे श्रेष्ठ आहे. त्या मंगलमय 'इष्टलिंगाला देहावर नि:संशय पणे, धारण करणे अत्यंत महत्वाचे आहे. मग आणखी काय पाहिजे ? लिंगायत धर्म इतका सोपा आहे.

आध्यात्मीक दुष्टीने व पूजण्याच्या दुष्टीने इष्टलिंगाची आवश्यक्ता किती आहे. ते आम्ही पाहीले 'लिंग पूजेमुळे लौकीक लाभ सुद्धा आहे.भक्त अष्टविधार्चनाद्वारे आपल्या अष्टांगाना पुष्ट करुन घेतो लिंगपूजेनंतर, लिंगाला चडलेले पाच बील्व पत्रे सेवन करावेत. बिल्व दलात बरीच औषधीशक्ती आहे. म्हणून पंडीतानी शोध लावला आहे. त्यांने शरीर निरोगी होते. इष्टलिंगाला दाखविलेले ' नैवेद्य' स्वीकारल्याने काया प्रसाद काया होते, त्यातून सर्वांगच निरोगी होते. नित्य नियमीत लिंगावर तिन वेळा शुद्ध जल वर्षवून 'गुरु बसव करूणोदक' लिंग देव करणोदक व जगंम (शरण) करणोदक म्हणून स्वीकारल्यास, ते दिव्य औषध' होवून दैवीक, मानसीक सर्वरोगांचा नाश करते. त्यातून जिर्ण शक्ती वाढून आयुष्यवृद्धी होते. त्यामुळे इष्टलिंग पूजा ही एक दिव्य औषध आहे. या विचाराला पुष्टी देणारे वैद्य संगण्णाचे हे खालील वचन आपण पाहूया.

नाना रोग येवून देहाला वेढल्यास
लिंगार्चनाची मुळी घ्यावी
सर्व फुलानी पूजा करून घ्यावी
पंचाक्षरी प्रणवाला न चूकता, त्रीकरणपूर्वक आठवावे
यातून सर्व व्याधींचे उच्चाटन होते
मरुळ शंकर प्रिय सिद्धरामेश्वर लिंग साक्षी होवून --शरण, वैद्यसंगण्णा

इष्टलिंगार्चनेमुळे पत्र पुष्पामुळे व मुळीव्दारे, शरीराचे रोग नाश पावतात प्रणव पंचाक्षरी मंत्राच्या जपामुळे भाव रोग नाश पावतात. आज लौकिक व परलौकिक दोन्ही दृष्टीने साधकाना इष्टलिंगाची गरज आहे. काही लोक आणखी वाद घालत असतात की, 'साधनेच्या सुरूवातीच्या अवस्थेत इष्टलिंग पाहीजे.नंतर व्यक्ती ज्ञानी झाल्यास, त्याची गरज नाही त्याच्या समर्थनार्थ ते एक उदाहरण सुध्दा देतात.

लहान मुले लाकडाच्या घोड्यावर बसुन झुलतात.त्यालाच सजीव घोडा समजुन आनंदाने खेळण्यात मग्न होतात पुढे मोठे झाल्यावर, ज्ञान आल्यावर,खरा घोडा समजुन घेतात त्यावर बसायलासुध्दा शिकतात, खरा घोडा सोडून लाकडाच्या घोड्यावर बसत नाहीत.

काही वाक अव्दैती लोक अध्यात्मम्हणजे, केवळ शास्त्र ग्रंथ वाचणे ऐकणे तर्क करणे इतकेच समजुन घेतलेले आहेत.त्याच्यात भावूकतेची संपत्ती नसते. दिव्यानुभुतीचे (Mystic Experience) ज्ञान नसतेयोग मार्गात चालणा-या भक्तांच्या दिव्यानुभवा बाबतची काही माहीती नसते. कर्मकांडवादींचे आचरण अर्थहीन असते. ज्ञानकांडवादींचे आचरण पोपटी असते. गुरूम्हणतात तुम्ही ब्रम्हआहात शिष्यही हे शब्द तोंडपाठ करून घोकू लागतो मी ब्रम्ह आहे,मी ब्रम्ह आहे.

अध्यात्मीक जीवनाचे सार सर्वस्व म्हणजे, काही दिव्य अनुभव तसेअनुभव प्राप्त करण्यास हे इष्टलिंग परम साधन आहे. त्याकरीता काही लोकांनी म्हटल्याप्रमाणे खरा घोडा आणि लाकडी घोड्याचे उदाहरण इथे लागू होत नाही. आई आपले मुल दूर असताना त्याच्या फोटोचा मुक्का घेते. परंतू तेच मुल जवळ असल्यास त्याचाच मुक्का घेते. फोटोचा घेत नाही. लाकडी घोडा असो, मुलाचा फोटो असो, हे सावयव वस्तूचे साकार आहेत. त्या वस्तूच सापडल्यास त्याच्या जडसाकाराची गरज नाही. पण दिव्यानुभव तसे नव्हे ते सावयव नाही तत्व निरवयव आहे. अवयव नसलेले तत्वाचे साकारच इष्टलिंग दिव्य अनुभव पाहीजे म्हंटल्यास इष्टलिंग हवेच हवे

समजा एक रेडीओ आहे, आज बातमी किंवा संगित ऐकलो पुन्हा याची काय गरज आहे म्हणून बाहेर काढून टाकतो का? नाही पुन्हा जेव्हा ऐकू इच्छितो तेव्हा पाहिजेच, इष्टलिंगसुद्धा तसेच आहे, सुलभरीतीने दृष्टी थांबवणे मन एकाग्र करणे अनेक प्रकारचे दिव्यानुभव देणारे अध्यात्मीक दूरदर्शनासारखे आहे. त्याला डाव्या तळहाती ठेवून सदैव पाहू शकतो.

आत्मीयतेने प्रेमाने इष्टलिंगाला पूजून साधनेत तल्लीन होणा-याला तेच प्राण होते. जीव केंद्र होते. उदाहरणार्थ काही लोक महात्मा गांधी प्रिय होते. त्यांचे सर्वस्वच म. गांधी होते. गांधीजीना अक्षरशः आपल्यात सामावून घेतले होते. गांधीजीची हत्या झाल्याची बातमी ऐक
यास, त्याला लिंगांग समन्वयाची अनुभुती झाली नाही असाच त्याचा अर्थ.

दिक्षाद्वारे इष्टलिंग घेऊन

दिक्षाद्वारे इष्टलिंग घेऊन(अथवा सुरुवातीला तसेच धारण करून) स्नान पूजेविना काही सेवन करणार नाही असा नियम घालून घेतल्सस व्यक्तीला संकल्पशक्ती आत्मबल संयम, वाढतो वाटेल तिथे जावून दिसेल ते खाऊन जिभेच्या लालुचीने आरोग्य बिघडवून घेणे चुकते.

अंगावर लिंगधारणा नसणा-याना बसवादी शरणांनी अनुभव मंटपात आश्रय दिले नव्हते ''काय ही मतांधता नाही?'' म्हणून काही जण विचारतात, ही मतांधता नव्हे. विशाल भाव आहे. जाती, वर्ण, वर्ग, रहीत, धर्मसहीत, समाज निर्मितीचे उद्देश ठेवून गुरु बसवेश्वरानी, विश्वाच्या आकारात विश्वात्म्याला सान करून त्याला समानतेचे चिन्ह म्हणून, घोषणा केली.' इष्टलिंग धारण केलेल्या सर्व बांधवानी काही तत्वसिद्धांताला बांधून घेतले पाहिजे म्हणून सांगितले. त्यामुळे इष्टलिंगधारणा ही कल्याणराज्य निर्मांण्याच्या विश्वासाला घट्ट करण्याची साधना झाली होती. त्याला न मानणारे जातीवादी वर्णवादी वर्गवादी याना या नवसमाजामध्ये प्रवेश देत नव्हते. बसवेश्वरानी स्थापन केलेल्या या लिंगायत धर्माना इष्टलिंग धारणाच प्रमुख प्रवेशद्वार आहे. त्या द्वारेच प्रवेश केला पाहीजे ते असणा-याशीच संबंध. असे हे एक श्रेष्ठ चिन्ह आज जाती सुचक दृष्टीने पाहीले जाणे दुर्दैव आहे. अजूनही ही चूक दुरुस्त करुन घ्यायला संधी आहे. तसे न केल्यास तो करंटेपणा ठरेल. पुर्वग्रहपिडीत नसलेले निर्मळ हृदयाचे कोणत्याही जाती मतांचे असलेतरी लिंगतत्वे समजल्यावर इष्टलिंग धारण करु इच्छितात. काही लिंगायतानी सुद्धा इष्टलिंगधारण ही एक जातीवाचक बाब म्हणून गैरसमज करुन घेतली आहे. परंतू हे इष्टलिंग जातीचे चिन्ह नसून जगात जातपात नसून देव एकटाच पिता, मानव सर्व त्याची लेकरे, जन्म व व्यससायाच्या आधारावर

कोणत्याही मानवाला धर्म संस्कारातून वगळूनये. अशी घोषणा करून विश्वपरिवारत्व सांगणारे विशाल तत्वाचे चिन्ह इष्टलिंग आहे. त्याला आमक्याने बांधून घ्यावे, तमक्याने बांधून घेऊ नये, असा अमानवीय भेद नाही ! जसे घड्याळ बांधून घ्यायला, जात आडवी येत नाही. वेळ कळण्यासाठी कुणीही बांधुन घेऊ शकतो, तसेच परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी, कुणीही इष्टलिंग धारणा करू शकतो. कारण, ते एक मुक्तीचे साधन आहे. भौतीक मौल्याच्या आधारावर जाती वर्ग विरहीत समाज निर्मिण्याची, इच्छा असणारे विळा व हातोडा या चिन्हावर विश्वास ठेवतात. तसेच, अध्यात्माच्या आधारावर जात वर्ग वर्ण रहीत, धर्मसहीत, शरण समाज निर्मिण्यासाठी इष्टलिंग धारणा केलीच पाहीजे. ही बाब काही जनाना विचित्र वाटेल पण हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. विश्वगुरू बसवेश्वरानी, ह्या तत्वाच्या आधारावर बाराव्या शतकात तसे सुंदर ‘कल्याण राज्य' करून दाखवल्याचा पुरावा आहे. स्वार्थी जनाला दुर सारून सात्वीक शरणानी एका व्यासपीठावर आल्यास आजसुध्दा ‘कल्याण राज्य निर्मितीचे स्वप्न साकार होवू शकते.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous लिंगांग योग व अनुभव इष्टलिंगाचे साकार रूप Next