Previous इष्टलिंग पूजा, देवाची पूजा इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा Next

इष्टलिंग पूजा जड पूजा काय ?

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

इष्टलिंग पूजा जड पूजा काय ?

बसवादी शरण जड, तामस भावनेच्या किरकोळ दैवतांना विग्रहांना मुर्तीना पुजणे निषिद्ध मानुन खंडण केले आहे. विग्रह आराधनेने अनेक अनेक अनिष्ठांना उलगडून दाखवले आहे. अनेक दैवतांची पुजा सोडवून एकदेवोपासना करण्यास जोर इदेऊन सांगितले आहे. काही लोक असा संशय व्यक्त करतात की, इष्टलिंग हे जड नव्हे का ? तर हे जड नाही. लिंगाच्या आतला भाग शिळेतुन केले गेले असले तरी कांतीयुक्त चित्कळासह बाहेरचे आवरण प्रतिकफलना त्मक आरसा हा वाकूपासून बनला असला तरी त्याला वाळु म्हणता येत नाही. कारण वाळूत तोंड दिसत नाही. आरशात तोंड दिसते. तसेच शिलेपासून लिंगाची निर्मिती असली तरी लिंगही शिला नव्हे कारण शिलेचे जडत्व कवच्याद्वारे मिटुन पुन्हा सद्गुरुंच्याकडून चित्कळा भरुन घेतली जाते गुरुकडून चित्कळा सन्नीहित झालेले इष्टलिंग हे शिळा ते केवळ शिला असेल तर तिथे साक्षात्कार होत नाही. परंतु शरण इष्टलिंगात आपले स्वरुप साक्षात्कार करुन घेतो.मुर्तीपुजा फार जुनी आहे. हडप्पा मोहोंजोदडोतच मुर्तीपुजा असलेचे दिसते स्वाभावीकपणे वैदीक धर्मात नाही. जैनांच्यापासून मुर्तीपुजा सुरु झाली म्हणून दयानद सरस्वतींनी सांगीतले आहे. कुपासूनही सुरवात होवो हे फार दिवसापासुन भातरीय किंवा हिंदुच्या जीवनात ती रक्तात भिनली आहे. यापासून हिंदू समाजाने फायद्यापेक्षा नुकसाण ज्यास्त झालेचे समाजशास्त्रज्ञांनी शोधुन काढले आहे. हिंदूच्यामध्ये अनैक्यतोला एक प्रमुख कारण म्हणजे मुर्तीपुजा असे एम. एन. रॉय डॉ. आंबेडकर श्री. दयानंद सरस्वती इत्यादी पंडीत व समाजसुधारकांनी आपला अभिप्राय मांडला आहे.

हिंदू समाजातील बहुदेवोपासुन सारखी अनिष्ट प्रथा घालवून एकदेवोपासुन मार्गाकडे आणण्याचा प्रयत्न केलेला प्रथम प्रवादी गुरु बसवेश्वर आहेत. त्यानंतर मुर्ती पुजा खंडीत करणारे श्री दयानंद सरस्वती ते पर्यायी एक उपासना वस्तु न दाखवता भक्तांना पर्यायी उपासना वस्तु देता सोडले पण बसवेश्वरांनी अंधश्रद्धेच्या पुजेचे खंडण करुण इष्टलिंगरुपी उपाश्य वस्तू दिले आहेत. " Bhakti needs on object of worship" भक्तीला उपाश्य वस्तुची गरज आहे. जसे झोपडीच्या घर बांधताना भिंत बांधल्यावर मुळचा आडोसा काढावा नाहीतर उघड्यावर रहावे लागते. गुरु बसवेश्वरांनी इष्टलिंग रुपी (भिंत) उपाश्य वस्तु भक्ताच्या हाती देऊन आडोसा सारखी मुर्तीपुजा काढून टाकली. श्री दयानंद सरस्वतींनी वेगळे घर बांधता घाईने गळके पाडले त्यांची समजा सुधारण्याची तळमळ व उत्साह मानन्या योग्य आहे. परंतु सामान्य माणसाला उपासणे काहीतरी एक वस्तु हवीच हे विसरता येत नाही मुर्तीपुजा केल्यास देव साक्षात्कार होत नाही का असे काहीजण विचारतात या प्रश्नाला दयानंद सरस्वतींनी साक्षात्कार होत नाही का इतकेच नव्हे तम मुर्ती पुजेचे पुजक जड बनती असे म्हटले आहे. पण आमचे म्हणने तसे नाही. कोळुरु, कोडगुसु, शिवलिंगात बेरड कन्नाप्पा स्थावर लिंगात मिराबाई कृष्णाच्या मुर्तीत रामकृष्ण परमहंस काली मुर्तीत साक्षात्काराचा साक्षात्कार अनुभव घेतला आहे. ऐतिहासीक सत्य आहे. तरीसुद्धाा मुर्ती म्हणजे विशिष्ट रुपाचे विग्रह आरधनेमुळे फक्त सगुण साक्षात्कार शक्य आहे. निर्गुण साक्षात्कार त्यातुन शक्य नाही. अठरा पुराणे लिहुन देवाला विविध रितीने पुराणीकरण केलेले मह ाहेर्षी व्यासांनी स्वताची चुक मान्य करुन आपल्या इलोकामध्ये असे सांगीतले आहे

प्रभु रुप रहीत असलेल्या तुला मी ध्यानातुन रुप कल्पीले आहे
जगद्गुरु स्तुतीन तुमच्या अनिर्वचनियतेचे खंडण केले आहे
भगवाण तिर्थ यात्रा आदीतुन तुमच्या सर्व व्यापकत्वाला नाकारले आहे.
जगदीशा माझे ह्या तिन्ही अपराधांना क्षमा करावी अशी त्यांना करुणा

भाकली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या मुर्तीतुन वेगवेगळे पंथ, उपपंथ निर्माण होतात विविध गटाचे उपासक परस्परात भांडतात मुर्ती पूजेमुळे वैयक्तीकपणे काही लोकांचे कल्याण झाले तरी सामाजीक दृष्टीने त्यातून नुकसानाच ज्यास्त आहे. समाज अभिवृध्दीचा बळी घेऊन वैयक्तीक, श्रेय साधने, उद्दात तत्व नव्हे. त्यासाठी चिंतन करुन इष्टलिंग शोधून दिले. या इष्टलिंगोपासनेने, वैयक्तक श्रेय व समाजाची अभिवृध्दी शक्य आहे. म्हणून आपण धैन्याने सांगू शकतो, इष्टलिंग पूजेने, लवकर आत्मा साक्षात्कार होतो. इतकेच नव्हे, तर अतिन्नोत अनुभुती व निर्मूण साक्षात्कार प्राप्त करु शकतो. इथे जातीयतेला वाव नाही. उपासना तर हवीच, मुर्ती पूजा नको. व्यक्ती व साजाचे, उभय कल्याण व्हायले पाहीजे, असे हिंदुसमाजाला वाटल्यास, लिंगतत्व, स्विकारुन, शरण मार्गाने, चालण्याचा एकच पर्याय, हा क्रांतीपुरुष बसवेश्वरांचा, अभिप्राय होता. त्यानी दिलेले इष्टलिंग, हे फक्त लिंगायतांचे नव्हे तर इतर सर्व साधकांचीही संपती आहे. ही अखिल मानवी समाजाची संपती आहे. सर्वांनी, इष्टलिंग दिक्षा घेऊन पूजा करावी, तसा काळ लवकर येऊन भारतीय समाज सर्वांगीण उन्नती व ऐक्यता साधावी असे आपण शुभ इच्छितो.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंग पूजा, देवाची पूजा इष्टलिंग पूजा व मूर्ती पूजा Next