Previous लिंगाचे स्वरूप इष्टलिंग दिक्षा संस्कार Next

क्रांतीकारी इष्टलिंगाचा उगम

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

क्रांतीकारी इष्टलिंगाचा उगम

बाराव्या शतकात 'लिंग’ चिन्हाने नवीन अर्थ व्याप्ति कर्तव्य व जबाबदारी स्विकारली ती, 'क्रांती पुरुष', बसवेश्वरांच्यामुळे! ‘स्थावरलिंग' व इष्टलिंग यातल्या फरकाबाबत विस्तारपूर्वक लिहीत आहोत स्थावर लिंगांच्या पूजेत.

१. ‘मंदिरामुळे पुजारी', त्या पुजा-याच्या मध्यस्थिने पुन्हा जातीच्या भिती दर्शनासाठी ‘मोबदला', वेळेचे बंधन, अभिषेक व विशेष पूजेमुळे, धनाचा अपव्यय, होत असे !

२. स्थावर लिंग', किंवा 'चरलिंग', हे केवळ भक्तीची तृप्ती करणारे श्रध्दा केंद्र होते. पण योगाभ्यासाला पूरक नव्हते.

३. स्थावर लिंग’, ‘चरलिंग', हे मानवी समाजाला एकत्र करुन समाज बांधण्याचे सूत्र झाले नाही पूजा करणारे सुध्दा आपापसात, 'रोटी बेटी', व्यवहार करत नव्हते.

४. स्थावर', व 'चरलिंग', पुजकात दिक्षेनंतर सुध्दा पुर्वाश्रयाचा नाश होत नव्हता. वर्ण भेद जातीभेद सुटत नव्हता.

बसवेश्वर, त्यांच्या बालपणापासूनच, एका गूढ चिंतनात मग्न झाले होते. तात्वीक आधारावर एक चिन्ह शोधून त्याच्याद्वारे सामाजीक समानता, साधून धार्मिक स्वातंत्र्य सर्वाना देणे, हा त्यांचा उद्देश होता. विशेष अनुभूताला साधन होणारे योगाभ्यासाला सहकार्य होण्याचा भक्तीमार्ग, निर्माण करण्यासंबंधी त्यांनी चिंतन केले होते. त्या दृष्टीकोनातून, त्यांना समाज अध्यात्म विज्ञानी (socio-spiritual-scientist) म्हणून ओळखले जाते.

एके दिवशी त्यांचे स्वप्न साकार झाले. निराकार परमात्म्याला, मानवांच्या, प्राण्याच्या आकारात न कल्पीता, विश्वाच्या आकारात म्हणजेच गोलाकारात, निर्मिती केल्यास, अत्यंत योग्य, होईल! हे विचार त्यांच्या मनात स्फुरले इतकेच नाही. तर, ‘परमात्म्या इतकीच महत्वपूर्ण वस्तु जीवात्मा आहे!' अंगलिंग ‘समरस', हेच शिवयोगाचे ध्येय ! त्याकरीता, देहाच्या आकारात, जीवत्म्याचे चिन्ह, पंच सूत्र लिंग ठेवून, विश्वात्मा, लिंग व अंग, जोडणाच्या संकेतात, काळी कांती(कवच) दिले. ते गोलाकार, व चमकणारे आहे ! कल्पना कृतीचे साकार झाल्यावर न्हणजेच, त्यांचे संशोधन, यशस्वी झाल्यावर, त्यांना फार हर्ष झाला !

आता मी जगलो - आता मी जगलो
मी अपेक्षिलेले आज मला सापडले --श्री बसवेश्वर १०२१

म्हणून त्यांनी हर्षाने उदगार काढले. विश्वकुटुंबत्व पटवून देणारे व साधणारे, ’इष्टलिंग', निर्मीती झालेला तो दिवस, केवळ बसवेश्वरांच्या जीवनातच नाही, तर जगाच्या इतिहासातच, चीरस्मरणीय, सुदिवस. इष्टलिंगाचे सुत्र व साधन घेऊन जात, वर्ण, वर्ग रहीत,धर्म सहीत समाज बांधण्याचा संकल्प, 'श्री बसवेश्वरांच्या हृदयात', स्फूरलेला तो शुभ दिवस, बसवक्रांतीचा दिवस आहे !

गांधी म्हणून आडनांव, ‘महात्मा गांधी', 'इंदिरा गांधी', 'संजय गांधी', या सर्वांच्या नावात आहे, तरी या सर्वांचे व्यक्तीत्व, वागणे वेगवेगळे आहे. त्याप्रमाणे लिंग हे पद 'स्थावर लिंग', 'चरलिंग' व 'इष्टलिंगात' असले तरी, या धर्म चिन्हाची व्याप्ती, वेगवेगळी आहे. 'निराकाराला आकार दिला' (निलांबिका). "शरीरातच गुरु लिंग जंगम धारण करण्यासाठी तळहातावर चिन्ह दिले" (चामरस). इष्टलिंग ही विश्वगुरु बसवेश्वरांची 'श्रेष्ठ देणगी आहे' हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

विविध स्तरात वाढत आलेल्या रीती

देवाची कल्पना व उपासना, मानवी इतिहासात तीन स्तरावरुन वाढत आलेली आहे, म्हणून बरयाच धार्मीक तत्वज्ञान्यानी यांचे म्हणणे आहे. हिंदू समाजात आज सुद्धा ते तीन स्तर स्पष्टपणे दिसून येतात.

अधिभौतीक : निसर्गातील स्थूल वस्तू असलेल्या, सुर्य, चंद्र, अग्नी, पर्वत, नदी, वृक्ष इत्यादी दिसणाच्या वस्तूला दैवीशक्ती म्हणून पूजा करणे ही आदिभौतीक कल्पना आहे.

अधिदैवीक : निसर्गामागे काही दैवी शक्ती असेल म्हणून, विविध आकारात कल्पना हीच आधिदैविक ढगामागे मेघराजा गंगेमागे गंगादेवी, वान्यामागे 'वायुदेव' विविध गोलामागे गृहाना कल्पून आकार देणे हीच आदीदैविक कल्पना आहे.

अध्यात्मीक : ब्रम्हांडात सगळीकडे एक महान चैतन्य भरुन डचमळत असून ते आपल्यातही आहे. असे समजून पिंडी ते ब्रम्हांडी भरलेल्या चैतन्याला ओळखून पूजा करणे हीच अध्यात्मिक कल्पना. इवलासा झाला परमात्मा लिंगपूजा सुद्धा, या तीन स्तरावर वाढत आल्याचे ओळखले जाते.

अधिभौतीक:

प्रथम आकाशाचे प्रतिक होऊन लिंग आदीमानवाने कल्पीले असावे, आकाशातून येणारे प्रकाश व पाऊस पाहून आपणाला अति अवश्यक असलेले प्रकाश व पाऊस देणा-या या आकाशात कोणती तरी एक अद्भुत शक्ती असावी म्हणून आदी मानवाने कल्पीले असावे. त्याचा आपल्यावर कोप होऊ नये म्हणून, भय भक्तीच्या कल्पनेने आकाशाला दैवत्व देऊन त्याच्यासारखेच गोलाकार रुपात वाळूचे लिंग करून पूजले असावे. जसुद्धा वाळूचे लिंग करुन पूजा करण्याची पद्धत लोकात आहे. पुढे मातीचे लिंग करून पूजण्याची प्रथा रुढ झाली वाळू, मातीचे लिंग फार दिवस टिकत नसत, त्यासाठी, दगडाचे लिंग करुन मानव पूजत आला हे. आकाश पाणी देत असल्यामुळे आकाशाचे प्रतीक असलेल्या लिंगाला पाणी घालण्याची व अभिषेक करण्याची पद्धत रुढ झाली. सुरुवातीस लिंग गोलाकारात होते. अभिषेकाचे पाणी वाहून जाण्यासाठी पन्हाळी बनविली असावी.

रावणाची माता वाळूचे लिंग करुन पूजत असल्याचे व शीलालिंग आणून देण्यासाठी मुलग्यावर हट्ट केल्याचे पुराणकथेतून समजून येते.

अधिदैवीक :

पंचभूतात एक झालेल्या आकाशाला, दैवत्व देऊन त्याच्या आकारात पुजण्याच्या आदिभौतीक कल्पनेनंतर मानावाने सृष्टीला मूर्तरुप इतिहासात लिंगाची कल्पना देण्याच्या आधिदैविक कल्पनेला हात घातला. परमात्म्याला मुर्तीकरण करण्याची कल्पना इथे प्रमूख आहे त्याला पूराण युग म्हणतात. (The Age of mytyology) देवाचे मूर्तीकरण (Personification of God) महात्म्यांचे दैवीकरण (Deification of Saints) हे पूराण युगाचे प्रमुख अंश आहे. ऐतिहासीक महात्म्याना देवता करायची एक क्रिया झाली असून नवग्रहाला व भूमी, पाणी, वायू, प्रकाश, यांना विविध आकारात मूर्ती करण्याची आणखी एक क्रिया.

देव बहूतेक माझ्यासारखेच पुरुष असावेत म्हणून प्रथम पुरुषाकार केले आम्ही रहात असलेल्या पृथ्वीचा तोच मालक, पृथ्वी ही दुध पाजणारया मातेसारखी पीक पोसणारी माता आहे. पृथ्वीला स्त्री रुपात साकार करुन पुरुषाकार मुर्तीच्या बाजूला पार्वतीला बसवले आमच्या जीवनाला अवश्यक असलेले पाणी मातेसारखेच आहे. म्हणून गंगादेवी बनवून त्या देवताच्या मस्तकावर ठेवले आमचे जीवन सुर्य, चंद्र व अग्नी यांच्याच आधारावर उभे आहे. म्हणून त्या देवताला (शंकराला) तीन डोळे बनविण्यात आले. वायू आणखी एक आवश्यक वस्तू त्याचे चित्रीकरण कसे करावे? म्हणून वायुच्याच सेवनाने दीर्घकाळ जगणा-या सर्पाचे प्रतिक त्याच्या गळ्यात घातले. देवताला कपडे नेसवणार कोण ? म्हणून त्याला दिशा हेच कपडे त्यासाठी शिवाला दिगंबर बनवले, आकाशाचा रंग निळा आहे, त्यासाठी त्याला निळा रंग दिला.

आतापर्यंत 'गंगाधर, गौरीवर''त्रीनेत्र', 'नागाभरणा व दिगंबर(नीलवर्ण) मुर्तीची निर्मिती झाली ऐतिहासीक पुरुषाचे, दैवीकरणाचा आणखी एक प्रसंग पुराण युगात या सर्व क्रिया चालत असताना चिन्ह बनवण्याचे कार्यसुद्धा बरेच चालले. शिवाला ध्यानमग्न योग्याच्या रुपात म्हणजे, स्थावर लिंगाकारात मुर्ती करुन पुजण्याचे कार्य सुरु झाले. देवळात स्थावर हे डावा हात योगदंडावर ठेवून पद्मासन घालून ध्यानमग्न बसलेले शिवाचे प्रतीक दिसते. मस्तक हे गोलक, पसरलेला हात पन्हाळीसारखे दिसते आशी आदी दैवीक पूजा पद्धत चालत आली

यज्ञ करताना यज्ञपशूला एका खांबाला बांधतात, त्याला युगस्थंभ म्हणतात. त्या खांबाला परब्रम्ह म्हणण्याची प्रथा होती, पशू यज्ञाचा तिरस्कार केल्यानंतर तो खांबच लिंग होऊन जिवात्म्यालाच पशू मान्य करण्यात आले ! असे स्वामी विवेकानंदानी स्थावर लिंगाचा अर्थ सांगीतला आहे. लोकानी बौद्धांचे लहान लहान बौद्ध सुक्तच लिवलिंग झाले म्हणून कल्पना करणारे सुद्धा आहेत. ते दोन्ही तर्क निराधार आहेत कारण आर्यजन येण्यापूर्वीच बौद्ध धर्म स्थापीत होण्यापूर्वीच शिवलिंगाची पूजा होती म्हणून, हडाप्पा मोहिंजोदारो संस्कृतीने सिद्ध झाले आहे. म्हणून वरील म्हणणे केवळ कल्पनाच असून सत्य असणे शक्य नाही.

आध्यात्मिक:

लिंग पूजा ही आकाशाचे चिन्ह न होता, कैलासाच्या शिवाचे चिन्ह न होता, निराकार देवाचे व निराकार जीवात्म्याचे चिन्ह होवून श्री बसवेश्वरांच्या कडून नवा अर्थ मिळवले.

जगविस्तार, नभोविस्तार, विस्तारातीत तव विस्तार,
पाताळापार तव श्रीचरण, ब्रम्हांडापार तव श्रीमुकूट
अगम्य, अगोचर, अप्रतिम लिंगदेवा
इवलासा झालाशी, येऊन माझ्या करस्थळी --धर्मगुरु बसवेश्वर ७४३

इष्टलिंग हे जगविस्तार, नभोविस्तार, असलेले परमात्म्याचे इतिहासात लिंगाची कल्पना प्रतीक, स्थावर लिंगाप्रमाणे केवळ भक्ती तृप्तीचे श्रद्धाकेंद्र नव्हे. ते आत्मसाक्षात्काराचे योग दर्पण आहे. अशी अर्थव्याप्ती व यौगीक उपयुक्तता, त्याला बसवेश्वरांनी दिली.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous लिंगाचे स्वरूप इष्टलिंग दिक्षा संस्कार Next