Previous इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा व धार्मिक समानता Next

‘लिंगायत धर्मात इष्टलिंगाचे स्थान’

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

लिंगायत धर्मात मुख्य धार्मीक चिन्ह म्हणजे इष्टलिंग

लिंगायत धर्मात मुख्य धार्मीक चिन्ह म्हणजे इष्टलिंग, विभुती, रूद्राक्षी, मंत्र, करणोदक व करूणप्रसाद मंत्र अंतरंगात जपले जाते देहावर स्पषटपणे दिसणारे म्हणजे ’विभुती’ रूद्राक्षी व 'इषटलिंग’ विभुती व 'रूद्राक्षी' शिवभक्त म्हणणारे सर्वजण धारण करतात. परंतु लिंगायत धर्मानुयायीना विशिष्ट व विशेष चिन्ह म्हणजे इष्टलिंग एकच. उरलेले धार्मिक चिन्ह विभुती रूद्राक्षी इत्यादी पोषक म्हणून.

त्याचकरिता इष्टलिंगाधारकांच्या धर्माला लिंगायत धर्म किवा लिंगवंत धर्म म्हणुन नाव आहे याशिवाय शरण धर्म बसवधर्म म्हणुन सुद्धा संबोधले जाते ही पदे समाजामध्ये रूढ झाले आहे.

लिंगवंत

इष्टलिंगधारणाच या धर्माचा जिव्हाळा आहे अनुयायीपुकारण्यासाठी 'लिंगवंत',' लिंगायत' हे पद योग्य. बसवेश्वराच्या बाबत सांगताना , चन्नबसवेश्वरानी असे पद प्रयोग केले आहेत,

१) शीलवंत सारे शीलवंतच, कुडल चेन्नसंगैय्यासंगत बसवेश्वर एकटेच लिंगवंत - चेन्न बसवेश्वर ११३७

२) लिंगलक्षणवंत बसवेश्वर, लिंग श्रीमंत बसवेश्वर लिंगसौभाग्यवंत बसवेश्वर - चेन्न बसवेश्वर

या सर्व विशेषणात भर देउन सांगितलेले पद 'लिंग' याचे धर्मानुयायी लिंगवंत.

३) अर्पीत ,अनर्पीत, दोन्ही गमावून उभे रहाणाराच लिंगवंत म्हणतो.

४) लिंगवंत लिंगवंताला, बुध्दी सांगताना, अवगुणाचा राग करतात पण चिन्हाचा नाही- श्री बसवेश्वर

लिंगधारी असलेला एक अनुयायी, दुस-या सहधर्मीयाबाबत राग केल्यास, त्याची चूक दुरूस्त करण्याचा उद्देश असतो. जीव हरण करण्याचा उद्देश नसतो. म्हणून सांगण्यात लिंगवंत हे पद या धर्मानुयायाला अत्यंत योग्य असते.

सुप्रभाती लिंगदर्शन
दिवसात जंगम दर्शन सुखदायक सुखदायक
समयशील लिंगवंताला हेच पथ्य
सद्भक्ताता पथ्य सुखदायक
कूडल चेन्नसंगैय्यात अर्पीत लिंगैक्याला -- चेन्न बसवेश्वर १३५

आपल्या धर्माला, (लिंगायत) लिंगवंत म्हणूनच नांव दिलेले गुरु बसवेश्वरांनी त्याचे मर्म इतरांना समजत नाही म्हणून या वचनामध्ये सांगितले आहे.

अंग, लिंग, संग, सुख, मुक्तीचा अनुभव
लिंगवंताशिवाय, इतराना शक्य नाही -- श्री बसवेश्वर ११७४

या धर्माचे अनुयायीत्व जन्माने न येता आचरण व लिंगधारणामुळे येत असून हा लिंगायत धर्म या धर्माप्रमाणे जन्मापासून, सर्वजण मानव व भवी असतात. ते ईश्टलिंग दीक्षा दिल्यानंतर कोणीही 'भक्त' व 'शरण' बनू शकतात. विद्या असणारा विद्यावंत ,धन असणारा धनवंत, बुद्धी असणारा बुध्दीवंत शील असणारा शीलवंत, नीती असणारा नीतीवंत त्याचप्रमाणे लिंग असणारा लिंगवंत. इष्टलिंग नसणारा म्हणजे लिंगावत नव्हे,तो केवळ अंगवंत.

बाप विद्यावंत असून, मुलगा अविद्यावंत असेल तर कसा विद्यावंत म्हणू शकेल ? बाप शीलवंत असलातरी, मुलगा व्रात्य असेलतर, शीलवंतपणाने मुलगा कसा शीलवंत होईल? तसेच बाप लिंगवंत असून मुलगा लिंगधारण केला नसल्यास तो कसा लिंगवंत होईल ? तसेच विद्या, नीती, झील, बुद्धी, धन कुणी मिळवल्यास ते विशेषण येते तसेच लिंगवंत तत्व आचरणानेच येते. जन्माने नव्हे. आई बापापासून नव्हे.

लिंगायत

लिंगवंत, लिंगायत, ही समानार्थी पदे. लिंगायातालाही, लिंगवंत, लिंगायत, म्हणून संबोधतात. लिंगायत शब्दच, इतर दोन्ही शब्दापेक्षा प्रचारात आहेत. असे पि. व्ही. नारायण म्हणतात. ‘तरी लिंगायत शब्दच वचनामध्ये दिसत नाही, तो अलिकडचाच शब्द आहे' म्हणतात. तेही चुकीचे आहे.

देह नाम शोभत नाही लिंगायताला
मानव नाम शोभत नाही जंगम भक्ताला


म्हणून चेनबसवेश्वरांनी १२४४ व्या वचनात धनवान म्हणजे धन असणारा, भाग्यवान म्हणजे संपत्ती असणारा, त्याचप्रमाणे लिंगवान म्हणजे लिंग असणारा. आयत म्हणजे धारण करणे. गुरुंच्याकडून लिंग घेवून अंगावर धारण करणे. स्वत:च लिंग घेवून धारणकरणारा तो लिंगवंत नव्हे.

गुरुंच्याकडून दिक्षा, मंत्रोपदेशाव्दारे, इष्टलिंग मिळवीणारा, तो लिंगायत संक्षीप्तपणे सांगणे म्हणजे गोलाकार इष्टलिंगाला अंगावर धारण करून, पूजायला सांगणारा हाच लिंगायत, परमात्म्यावर विश्वास न करता अहिक मौल्यावरच विश्वास ठेवणे हा लोकायत वाद आहे. डोळ्याला दिसणारे जग, याला सत्य माणून न दिसणाच्या दिव्यानुभवालाच सापडणा-या परमात्म्याला सुद्धा, सत्य मानून लौकिक व पारलौकिक दोन्ही मुल्यांना लिंगायत धर्म स्विकारतो.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा संस्कार इष्टलिंग दिक्षा व धार्मिक समानता Next