Previous इष्टलिंग इवलासा झाला परमात्मा अर्चनेची आवश्यकता Next

नाद-बिंदू- कला

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

नाद-बिंदू- कला

एक योग साधक काही विशेष अनुभवासाठी सदैव तीव्र इच्छा करत असतो, त्याच्यात नाद अनुभव उक नंतर बिंदूचे अनुभव व कलाचा अनुभव हे लिंगांग साधनेत सुलभ साध्य आहेत.

उमटणारे नाद ऐकून, जळणारी ज्योत पाहून
वर्षावणारे अमृत प्राशन केल्यामुळे
घालवले मी जनन मरणाचे बंधन

उमटणारे नाद जळणारी ज्योत वर्षणारे अमृत हे तिन साधनेचे अमृत फळ आहेत.

नाद

सात पदरी तटाच्या किल्यात उंच भिंतीच्या मध्यावर
टाळ, मृदंग, डंका,घंटा, : श्री गुरूसिद्धा
ठरल्या वेळानुसार आपोआप उमटतात

शरण श्री सर्पभूषण शिवयोगी सांगतात',' सप्तधातुपासून झालेले शरीर हे सप्त-पदरी तटाच्या किल्लासारखे आहे याच्या मध्यवर, विविध नाद उमठतात. म्हणून त्यांनी आणखी एका वचनात सांगीतले आहे त्याचा अर्थ असा

बहिर्मुख वाहण्याचा स्वभाव असणा-या इंद्रियांच्या क्रियाची उपेक्षा करून हृदयकमळात अधोन्मुख झालेल्या अष्टदळात संचार करणाच्या जिवाला उर्ध्वमुखी, चार दलात संचार करण्यासारखे केल्यास झंकारासह उमटणारे, दशनाद आपण ऐकू शकतो. दशनाद म्हणजे, 'भ्रमर, शंख, मृदंग, टाळ, घंटा, विणा, डंका, दुटुंबी, समुद्र गर्जना, मेघ गर्जना, यातून उमटणाच्या नादाला समान असलेला नाद अंतरंगातच असतो, व लिंगांग योगी ते ऐकतो.'

पिंडात प्राण असतो हे सर्व जाणतात पण,
प्राणात शब्द असल्याचे कोणीही जाणत नाहीत.
प्राणात शब्द असल्याचे जाणतात, पण
शब्दात नाद असल्याचे कोणीही जाणत नाहीत.
शब्दात नाद असल्याचे सर्व जाणतात पण,
नादात मंत्र असल्याचे कोणीही जाणत नाहीत.
नादात मंत्र असल्याचे सर्व जाणतात पण
मंत्रात देव असल्याचे सर्वजण जाणत नाहीत
मंत्रात देव असल्याचे कोणीही जाणतात, पण
त्या देवात सामावण्याच्या अविरळ समरसाला कोणीही
जाणत नाहीत अखंडेश्वरा --श्री षण्मुख शिवयोगी

पिंड म्हणजे इथे पंचभूतात्मक शरीर (आत्म्याला सूद्ध पिंड म्हणतात) यात अतिमुख्य म्हणजे प्राण शक्तीचे संचलन प्राणशक्तीचे चलन थांबल्यास किंवा श्वास रोखल्यास देह निष्क्रीय होतो. जड शव होतो. जड पिंड श्वासाच्या सहायानेच काम करतो. असे पिंडात प्राण आहे. त्या प्राणाच्या मागे एक शब्द आहे, 'हंम् ‘सम्' हे शब्द, श्वास आत घेताना 'हो,' शब्द व बाहेर सोडताना, ‘सं', हे स्वाभाविक असते. त्या शब्दाला क्रमबद्ध केल्यास ते 'सोहम्' होते. स-अहम् म्हणजे तोच मी म्हणून उच्चारून त्यातून सं-हं काढल्यास ते ॐ होते हाच ओम्-कार नाद यांच्यात मंत्र दडलेला असतो. हे देवाचे स्वरूपच असते. परमात्म्याचे खरे अनुसंधान केल्यास त्याच्यात सामावण्याचे सामर्थ्य असते.

साधक अंतर्मुखी होवून बाहेरचा आवाज कानावर न येण्यासारखे ध्यानासक्त झाल्यास, एकेक होवून दशविध नाद ऐकू येतो. हा बाहेरचा नाद नव्हे, आतून उमटणारा नाद, अत्यंत सूक्ष्मपणे निरंतर हृदयाच्या गुहेतून निनादणारा ध्वनी आहे. उदाहरणः एक शब्द निरोधक खोली आहे. आतून आवाज बाहेर येत नाही. त्या खोलीला मोठमोठ्या काचेच्या खिडक्या आहेत, आत संगितकार वाद्ये वाजवीत आहेत. काचेतून त्याची हलचाल दिसते पण आवाज ऐकू येत नाही कांच त्यांचा आवाज बाहेर सोडत नाही. आम्ही दार उघडून जाऊ तेंव्हाच तिथल्या नाद माधुर्याची चव घेऊ शकतो. तसेच आपला प्राण त्याची हलचाल आपण देहाद्वारे ओळखू शकतो. पण त्याचे मूळ असलेल्या आत्म्यात दडलेल्या प्रणव नादाची चव घेता येईना. कारण आत्मा भोवती असलेले अवरण. हे अवरण ध्यान शक्तीने भेदून, आत घुसल्यासच आपण आत्म्याचा प्रणवनाद ऐकू शकतो.

बिंदू

नादानुसंधान सिद्धीच्या नंतर बिंदूचे अनुसंधान श्री सर्पभूषण शिवयोगींचे पद आपण पाहूया.

अर्धमिटल्या, डोळ्यांच्या बुबुळांच्या मध्यभागी
एक छिद्र आहे ते एकटक दृष्टीने पाहील्यास
कोटी विजांच्या प्रकाशासम
झगमगीत बिंदू पहाण्यातच आनंद

डोळे अर्धामिटलेले आहेत. दोन्हींच्या मध्यभागी भू मध्याचे एक लहान छिद्र आहे. रोखल्या दृष्टीने पहाणाच्या योग्याला एक असदृश्य प्रकाश दिसतो. कोटी वीजांचा प्रकाश पाहिल्याचा अनुभव होतो. यालाच दिव्य दृष्टी अंगिकारणे म्हणतात. यागीराज शिवाला असणा-या तिसरा डोळ्याचा संकेतच दिव्य दृष्टी संपादन. या अनुपम प्रकाशाला बिंदू म्हणतात. हा भौतिक दिवा किंवा नक्षलातून चमकणारा प्रकाश नव्हे हा आत्माचा प्रकाश आहे.

विशेषकरुन भूमात प्रकाशणारी ही ज्योत स्फटीक वर्णाची असते. आत्म्याचा स्वभाव सत् चित् आनंद स्वरूपी आहे. नाद आत्म्याचा सदुप बिंदू-त्यांचे चिदरूप व कळा त्याचे आनंदरूप आहेत. विविध अवस्थेत वेगवेगळे रंग दिसता दिसता, शेवटी शुभ्र धवल स्वरूपाचे बिंदू एकच दिसते.

कळा

आकायातील भरलेली घागर
धरतीवर सांडलेने सर्व मानव
शंभू लोकी गेले

इथे आकाश म्हणजे सहश्रदळ पद्म म्हणवणारे सहश्र चक्राच्या खाली बहाणारा चिदाकाश वैज्ञानिक भाषेत म्हंटले तरी यौगीक परिभाषेत चिदाकाश किंवा कुंभिणी स्वर्श म्हणतात.इथून एक प्रकारचे अमृत कळा वर्षाव करते. तिला चित्कळानुभव म्हंटले जाते हे लाभल्यावर आणखी काही बाबींची गरज नसते. त्याला असामान्य आत्मतृप्ती असते. ती मिळाल्यास सर्वांगात तन्मयता सामावते यालाच अमृतपान म्हणतात. हे प्राशन केलेल्याना अमृतसिद्धी झाली म्हणतात.

या चित्कळेला चंद्रकळाही म्हणतात. शिवाला तीन नेत्र आहेत हे सर्व जाणतात.उजवे नेत्र, डावे नेत्र, भू मध्यात नेत्र. डावे नेत्र चंद्राचे संकेत म्हंटल्यावर पुन्हा कोवळ्या चंद्राला जटावर का ठेवले हे योगीशिवाच्या चित्कला अनुभवाचा संकेतच. चंद्रकला हे सर्व विशेष अनुभव करून देणारे एक अपूर्व निधी इष्टलिंग अमुल्य संपत्तीचे भांडार उघडण्याची किल्ली ही आहे. जन्म जन्मांतरातून, चालत आलेल्या आत्म्याला वेटोळलेला देह हे एक अमूल्य भांडार परंतू सध्याच्या काळात काळोखाची हास आतल्या खोलीत भरली आहे. तळ हातात, संग्रहीत केलेली वीज तळहाती असून इष्टलिंगाच्या सहाय्याने दिव्य प्रकाशाच्या विजेला जागृत करून घेऊन, आत उतरून घेतल्यास चहूकडे प्रकाश पसरतो.

विद्युत् उत्पादन करणारे जनरेटर थांबल्यास त्याला चालू करण्यासाठी संग्रहित वीज वापरण्यासारखे प्राणविजेला चालना देण्यासाठी योगी जन इष्टलिंगाचे सहाय घेतात.

उदाहरणार्थ : एक घर अनेकप्रकारच्या वस्तूने भरले आहे. तिथे टेपरेकार्ड गात आहे. पंखा फिरत आहे, सुंदर दिवे जळत आहेत. समजा अचानक विज गेली तर हे सर्व थांबतात, बंद पडतात. वीज येताच पुन्हा सुरु होतात. त्याचप्रमाणे इष्टलिंगाला रोख लावून पहात त्राटक अभ्यासात मग्न झाल्यास तिथे जागृत होवून आत प्रवेश करणाया वीज संचारल्याने, नादानुभवरूपी टेपरेकार्डर गातो. बल्ब, ट्यूब, प्रज्वलीत होण्यासारखें, बिंदुचा अनुभव होवून, अपूर्व शक्ती जागृत होते.अशी दिव्य आनंदानुभूती सर्वागात पसरते. हे सर्व एकत्र करून गुरू बसवेश्वरानी आपल्या एका वचनात म्हंटले आहेत.

अंतरंगात असलेला निराकार परमात्मा साकार होवून
माझ्या तळहाती आला
असे लिंग माझ्या अंतरंगात सामावून
अतंरंगातील इंद्रियच किरण होवून
प्रकाशणारे ते चिदमशिकच प्राणलिंग
ते मुळ चैतन्यच भावलिंग --विश्व गुरू बसवेश्वर

नादबिंदु कळातील परमात्मा

परमात्मा परमात्मा त्याच्या एक अंश झालेल्या जीवात्माला, पिंडाडांत झाकुन ठेवला आहे. नाद, बिंदु व कळा आत्म्याला अस्तित्वाला जीवंत साक्षी आहेत. तर ब्रम्हांडात असलेल्या परमात्म्यांचे स्वरूपदर्शन कसे करावे ?

आकाशातील ज्योतीचा प्रकाश ये
जगात पसरल्याने त्याच्यात
सामावणाराच मुक्त

अत्त्युन्नत स्थितीत आकाशाच्या आत, बाहेर ज्योत भरल्यासारखे त्यात स्वत:असल्याप्रमाणे साधकाला अनुभव येतो.

प्रकाशातील प्रकाश, महाप्रकाश
देवा परमाशयच स्वता होवून
शतपत्र कमळ कर्णीका मध्यभागी,
स्वत:सिद्ध आहेत आमचे कूडलसंगमदेव --श्री गुरू बसवेश्वर ८१६

ब्रम्हांडात भरून उरणारा प्रकाश आपल्या सहस्त्रात भरून उरणारा प्रकाश.त्यात मी माझ्यात तो. अशा ओताप्रोत प्रकाशाला साधक पहातो व त्याचा अनुभव घेतो.

पूर्व दिशेला उगवलेला सुर्य चंद्रगुप्त शहरात बुडुन
छान छान प्रकाश दिसतो ॐ श्रीगुरू सिद्धा
थांबून पाहील्यास ती पोकळीच पोकळी सर्प भूषण शिवयोगी

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंग इवलासा झाला परमात्मा अर्चनेची आवश्यकता Next