Previous सामाधी लिंगपूजा नाद-बिंदू- कला Next

"इष्टलिंग" इवलासा झाला परमात्मा

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

'इष्टलिंग' हे परमात्म्याचे लहान झालेले रूप

‘जगविस्तार', 'नोविस्तार', या वचनात, बसवेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे, 'इष्टलिंग' हे परमात्म्याचे लहान झालेले रूप, अक्का महादेवीनी सुद्धा त्यांच्या वचनात असे सांगितले आहे.

बाप्पा, पाताळाहून खोल तुमचे श्रीचरण
ब्रम्हांडाहून ऊंच तुमचे शीर (डोके)
बाप्पा, दहा दिशाहून दूर तुमचे खादे
चन्न मल्लिकार्जुना, सान झाला तुम्ही
माझ्या करस्थळी येऊनी,
महादेवी आक्काप्रिय लिंगदेवा
-- ‘श्री अक्कामहादेवी'

सृष्टीकर्ता परमात्मा ब्रम्हांडाहूनी महान असले तरी इष्टलिंगाच्या रुपात, शरणांच्या करस्थळी सान होवून आला. म्हणजे, लहानशा आरशात प्रचंड हत्ती दिसल्याप्रमाणे, तसेच मोठ्या शहराचा फोटो लहान कॅमे-यात उमटल्याप्रमाणे तसेच परमात्म्याला बसवेश्वरांनी इष्टलिंगरुपात शरणांच्या, तळ हातात आणून दिले.

जगाला सामावून घेतलेले लिंग
माझ्या तळहातात आलेले पाहून
मला हर्ष झाला
गुरु लिंग जंगम स्वरुपात साकार झाला
अहा माझे, पुण्य, अहा ! माझे भाग्य
अहा अखंडेश्वरा
तुमची महानता बघून, माझ्या मनाला मंगल झाले --श्री षण्मुख शिवयोगी ६४

या सर्वजगाला आपल्यात सामावून या सर्वाला झालेले परशिव लिंग माझ्या तळ हातात येऊन, आपले 'घनस्वरुप' दाखवले. हे माझे पुण्य विशेष म्हणून आनंदाने ‘षण्मुख शिवयोगी’ सांगतात.

एक चमचा दुध पिल्यावर होणा-या तृप्ती पेक्षा एक वाटी पिल्याने, जास्त तृप्ती होते, पण अमृत एक थेंब, एक चमचा, एक तांब्या प्याले तरी तृप्ती तेवढीच होते. त्याचप्रमाणे शरणानी, परमात्म्याच्या घनस्वरुपाला इष्टलिंगात पाहून, परमानंद प्राप्त करतात. सृष्टी करता लिंगदेव अखंड परिपूर्ण आहे. त्यासाठी उपनिषदांमध्ये असे सांगीतले आहे.

ॐ: पूर्ण मदः पूर्ण मिदम्: पूर्णात् पूर्ण मुदच्याते:
पुर्णस्य, पूर्णमादाय पूर्ण मेवाव शिष्यते:
इश्या वास्यो पनिशत्

तेही पूर्ण हेही पूर्ण पूर्णातून पूर्णाचे निर्माण झाले पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्ण उरते त्या पूर्ण परब्रम्हाचे प्रतिक इष्टलिंग आहे.

अणुला अणु, महत ला महत्
म्हणविणा-या, लिंगदेवाला पाहिला मी माझ्या तळहातात
उपमातीत, वाक्य व मनाला न दिसणा-या
लिंग देवाला पाहिला मी माझ्या तळहात
शृती, ततीच्या शिरावर अत्यनिष्ठ, दशांगुल
म्हणविणा-या लिंगदेवाला, पाहिला मी माझ्या तळहातात
भाव भरीत ज्ञानगम्य
म्हणविणाच्या लिंगदेवाला पाहिला मी माझ्या तळहाती
षण्मुख शिवयोगी म्हणविणा-या
अनादी परशिवाला पाहिला मी माझ्या तळ हातात --श्री षण्मुख शिवयोगी ६५

तो आनादी परशीव अणू पेक्षा म्हणजे अत्यंत लहान वस्तू होवून, विश्वापेक्षा महान व विस्तार होऊन वाक्य व मनाला न दिसणा-या स्मृतीला न सापडणा-या परमात्म्याला तळहातात, पाहून 'श्री षण्मुख शिवयोगी आनंदाने गाईले.

वेद वदांताला असाध्य झालेले
अनुपम लिंग आणून दिले!
सदगुरुनी माझ्या तळ हाती नादबिंदुकळाला अभेध झालेले
अचलित लिंग आणून दिले
सदगुरुनी माझ्या तळ हाती वाड:मनाला न दिसणारे
अखंडीत लिंग आणून दिले
सद्गुरुनी माझ्या तळहाती, आता मी जगलो
मी अपेक्षिलेले मला सापडले लिंगदेवा
--गुरू बसवेश्वर १०२१

वेदांताना असाद्य झालेला, उपमा न देता येणारा, नादबिंदू कळातीत झालेला, वाकमनाला न दिसणारा सृष्टीकर्या लिंगदेवाला पाहून मी अमर झालो. म्हणून लिंगायत धर्म संस्थापक इष्टलिंग दाता गुरुबसवेश्वरांनी सांगितले आहे.

मी अपेक्षिलेले सालोक्य समिप्य
सांरुप्य, सायुज्य आहे, धर्म आहे, अर्थ आहे
काम आहे, मोक्ष आहे, माझ्या ध्यान जप तपातून
सिद्धी झालेले, महासिद्धी आहे, मी जे इच्छीतो
ते सर्व याच्यात आहे. श्री गुरु करुणेतून
महावस्तू तळ हातात आल्याने सर्व सुख आहे
आता भ्रमात ढकलू नये
अशी मी तुमच्याकडे मागणी करतो
उरीलिंगपेद्दी प्रिय विश्वेश्वरा --उरीलिंग पेद्दी

सदगुरुनी माझ्यावर कृ पा करुन माझ्या तळहाती इष्टलिंगदिल्यावर मी ब-याच दिवसापासून इच्छित असलेले सालोक्य, सामिप्य, सारुप्य, सायुज्ज हे पद धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ, ध्यान जप तपातून येणारी महासिद्धी, सर्वसुख मला प्राप्त झाले म्हणून उरीलिंगपेद्दीनी इष्टलिंगाचे महत्व पटवून दिले आहे. तुमची शपथ इथून पुढे लिंगाशिवाय हे सर्व प्राप्त करणे शक्य नाही. त्यासाठी, तशा भ्रमात मला ढकलू नये म्हणून शरणानी देवाला विनविले.

अशा उद्दात देवाचे स्वरूपदर्शन तळहातीच्या इष्टलिंगात पाहून अनुभव प्राप्त केले त्यांना लिंगाबाबत अशातशा गोष्टी बोललयास त्याना कसे सहन हाईल ?असे लिंग स्वरुपाचे वर्णन करणारे वचन वाचल्यास कसलाही नास्तीक असला तरी लिंग बांधून घेण्यास तयार होईल.

लिंग माझा पिता, लिंग माझी माता
लिंग माझी परमज्ञानमुर्ती
लिंग मुर्तीच्या चरणी, शरण होवून
लिंग मी झालो योगीनाथा
आज माझ्या तळ हाती आला परब्रम्ह
आज परमानंद आला
पुढे पळणाच्या मनाचे अज्ञान, घालवण्यास आलेल्या
पित्याला मी वंदितो योगीनाथा
--बसवयोगी सिद्धरामेश्वर

डॉ. ए. एन. वैटेड एक मलान तत्वदर्शी होते. त्यांची देवाची कल्पना, शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या, वरील वचनात येते. डॉ. वैटेड, आपल्या 'Process and Reality' या पुस्तकात सांगितले आहेत आधुनिक मानवाला प्रिय झालेला देव म्हणजे, सहानुभूती दाचवणारे, सुखसंदेश देणारे, सन्मार्गदर्शी व स्वत: संसारात सहभागी होवून, संसारी लोकाना सहानुभुती दाखवून, तो त्याना प्रेमाणे गोजारुन त्याच्याकडून प्रेम घेणारा देव आज हवा आहे.

लिंगच पिता होवून लिंगच माता होवून ज्ञानमूर्ती गुरुबनून मनातून अज्ञान काडण्यासाठी तळहातात आलेचे पाहून कुतज्ञतेने वचनकाराने वंदन केले आहे. मुलाने चूक केली असता पिता त्याला न्यायाधीशाप्रमाणे शिक्षा करतो, परंतू माता मुलाच्या चूकीला क्षमा करून पदराआड करते. पिता जरी निघूर असला तरी आई दयामयी असते. गुरु सन्मार्गदर्शक असतो. त्याचप्रमाणे, देव माता व पिताही आहे. गुरुही पतीही आहे, मित्रही आहे, व पुत्रही आहे. त्याकरीता आक्का महादेवीनी पतीच्या रुपात व विज्ज महादेवीनी पुत्राच्या रुपात देवाला पाहीले.

लिंगामध्ये जगत् सर्वम् त्रैलोक्यम सचराचरम्
लिंगबाह्यात, परम् नास्ती नस्मै लिंगाय ते नमः

सचराचर वस्तुला अंतरात घेऊन, या जगतालाच सामावून घेतलेले हे लिंग जगतरुप आहे म्हंटल्यावर, जगाच्याबाहेर कुठलीच वस्तू अशी असू शकत नाही. तशा ब्रम्हांड रुपी लिंगाचे महत्व जाणू शकतो. हाच विचार क्रांती कवी सर्वज्ञ यांच्या वचनात आहे.

लिंगाला कड कुठे ? लिंग रहीत स्थान कुठे ?
लिंगात जग सामावले,
लिंग सोडून कोण, सर्वज्ञा ?

लिंगाला शेवट नाही कारण त्याला आरंभ नाही. ज्याला आरंभ आहे, त्याला शेवट हा असलाच पाहीजे. आरंभ, अंत्यविणा लिंगदेव अनंत आहे. लिंग नसलेले ठिकाणच नाही, कारण लिंगदेव सर्वांतर्यामी सर्वभरीत आहे. विश्वात ओतप्रोत भरलेला आहे. लिंगामध्ये 'जगत्सर्वत्र म्हटल्याप्रमाणे, सर्व जगच आपल्यात सामावून घेतलेल्या लिंगाला सोडून कोणीच नाही. लिंग सर्वामध्ये सर्वत्र आहे. तशा प्ररब्रम्ह किंवा लिंगदेवाचे प्रतिरुप असलेले इष्टलिंग धारण करणारेच भाग्यवंत, म्हणून सवज्ञ कवी आपल्या वचनात सांगतात.

लिंगाला समजून घेतले नाही, तर कांही समजून उपयोग नाही
लिंग समजून घेतल्यावर, इतर कांही समजून उपयोग नाही
सर्व कारण लिंगच असल्यामुळे लिंगच समजून घेतलो
समजून, समजून, मी लिंग संगच करेन
त्या संगसुखातच मी तल्लीन होईन --श्री अल्लमप्रभु १०३४

"ज्याला समजून घेतल्यावर, सर्वच समजून घेतल्यासारखे होते,त्याला समजून घेतल्यावर इतर काही समजून घेण्याची गरज नाही!'' असे 'अल्लमप्रभुदेव', आपल्या वचन सांगतात. लिंगाचा प्रकाश पाहीलेल्या महानुभावीना, इतर काही समजून घेण्याची गरज नाही. या सर्वाचा कारणकर्ता लिंगदेवच म्हणून लिंगसंग केले मी म्हणून अल्लमप्रभू सांगतात.

न दिसणारे लिंग करस्थळी आल्यास
मला हे अश्चर्य, मला हे अश्चर्य
हो ! म्हणता येईना, नाही म्हणता येईन
गुहेश्वर लिंग, अप्रतिम निराकार
साकार होवून माझ्यातळहाती आल्यास
सांगता येईना, ऐकता येईना
--श्री अल्लमप्रभू ९०

न समजणारे समजून घेणे न दिसणारे पहाणे हेच अनुभव. अप्रतिम निराकार लिंगदेव चर्मचक्षुला दिसणे शक्य नाही. तरीसुद्धा, साकार होवून तळहाती आलेल्या लिंगाला अनिमिष दृष्टीने पाहून, ज्ञान चक्षुची निर्मिती होते. त्या तिस-या नेत्राने न दिसणारे निराकार देवाला पाहून हर्षीत झालो. 'होय','नाही' म्हणता न येणारे, द्वंद्वातीतच 'निशब्द. लिंगदेवाला पाहून बालकाने पाहिलेल्या स्वप्नाप्रमाणे चळीत होवून प्रभूदेवानी लिंगानंद समरसांची अपूर्व गोडी वर्णीली आहे.

विश्वतोमुख विश्वतोपाद,
विश्वतो बाहू, विश्वतो चक्षुः
विश्वव्यापी असुनी तुम्ही
माझ्या तळहाती आलात अखंडेश्वरा --षण्मुख शिवयोगी ७३

श्री षण्मुख स्वामीनी, देवाचे सुंदर स्वरुप आपल्या तळहातात पाहीले, म्हणून वेगळे सांगण्याची गरज नाही. खालील आणखी एका वचनात, 'सच्चिदानंद' नित्य परिपूर्ण वस्तू माझ्या तळहाती असल्यावर मला अन्य दैवतांच्या स्मरणाची चिंता नाही म्हणून सांगितले आहे.

सत् चित्त आनंद, नित्य परिपूर्ण झालेली -
परम वस्तु प्रत्यक्ष प्रगट होवून माझ्या तळहाती
आल्यास, अखंडेश्वर लिंग, माझ्या आतबाहेर
व्यापल्यावर, इतर तत्व समजण्याची चिंता मला कशाला? --षण्मुख शिवयोगी ७५

लिंग म्हणजे परात्पर वस्तू

लिंग म्हणजे परात्पर वस्तू, लिंग म्हणजे, 'परब्रम्ह लिंग म्हणजे, 'परशीव', लिंग म्हणजे, ‘लिंगदेव' लिंग म्हणजे, ‘परमज्योती', लिंग म्हणजे, 'चैतन्य' लिंग म्हणजे, 'निराकार, निर्गुण, निरंजन,नित्य परीपूर्ण लिंग म्हणजे,'आत्मा' अशा समन्वयसुंदर, लिंगाचे स्वरूप आम्ही समजून घेतलो.

असे परात्पर लिंग साकार होवून, शिष्याच्या तळहाती विराजीत होते. या इष्टलिंगातच तो, लिंगस्वरूप समजून, आचरून, सर्वांगलिंगी बनतो. त्याच्या प्राणात गंध ग्राहक शक्ती असलेले घ्राणत्व, आचारलिंग, बनून, त्याच्या मुखात शब्दच 'गुरुलिंग' होवून, 'वाणीच' ज्योतीलिंग होवून त्याच्या नेत्राचा प्रकाशच, ‘शिवलिंग' होवून कानातला नादच प्रकारलिंग होवून, त्यांच्या हृदयातील तृप्तीच महालिंग होते.

याप्रमाणे सर्वस्थूल शरीर, लिंगमय' करुन सर्वांगलिंगी बनलेले 'शरणच' लिंगदेवाचे खरे स्वरूप जाणतात. इतरांना समजणे शक्य नाही. आपणाला जे समजत नाही, ते समजणाच्याकडून घेतले पाहीजे. ही सत्यान्वेषी, दृष्टी. ती सोडून आपल्याला माहीत नसलेल्या विषयाबाबत असल्यानसल्या गोष्टी बोलणे उचीत नाही. इथे सांगितल्याप्रमाणे, लिंगाचे स्वरूप पाहिल्यावर कसलाही वाचक देव किंवा त्याच्या साकार इष्टलिंगाबाबत पूज्ज भावना ठेवेल. आम्हाला आत्मविश्वास आहे.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous सामाधी लिंगपूजा नाद-बिंदू- कला Next