Previous लिंगाग योगियांचे बहीरंग जीवन ‘इष्टलिंग’ म्हणजे काय ? Next

लिंगाचार

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

लिंगाचार

जगातले सर्व आस्तिक धर्म देव एकच म्हणून मान्य करतात. वैदीक धर्म सुध्दा परमात्मा एकच म्हणून वेव्दारे सांगत आहे. परंतू त्या धर्माच्या साधनेत एकदेव निष्ठा दिसत नाही व उपासनेत. अनेक देवतांची कल्पना रूढीगत असलेले ऐतिहासिक सत्य आहे. इस्लाम धर्मात असो, ख्रिश्चन धर्मात असो पूजण्यासाठी अनेक देवतांची कल्पना नाही. हे जगतात वाढण्याचे मुख्य कारण त्या धर्मातील एकदेवनिष्ठाच आहे. हे आपण स्पष्टपण सांगू शकतो. अशी एकरुपता असल्यामुळे ख्रिश्चन समाज किंवा इस्लाम समाजात विशेष करुन जातीमताचा भेद भाव दिसत नाही. तिथे परस्परात सहोदरत्व, भावना सामाजीक समता असल्याचे दिसुन येते. सर्व ख्रिश्चन बंधुना (कॅथोलिक व प्रोटेस्टंट) येशू पूज्य आराध्य गुरु बायबल त्यांचे धर्मग्रंथ व जेरुसलेम धर्मक्षेत्र तसेच इस्लाम बंधुना अल्लाह आराध्य देव, महमंद पैंगबंर धर्मगुरु कुराण धर्मग्रंथ व मक्का त्यांचे धर्मक्षेत्र सर्व धर्मानुयायीत हाच विश्वास असल्यामुळे या समाजात एकजूट शिस्त सहोदरत्व इत्यादी लक्षण आपण पाहू शकतो परंतु त्या धर्माचा अनुयायी आपले धर्मग्रंथच श्रेष्ठ म्हणून अतीविश्वास ठेवल्यामुळे कडवा अभिमान वाढून आध्यात्मात जास्त प्रगती झाली नाही.

इस्लामधर्मात अनुभव साहित्याचा अभाव आहे. हिंदू जन असलेल्या एकाच देवाची उपासना न करता अनेक संस्कार अनेक जातीमुळे समाज विघटीत झाला आहे. समान धर्म संहितानसल्यामुळे अनेक जाती मत, पंथाने फुट होऊन हिंदु समाज निरविर्य झाला आहे. त्यामुळे परकियानी शेकडो वर्षे इथे राज्य केले त्याच्या दास्याच्या सापळ्यात सापडून हिंदू समाज क्षिण झाला आहे. याला इतिहासच साक्षी आहे.

एकाच धर्मशास्त्राला हिंदूबद्ध न झाल्यामुळे त्यातल्या स्वानुभवाची महात्म्यांनी कालानुरुप अध्यात्म्याचा आकाशात उडून स्वानुभव साहित्य दिले. यादृष्टीने भारतासारखा देश नाही. जगाला भारताची काही देणगी असेल तर ती आपार अध्यात्मीक साहित्य म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो. परंतू हिंदूची सिद्धांत व साधना आचार व विचारात शेळी व हत्ती इतका फरक आहे. देव एकच असे म्हणत अनेक देवतांची कल्पना करुन पूजतात ''सर्वेजना सुखीनो भवंतू' असे म्हणतच शुद्र, अस्पृश्य म्हणून एक मोठा समाज निर्मुन त्यांना हीन भावनेने पाहीले. तोंडाने अद्वैत बोलून सर्व ब्रम्हच म्हणूनही मानवात अनंत भेद निर्माण केल्याचे दिसते. या हिंदू संस्कृतीचे विचार-आचार उक्ती व कृती सिद्धांत व साधना यांच्यात असलेल्या दरीवर सेतु बांधून विचार आचारात असलेला फरक शिवाचाराने परिहार करुन उक्ती व कृतीत एकरुपता आणण्याचा प्रयत्न करणारे प्रथम प्रवादी ''गुरु बसवेश्वर' आहेत. हे आम्ही निर्विवादपणे सांगु शकतो बोले तैसा चाले तर भवबंद निर्मीले असे सांगितलेल्या बसवेश्वरांनी उक्ती कृतीत आणून भारतीयांना अनुकरणीय झाले. सृष्टीकर्ता परमात्म्याचे स्वरुप दाखवून इष्टलिंगाद्वारे त्याची पूजा करायला सांगितले. एकदेवोपासनेच्या आधारावर त्यांनी जात्यातील समाजाची निर्मिती केली. परंतू त्यांच्या कल्याण राज्याची परिकल्पना भारतीयांना समजली नाही. ही दुर्दैवाची बाब आहे.

दोन तीन देव म्हणून
फुगून बोलू नये देव एकच पहा
दोन म्हणने खोटे
कूडलसंगमदेवा शिवाय नाही म्हटले वेद --श्री बसवेश्वर वचन ५४५

या वचनात गुरु बसवेश्वरांनी त्यावेळच्या समाजात रुढीगत असलेल्या अनेक देवता तत्वाचे खंडण करुन एकदेववादाला उचलून धरले आहेत. वेदाचा पुरावा देऊनच परमात्मा एक आहे. असे सांगितले अनेकांनी समजल्याप्रमाणे 'श्री बसवेश्वर' वेद विरोधी नव्हते. पण ते सांगितलेले सर्वच खरे म्हणनारे कर्मठ सनातनीसुद्धा नव्हते वेदाला कस लावून पारखून विवेकाला जे मान्य तेच स्विकारले. त्यांना कोणते वेद उपनिषेद आगम व पुराणसुद्धा ठामपणे प्रमाण ग्रंथ नव्हते. त्यांना साक्षी म्हणजे स्वानुभव व अंतरात्मा.

त्यासाठी वेदादी वाक्ये शरणांनी आपल्या स्वानुभव रुपी चाळणीत घालून चाळून कोंडा, कचरा व पोकळ दाणे रुपी खोटे विषय काढून टाकून नित्य तत्वच घेतले आहेत. उपनिषदांचे ज्ञान शैषांची भक्ती सिद्धांतायांचे कर्म जैनांची अहिंसा व बौद्धांची समता इत्यादी तत्वे शरणांच्या अनुभव मंडपरुपी टांकसळीत चांगल्याप्रकारे सोन्याचे अलंकार बनुन वचने आली शरण धर्म एकदेवोपासन ठामपणे सांगून बहुदेवतोपासनेचे तिव्र खंडन केले.

ब्रम्हाला जन्म देणारा म्हणतात
विष्णूला रक्षक म्हणतात
ब्रम्हाने स्वत:चे शरीर का निर्मिल नाही ?
विष्णूने आपल्या पुत्राला का नाही रक्षिले ?
दुष्ट निग्रह शिष्ठ परिपालक आमचा लिंगदेव --श्री बसवेश्वर ५४६

रुद्रच देव म्हणून आराधुन
शिळेत श्रद्धा ठेवून मिटले भक्तजन
विष्णूच देव म्हणून पूजून झाडाला फे-या घालून विटले
भूसूरादी ब्रह्मच देव म्हणून पूजून
अग्नीत जळले मर्त्य लेकीचे महाजन

वरील शरणांच्या वचनात ब्रम्ह विष्णून रुद्र इत्यादी दैवते देव नाहीत. म्हणून सांगितले आहे. ही नांवे एकाच देवाला अन्वय होतात. तेव्हां ब्रम्हा विष्णु व महेश्वर तीन वेगवेगळी दैवते नसुन एकाच परमात्म्याची वेगवेगळी शक्ती किंवा मुख म्हणून सांगू शकतो. एकच व्यक्ती आई वडीलांना पुत्र होतो, पत्नीला पती होतो, मुलांना बाप होतो. पुत्र, पती, बाप ही तीन नावे वेगवेगळ्या व्यक्तींची नसन एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या संदर्भात आलेली नावे आहेत. तसेच परमात्म्याला सृष्टी निर्मिल्यावर ब्रम्ह नांव आले. तिचे पालन करताना विष्णु नाव आले. तिचालय करताना महेश नाव आले.

अष्ठ मूर्तीना देव म्हणणारे, भ्रष्ठ भवी यांची गोष्ट ऐकु नये
कारण म्हणजे पृथ्वी देव झाल्यास पाण्यात विरघळते कशी?
पाणी देव असून अग्नीच्या प्रलयात आटते कसे ?
अग्नी देव असून वायूच्या प्रलयात विझतो कसा ?
वायू देव असून आकाशाच्या प्रलयात लय असा पावतो ?
आकाश देव असून आत्म्यात सामावतो कसा ?
आत्मा देव असून ढूंद कर्म अनुभवून
जन्म मरणात का बांधून घेतो ?
चंद्र सूर्य देव असून भवबंधनात सापडून दु:ख का अनुभवतात ?
याकारणे या आठ देहांना देव कसे म्हणावे ?
देवाचे देव महादेव महामहिम माझा मालक
अखंडेश्वर एकच देव उरलेले सर्व खोटे, खोटे!

सांप्रदायीक अष्ठ मूर्तीना अष्ठ देवता म्हणून पूजा करायला षण्मुखस्वामींनी विरोध केला आहे. ते सर्व प्रलयात सापडणारे असल्यामूळे देव नव्हेत म्हणून सांगितले.

देव एकच नांवे अनेक
परमपतिवृतेला पती एकच
इतरांना नमल्यास नाक कान कापणार
अनेक दैवतांचे उष्टे खाणायाला
काय म्हणावे कूडलसंगमदेवा -- श्री बसवेश्वर वचन ६१३

विश्वासू पत्नीला पती एकच पहा
विश्वासु भक्ताला देव एकच पहा
नको, नको अन्य देवांचा संग नको
अन्य देवांचा संग म्हणजे व्यभिचार पहा
कूडलसंगमदेव पाहिल्यास नाक कापेल --श्री बसवेश्वर वचन ६१६

गुरु बसवेश्वरांच्या वरील वचनात उद्दात तत्व आहे. ''एकम् सविप्राबहुधावदंती' ही श्रुतीची उक्ती. बसवेश्वरांच्या वचनात देव एकच नावे अनेक असे जोतिर्लिंग झाले आहे. ही उक्ती केवळ एक म्हणून होता कृती झाली होती. केवळ नुसत्या सांगण्यात देव एक नसून शरणांनी दृढ विश्वासाने एकाच देवाला एकाच स्वरुपात पूजले हिच एकदेवोपासना एकदेवोपासना ठामपणे आचरण्याची लिंगनिष्ठाच लिंगाचार, हे सूत्र सर्वांनी मानल्यास बहुतेक या जगात असलेला जातीवाद समूळ नष्ट होईल देवाला खरोखरच नांवरुप नसल्यामुळे अनेक नांवे, अनेक रुपाने देवाला पूजलेचे दिसते. कोणत्याही एका वस्तूला एक विशिष्ट नांव व एकच रुप असल्यास त्याला, अनेक नांव व अनेक रुप असल्याचे दिसत नाही. त्यासाठी नामरहीत परवस्तुला वेगवेगळ्या धर्मीयांनी वेगवेगळी नांवे दिली आहेत. परशिव, परब्रम्ह, अल्ला, महोवा इत्यादी नांवे सृष्टीकत्र्यालाच आहेत. परंतु एक विषय इथे लक्षात ठेवले पाहीजे कि, नांव रुप नसलेला देवाला कोणत्याही नांवाने बोलवा पण त्या नावाच्या व्यक्तींना देव समजून त्यांच्या नावांने पंथ, उपपंथ, निर्मून आमचा देव श्रेष्ठ तुमचा देव कनिष्ठ भांडणे चूकीचे आहे. शैव, शिवाच्या नावाने पूजून विष्णूची निंदा करणे वैष्ठव रामाला पूजून शिवाची निंदा करणे, मुर्खतेची परमावधी असा द्वेश करणाच्या दोघांना देव प्रसन्न होत नाही.

एक लहान.दृष्टांत

एका गुरुला दोन शिष्य होते. रोज गुरु झोपतेवेळी एकजण उजवा पाय दाबत होता दुसरा डावा पाय चेपत होता एके दिवशी गुरु उजव्या कुशीवर झोपले असता उजवा पाय डाव्यापायावर पडलेला पाहून डाव्या पायाची सेवा करणा-या शिष्याने काठी घेऊन डाव्या पायाला मारले. तेव्हा गुरुने कस बदलली तेव्हा उजव्या पायाच्या शिष्याने डाव्या पायाला मारले. तेव्हां गुरु उठून बसत म्हणाले 'अरे मुर्खानो' तुम्ही दोघे माझे पाय, माझे पाय म्हणून भांडत मलाच मारत आहात. म्हणून उपदेश करुन त्यांचा मुर्खपणा घालवला. त्याचप्रमाणे शिवाला वैष्णव विष्णला शैव परस्पर निंदिल्यास दोघेही ख-या परमात्म्याला निंदील्यासारखे होवून दोघांनाही परमात्माच मिळत नाही.

नुसते नामस्मरण केल्यास परमात्म्याची कृपा मिळत नाही. अंतरंगात सद्भाव असावा देवाला या मानव निर्मित भाषा समजत नाही. त्याला समजतो, फक्त भक्ताचा भाव मुळभाषा समजणा-याला अनुवादीत भाषा समजण्याची गरज नाही. त्यासाठी परमात्मा भक्तांच्या मुखातून येणा-या शब्दाला प्रसन्न होत नाही. तर त्या शब्दामागील सद्भाव व अंतरंग शुद्धीलाच प्रसन्न होतो परमात्म्याला एकाच रुपात पूजावे. म्हणून गुरु बसवेश्वरांनी ठामपणे सांगीतले आहे. गुरुने दिलेले हे इष्टलिंग, लिंगपती झाल्यामुळे त्या पतीला सोडून अन्य दैवतांची पूजा करु नये पतीव्रता आपल्या पतीला सोडून दुस-या पुरुषाशी रममान झाल्यास जसा गुन्हा आहे. तसेच शरण सती झालेला लिंग पूजक दुसरया दैवताला पूजणे पाप आहे. शरण सती लिंग, पती हा लिंगायत धर्माचा सिद्धांत आहे. इष्टलिंग बांधून इतर दैवतांची पूजा करणे बभिचार होतो म्हणून कठोर शब्दात सांगून गुरु बसवेश्वरांनी एकदेवोपासुनेचे महत्व सांगीतले आहे.

निर्मलात्मक शरण लिंग दंपतीना
आलदाने गुरु जगम भक्तगणा सम्मुखे
विवाह झालेले इष्टलिंग न सोडता सदैव अंगावर धारण केल्यावर
अधम मानवासम भुमीत रोवलेले मुर्ख भवी शैव देवताला नमन न करता
हृदयात दृढनिष्ठा झाल्यावर त्या सद्भक्तालाच इष्टलिंगाचा आचार

गुरु जंगम भक्तगण साक्षी होवून, निर्मलात्मक झालेले शरण व लिंगदंपतीला विवाहकरुन शरणसतीला, इष्टलिंगरुपी पतीला, सतत देहावर शारण करायला दिल्यावर मुर्ख मानवासारखे भूमीवर स्थापलेल्या अधम दैवताना नमन न करता आपल्या लिंगपतीवर निष्ठा ठेवल्यास तेच लिंगाचार म्हणून श्री ‘मैलार'बसवलिंग शरणांनी सांगितले आहे.

एकदवोपासनेबाबत आंध्रप्रदेशच्या जनप्रिय कवी वेमन्नानी एका वचनात असे सांगितले आहे की, “इष्टलिंग बांधून त्यावर निष्ठा न ठेवता, पर्वताला जाणारे पापी कसे म्हणजे, हातात लोणी घेऊन तूपासाठी रडण्या सारखे.

बसवप्रणित लिंगायत धर्म तिर्थक्षेत्र यात्रेलानत नाहीत म्हणजे जाऊच नये असे नव्हे. जाण्यामागचा हेतू महत्वाचा ऐतिहासिक स्थहे बघायला अथवा शरण महात्म्यांचे क्षेत्र दर्शन करायला किंवा तिथे काही ध्यान जप करुन स्पुर्ती घ्यायला करवत नाही. परंतू, तिथे जाऊन पाप परिहार करुन पुण्य संपादुन यावे अशा अंधविश्वासाला शरणानी विरोध केला आहे. गंगानदीत नुसती आंघोळ केल्यास पाप धुवून जाते अशा वृतीला त्यानी विरोध केला आहे.

परधनाची आशा परस्त्रि मोह, धोकेबाजी हे सर्व युग न सोडता कुठल्याही तिर्थात अंघोळ केल्यास काही उपयोग नाही. तीर्थक्षेत्र दर्शन व स्थावर लिंग पूजा विरोधाला अनेक कारने आहेत. ती कारणे त्या शरणांनी पाहूनच असे सांगितले असेल.मोठमोठ्या क्षेत्रात, पूर्वीच का आज सुद्धा कसले अन्याय चालतात हे समजण्यासाठी,'श्री दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थाप्रकाश' वाचुन पडताळा घ्यावा. पुजा-यांच्या मिठीत माकड सापडून धडपडणा-या भक्ताना पाहून गुरुबसवेश्वरानी देव देवळाला न जाता सरळ पणे अध्यगुरूची होवून देवात समावण्याचा मार्ग शोधून पूजण्यासाठी प्रत्येकाला इष्टलिंग दिले.

श्री दयानंद सरस्वती भारतात असणा-या सर्व उपासना क्रमाचे खंडण केले आहे. परंतू दुसरा मार्ग त्यांनी सांगितला नाही. त्यांची काही टीका मान्य नाही. गुरु बसवेश्वरानी तीर्थ क्षेत्रांचे खंडण केले असले तरी त्यांच्या बदलात सुलभ व वैज्ञानीक आधार असलेल इष्टलिंग रुपी उपासना. वस्तू देऊन साधकाना साधना करायला वाव करून दिला. त्यामुळे त्यांची क्रांती विधायक आहे. मुमुक्षांना फार सहायक झाली आहे.

शरणांच्या वचनाना केवळ शब्दश: अर्थ देऊ नये. त्यांची वचने एकेकदा ओठाना कडू व पोटाला गोड असतात. त्यांच्या वचनामागील भाव व कळकळ समजून घेतली पाहीजे. प्रत्येकांच्या हातात घड्याळ दिले असतानाही ते सोडून सुर्याकडे पाहून किंवा कोंबड्याच्या आरवण्यावर वेळ समजून घेण्याचा प्रयत्न करणा-याना बुद्धी सांगितली आहे.

मग्गेमायदेव शरणानी त्यांच्या एका वचनात असे म्हंटले आहे की, सुज्ञाना शरणांची पायधुळ जिथे पडली आहे ते स्थळच पुण्यक्षेत्र त्या शरणांचे पाय धुतलेले पाणीच पवित्र तीर्थ त्यांचे पदकमलच देव अचेतन भूतसंबंध मायात्मक झालेल तिर्थक्षेत्र दैवत या सर्व अज्ञ जनांच्या सेवेलाच योग्य आहेत त्यासाठी शरणाणी ही या प्राकृतीक क्षेत्राना जात नाहीत. असे मग्गे मायीदेवानी सांगीतले आहे.

तिर्थक्षेत्रात विशेषकरून यात्रा संदर्भा पहावत नाही पुण्यस्थान म्हणून गेलेले लोकच अनागरिकासारखे कुठे वाटेल तिथे मलमुत्र करून, त्या तीर्थजलातच हात, पाय, तोंड, धुवून पुन्हा तेच तीर्थ म्हणून प्राशन करतात. हे पाहील्यास कधीही येऊ नये म्हणून कोणत्याही नागरिकाला वाटते. क्षेत्रस्थळ अनारोग्य कारक असते. हे सांगायची गरज नाही. भारताच्या दारीद्रयाचे प्रतीक असलेले शेकडो भिकारी मार्गाच्या दोन्ही बाजूनी बसलेले पाहिल्यास, मनाला अतिशय दु:ख होते व अनेक गोष्टी, चोरी, व्याभिचार अन्याय, फसवणूक, इत्यादी अन्याय अनिष्ट तीर्थक्षेत्रात आपण पहात असतो. हे सर्व स्वत: पाहिलेले गुरू बसवेश्वर व शरणानी हा सामाजीक अन्याय, देव किंवा धर्माच्या नावाखाली चालणा-या या अनिष्टाला टाकण्यासाठी तीर्थक्षेत्राला जाऊ नये अंतरंगातच देवाला पहावे म्हणून ठासून सांगितले आहे.

एखाद्याचे मन दुखवून एखाद्याचा घात करुन
गंगेत बुडाल्यास काय होणार ?
चंद्र गंगेच्या काठावर असला तरी त्याचा कलंक सुटला नाही
याकारणे मन न दुखवणारा दगा न देणाराच
परम पावन पहा कपिलसिद्ध मल्लिकार्जुन --सिद्धरामेश्वर

सिद्धरामेश्वरांनी या वचनात फार उत्तम- विचार प्रकट केले आहेत. आपण केलेले सर्व पाप तिर्थ क्षेत्रात जाऊन अंघोळ केल्याने फिटते अशी कल्पना अनेकांच्या मनात असते. ते फिटल्यानंतर आणखी पाप करुन गंगेत बुडायला जातात. गंगेत स्नान केल्यास पाप फिटते असा विश्वास धरणे साहसाची गोष्ट आहे. भौतीक पाण्याने भौतीक शरीर स्वच्छ होते. पण पावन होत नाही. भक्तीरुपी पण दयारुपी रस पश्चातापाच्या आश्रुने धुवून घेतले पाहीजे. असे शरणांनी म्हटले आहे. इतरांना त्रास न देता सदाचारी सज्जन होऊन सद्भावाच्या पाण्याने मज्जन केल्यास पावन होता येते असे शरणांनी म्हटले आहे. याला एक सुंदर दृष्टांत आहे. एकदा गुरु नानक एका गावी मुक्काम करुन प्रवचन करत होते त्यागावी त्या गावच्या दोघा पुढा-यात परस्पर शत्रूत्व होते. एकजण दक्षिण भारत यात्रेला निघाला हे समजल्यावर उत्तर भारत यात्रेला दुसरा पुढारी निघाला. ते दोघे आपली कीर्ती वाढवण्यासाठी गुरु नानकांना आंमत्रीत केले.

तेव्हा गुरु नानकांना म्हटले की, मला कुठेही यायची आवड नाही. माझ्याबदली ही वस्तु देतो तुम्ही तीला तिर्थात बुडवुन आणा. असे म्हणून एकाला कडू भोपळा व दुस-याला कारले देतात त्याप्रमाणे त्या दोघांनी वस्तू तिर्थात बुडवून आणले व गुरु नानकांच्याकडे दिल्या. नानकांनी त्या भोपळा व कारल्याची भाजी करुन त्या दोघांना वाढले पुढा-यांनी ती भाजी तोंडात घालताच त्यांची तोंडे बघण्यासारखी झाली. तेव्हां गुरु नानकांनी विचारले “एवढे तिर्थ क्षेत्रात अंघोळ करुन आले तरी या भोपळा व काल्र्याचा कडूपणा गेला नाही.'

त्याच प्रमाणे कितीही तिर्थ क्षोत्रे केली तरी द्वेष असणारच हे गुण न गेल्यास काय उपयोग? त्यावेळी त्या दोघांनी उपरती साडी त्यांनी परस्परातील द्वेषभावना सोडून दिली.

भक्तांच्या घरेच अंगण वाराणशी म्हणने खोटे का?
भक्तांच्या घरच्या अंगणात अडुसैष्ट तिर्थक्षेत्र
असुन श्री शैल

वैराग्यनिधी आक्का महादेवींनी सांगतीले आहे. भक्तांचे अंगणच वाराणशी पेक्षा अधिक त्यांच्या अंगणताच सर्व तिर्थक्षेत्रे आहेत. होय, खरे आहे. शरणांनी पाय ठेवलेली भूमी पावन शरणांचा मुक्काम खरे कैलास शरणांचे क्षेत्रच अविमुक्तक्षेत्र म्हटल्यावर या तिर्थक्षेत्राला जाण्याचे कारण काय ? देवाला बाहेर शोधणे वेडेपणा म्हणून ते सांगतात.

दगडाचा देव, देव नाही, मातीचा देव, देव नाही,
लाकडाचा देव देव नाही, नाही पंचधतुचा
देव, देव नाही, सेतुबंध रामेश्वर गोकर्ण काशी केदार
इत्यादी अडुसैष्ट पुण्यतिर्थ
पुण्यक्षेत्रातील देव, देव नव्हेत
मी कोण म्हणून स्वताला समजून घेतल्यास
स्वत:चदेव पहा कूडलसंगमदेवा -- गुरु बसवेश्वर

दगड, माती, लाकुड व पंचधातूने केलेल्या मूर्ती देव नव्हे. तिरुपती, काशी, केदार, रामेश्वर, गोकर्ण इत्यादी क्षेत्रात व मंदिरात देव नाही. देव बाहेर आपल्यातच आहे. माती सोडून मडके नाही, स्वताला सोडून देव नाही असा भाव या वचनात व्यक्त झाला आहे. ब्रम्हांडात असलेले विश्वचैतन्य पिंडांडात आहे. याला समजून त्याचा शोधाचा प्रयत्नच अध्यात्म या अध्यात्म्याची उद्दात कल्पना समजून देवाला बाहेर न शोधता आपल्यातच शोधावे हे शरणांचे अभिमत आहे. देहातच देही किंवा देवाला पहा म्हणून शरण सांगतात. देवाला बाहेर शोधणे वेडेपणा नाही का ? त्याला एक दृष्टांत एका एक म्हातारी होती ती एक दिवस आपल्या झोपडीत सुई घालवली होती. गल्लीभर शोधुन ती थकली होती तेवढ्यात तिथे सन्यासी आला. तो तिच्या जवळ येऊन विचारु लागला आजी काय शोधतेस ? तेव्हां म्हातारी म्हणाली सुई हरवुन शोधत आहे. तेव्हा त्याने म्हटले कुठे हरवली ? तेव्हां तीने सांगीतले घरात हरवली. सन्याशाने हसुन म्हंटले घरात हरवलेली सुई रस्त्यात शोधतेस?''जिथे हरवली तिथे शोध'' तेव्हा म्हातारीने म्हटले तिथे कशी शोधु, तिथे उजेड नाही. इथे नगरपालीकेच्या खांबावरचा उजेड आहे. म्हणून शोधते. तेव्हा सन्याशाने म्हंटले जिथे हरवली तिथे दिवा लावून शोध म्हणजे सापडेल. असे सांगुन सन्याशी गेला.

भौतीक तिर्थ यात्रा करणारे म्हणजे म्हातारीसारखे घरात सुई हरवुन रस्तावर नगरपालिकेच्या प्रकाशात सुई शोधण्यासारखे यात्रीक आपल्यात आत्मतत्वरुपी सुई हरवुन आत अज्ञानरुपी अंधार आहे. म्हणून तिर्थक्षेत्ररुपी रस्त्यावर स्थान महिमेच्या प्रकाशात परमात्मा रुपी सुईला शोधत आहे. तिथे ती कशी सापडेल? त्या सन्याशाने असे त्या म्हातारीला जाणीव करून दिली. तसेच शरणांनी यात्रीकांच्या भोळ्या भक्तीला वळण लावून स्वतातच देवाला शोधावे म्हणून उपदेशी दिले आहे. इतकेच नव्हे तर स्वतातच देव पहाण्याची दृष्टी दिली पिंडाडात अज्ञानरुपी अंधार आहे. तर जिथे ज्ञान ज्योत नेऊन स्वरुप साक्षात्कार केले पाहीजे इथे आपल्याला एक संशय येईल लिंगायत सुद्धा इष्टलिंगरुपी बाह्यवस्तुची पूजा केल्यावर हे त्या म्हातारी(यात्रीक)सारखे अज्ञानी नव्हे का? असा प्रश्न येतो. लिंगायत शरण नुसत्या इष्टलिंगातच देवाला शोधत आयुष्य घालवले असल्यास ते सुद्धा अज्ञानी म्हणतील. परंतू ते तिथे न शोधता तळ हातीची ज्योत किंवा गुरुनी दिलेले इष्टलिंगाचे चित्काळरुपी ज्ञान ज्योत घेऊन पिंडाडात असलेल्या अज्ञान अंधकार घालवून आतील सर्व अंतकरण लिंगकिरण होवून झगमगीत चिदअंशिरुपी आत्मलिंगाचा साक्षात्कार करुन घेतात. किरण धरुण सुर्याला पहाण्यासारखे चिदमशिक (अंतरात्मा ) रुपी किरण धरुण मुल चैतन्य (परमात्मा) रुपी सुयला शरण पहातो. आंतरात्म्यातुन परमात्म्याला पाहून तो स्वता आत्म स्वरुपी बनतो. त्यासाठी वरील वचनात गुरु बसवेश्वरांनी सांगीतले आहे. स्वता स्वताला जाणून स्वताची ओळख करुन घेतल्यास तोच देव पहा कूडलसंगमदेवा. शरण देवाला अंतरंगातच शोधणारे अध्यात्म जिवी आहेत. इष्टलिंग म्हणजे ज्योत याला अनेक आधार देऊ शकतो.

लिंगाचार स्वयंम ज्योती प्रकाश इष्टलिंगीत
सदा सन्नी हीत कूडल चन्न संगा आपले शरण --चन्नबसवेश्वर

करस्थलाची ज्योत चिन्ह हे
जेडर दासीमैय्या

त्यासाठी शरणांनी करस्थळाची ज्योत धरुन देहरुपी गुहेत प्रवेश करुन प्राणलिंगरुपी देहीला पहातात. त्यांचा देहच देवालय झाले. असे देव निर्मित चैतन्यमय देहाचे देवालय सोडून मानव निर्मित जड क्षेत्र देवालयाला जाण्याची गरज त्यांना नाही. देह मंदिरात भाव सिंहासन करुन मरमात्म्याची पूजा करावी हे शरणांनी आचरुन दाखवले आहे

देहच देवालय असून वेगळे मंदिर का ?
प्राणच लिंग झाले असून वेगळे लिंग का ?
सांगितले नाही ऐकले नाही गुहेश्वरा तू दगड झाल्यास
माझी गत काय? --अल्लमप्रभू २९३

देवालयामुळे अनिष्ठ पाहून यापद्धतीला शरणांनी विरोध केला देहालाच मंदिर बनवून अंतरंगातच देवाला त्यांनी पूजले त्याला 'शरणे मुप्पीनषडारी यांच्या भावगीतात अत्यंत सुंदर व मार्मीकपणे प्रकट झाले आहे ते आपण पाहूया.

आता मला भीति कुठली ?

माझी काया तुझे देवालय झाली,
आता मला भीति कुठली कूडलसंगमदेवा - पल्लवी

माझे दोन पाय हे झाले उन्नत खांब
माझा देहच तुम्हाला देवालय
बाहू दोन हे माझे, टेकू आधाराचे
कळस असे सोन्याचा माझे मस्तक हे १

माझे कान किर्ती मुख घंटा माझी जिव्हा
माझे नयन हे दोन ज्योती पहा तुम्हा
मुख माझे व्दार हे दात माझे त्याला
चमकणा-या मोत्याचा झाला दागिना २

माझे ओठच व्दार, नाकच आहे माझे
परीमळ भरलेले पात्र
ढाळे सोन्याची चौरी आहेत
काय वर्ण मी इतर उपकरणे ३

जल माझी सोशीकता, गंध सद्गुण माझा
माझी नित्यताच, ही अक्षता
ज्ञान माझे कुसुम नैवेद्य माझी भक्ती
माझे मनच पुजारी तुम्हा 4

अशी पूजा ही तुम्ही स्विकारिता आनंदाने
भव हर शिव षडाक्षरी लिंग
माझ्या हृदयी तुम्ही निश्चींत विसावल्यास
चिंता कुठली आता मला भव भीतिची ५


शरण श्री मुप्पिन षडक्षरी यांनी, फार मार्मीकपणे पूजेचे वर्णन केले

पायच खांब झाले माझे
देहच देवालय
माझी जीभच घंटा, शिर सुवर्ण कळस
हे काय बाप्पा खरच लिंगाला सिंहासन झाले
गुहेश्वर, तुमची प्राणलिंग प्रतिष्ठा
पालट न होण्यासारखा मी आहे. --श्री अल्लमप्रभू १९५

लिंगांग संबंधी शरणांचा प्राणच लिंग झाले असून, त्या प्राणलिंगाला वायुरुपी मनच पीठ होऊन पायच खांब होऊन देहच मंदिर होवून, शिरच सुवर्णकळस होऊन सर्वकणेंद्रिय सेवक बनवून या प्रकारे शरण प्राणलिंग पूजा करतो म्हणून अल्लमप्रभूदेवानी या वचनात सांगितले आहेत.

धनवान वाधीत शिवालय -
देवा गरीब मी करु काय?
हे खांब त्याचे माझे पाय
मस्तक माझे सुवर्ण कळस कूडलसंगमदेवा ऐका
स्थावर नश्वर आहे, जंगम शाश्वत -- श्री बसवेश्वर ८२०

देहालाच मंदिर बनवून आपल्या हृदयातच असलेला प्राणलिंग देहातच असलेल्या देही देवाला पूजण्यास सांगून विश्वधर्माचे मुळतत्वाचा प्रचार केला आहे. येशू ख्रिस्त सर्वच मानवांना मान्य नव्हे, बूद्ध सर्वच मानवांना मान्य नव्हे, बसवेश्वर सर्वच मानवांना मान्य नव्हे, परंतू जगताच्या सर्व मानवांना हे सर्व पूज्य नव्हेत. आपल्या अनुयायांनाच पूज्य आहेत. पण जगताचा सर्व मानवांना सामान्य नव्हेत. तसे म्हटल्यास विश्वाच्या सर्व मानवाला मान्य असलेली वस्तू आहे का? ती सर्वांना प्रिय आहे का? हां, आहे हदय ही सर्वांना मान्य आहे. व ते नसल्यास कोणीच असणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे. अशा सर्व मानवजातीला सर्वमान्य असलेल्या हृदयात वास करणारा परमात्मा एकच आहे. तो जगाच्या सर्व प्राणीमात्राला सर्वसामान्य व पूज्य आहे. शरणांनी त्याची पूजा करण्यास सांगीतले आहे. त्यासाठी हा लिंगायत धर्म, मानव धर्म विश्वधर्म आहे. येशुला पूजा म्हणून त्यांचे अनुयायी सांगतात, बुद्धाला पूजा म्हणून बौद्ध सांगतात, शिवाला पूजा म्हणून शैव सांगतात, रामाला पूजा म्हणून वैष्णव सांगतात. परंतू विश्वधर्मी होणे शक्य नाही. बसवादी शरण अंतरंगात असलेल्या चैतन्याची पूजा करण्यास सांगतात देहालाच देवालय बनण्यास सांगीतलेला विश्वधर्म संदेश आजतागायतचे बुद्धीजीवी व निष्किल्मी हृदयाने चिंतन केले पाहीजे. तशी चिंतन करण्याची बौद्धीक प्रामाणीकता जेव्हा जनमाणसात येईल तो दिवशी लिंगायत धर्म विश्व धर्म होईल.

देहालाच देवालय करुन बाहेरच्या मंदिराला शरण मानत नसल्यामुळे त्या मंदिरातील परोपजीवी पूजारी व पूजारी पद्धतीला ते मानत नाहीत मोठमोठ्या क्षेत्रात पूजा-यांचे जीवन सुक्ष्मपणे पाहील्यास दु:ख वाटते त्यांच्याकडून पूजा नको म्हणून देव कधीच निघुन गेला असेल असे वाटते तशा पूजाच्याकडून तिर्थ घेणा-या भक्ताची गत काय होईल. सर्वच पूजारी असे असतात असे आमचे म्हणने नाही. परंतू ब-याच मंदिरात खुन, चोरी, व्यभिचार अन्याय हे पहायला मिळते. त्यामुळे शरणजी इतराकडून पूजा करुन पूण्य संपादण्यास न जाता प्रत्यक्ष देवाला पूजून भावनाश केले.

मंदिरात पूजारींनी भक्तीपूर्वक पूजा केलीतरी सुद्धा त्याचा लाभ लिंगाचार त्यालाच मिळतो. परंतू इतरांना मिळत नाही. पाप पूण्य एकमेकाला वाटता येत नाही. तसेच त्याची विक्री तर कधीच होत नाही. सत्कार्य व परोपकार करुन पूण्य संपादन केले पाहीजे पूजा करणे हे पूण्य संपादण करण्यासाठी नाही. भावबंधन पार करण्यासाठी किंवा मुक्ती मिळवण्यासाठी.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous लिंगाग योगियांचे बहीरंग जीवन ‘इष्टलिंग’ म्हणजे काय ? Next