Previous लिंगायत वीरशैव वेगवेगळे (Lingayat Veershaiva are different) पूज्य लिंगानंद आप्पाजी यांची थोडक्यात ओळख Next

लिंगायत धर्म सहिंता (Lingayat Dharma Samhita) [Constitution]

*

[This Article is from the book: Lingayat Dharma Darpan - A Prose composition written by Her Holiness Jagadguru Mate Mahadevi, translated by Sharni Sou. Shashikala Rajshekhar Madki
Pub: Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.]

प्रत्येक धर्माला आधारभूत असे साहित्य असावयास हवे. त्या तत्वाच्या अनुयायींच्यामधे फूट पडून अस्तव्यस्त न होता संघटीत होऊन राहण्यास, त्या सर्वाना एकासूत्रात बांधणारे साहित्य असावे. क्रिस्चन (Christan) लोकांना बायबल, इस्लामीयांना कुरान असल्याप्रमाणे लिंगायत धर्मास वचन साहित्य हेच आधार साहित्य होय. बसवेश्वरांनी लिहिलेल्या षटस्थल वचनांत लिंगायत धर्माचे संपूर्ण सार सर्वस्व आहे. बसवेश आणि त्यांचे सहकारी शरणांची वचने आपल्याला आचार-विचाराबद्दल मार्गदर्शन करणारे साहित्य म्हणून प्रत्येक लिंगायताने मानले पाहिजे. नंतर आलेले तोंटद सिध्दलिंगेश्वर, षण्मुख स्वामी, मग्गेय मायीदेव इत्यादींचे वचने बसवादि शरणांच्या वचनावर तात्विक सूत्रावर भाष्य, टीका लिहल्याप्रमाणे आहेत. त्यानंतर निजगुण शिवयोगी, मुप्पिन षडक्षरी, सर्पभूषण शिवयोगी, बाललीला महंत योगी इ. कित्येक शिवयोगींचे साहित्य लिंगायत परंपरेत आहे. याशिवाय बसवादि प्रमथापासून त्यानंतर होऊन गेलेल्या कित्येक शरणांच्या जीवनावर रचलेली पुराणे व काव्य साहित्य आहेत. या सर्व साहित्याचा अभ्यास केल्यावर असे वाटू लागते की बसवादि शिवशरणांचे वचन साहित्य हे लिंगायत धर्माच्या पाठ्य पुस्तकाप्रमाणे आहे. श्री. सिध्दलिंगेश्वर, षणमुख स्वामी, मग्गेय मायीदेव इ. वचन साहित्याला प्रथम क्रमांकात प्रमाण ग्रंथ असे म्हणता येईल. निजगुण शिवयोगी, मुप्पीनार्य, शिवयागी शिवाचार्य इत्यादिंचे साहित्य द्वितीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ, हरीहर, राघवांक, चामरस इ.चे पुराण साहित्य तृतीय क्रमांकाचे प्रमाण ग्रंथ आहेत असे म्हणावे लागेल.

याप्रकारे शरणांच्या वचनांच्या आधारे आचरण आणि विचार करणारेच खरे लिंगायत आहेत असे शिवयोगी सिध्दरामेश्वरांनी आपल्या वचनात म्हटले आहे.

(अ) “आमच्या आचरणास आमच्या पूर्व पुरातनांचे सांगणेच इष्ट आहे.

स्मृती समुद्रात जाऊ द्या, श्रुती वैकुंठात राहू द्या ।
पुराण अग्नीत जाऊ द्या,आगम वायूत जाऊ द्या
आमुच्या शरणांचे वचन कपिलसिध्दमल्लिकार्जुन
महालिंगाच्या हदयात ग्रंथित होऊ द्या'

(आ) आमच्या एका वचनाच्या पारायणास
व्यासाचे एक पुराण पारायण होई न सम
आमचे एकशे आठ वचनांच्या अध्ययनास
शत रूद्रादि असे न सम
आमुच्या एक हजार वचनांच्या पारायणास
गायत्रीचे एक लक्ष जप न होई समान
कपिलसिध्द मल्लिकार्जुन ( शिवयोगी सिध्दरामेश्वर व. ८५९)

(व्यक्तींचे जीवन चरित्र जाणण्यास पुराण साहित्य सहाय्यकारी होईल. धर्मातील वैचारिक भाग असलेला सिध्दांतिक विषयाच्या दृष्टीकोनातून याला तृतीय स्थानातील प्रमाण ग्रंथ म्हणावे लागेल. कारण कैलासलोक असल्याची कल्पना सिध्दरामेश्वराना मान्य नाही आणि हीच कल्पना कित्येक पुराणातून पाहावयास मिळते. तसेच यांत शरणांना मान्य असलेली शिवयोग साधना आणि इष्टलिंगाची श्रेष्ठताही दिसून येते.)

सोलापूरचे सिध्दरामेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे लिंगायतांच्या आचार व विचाराला शरणांचे वचनेच आधार शास्त्र होय. लिंगायत धर्मानुयायांनी वचनांचे पारायण आणि अध्ययन करावयास हवे. बहुतेक लिंगायत मठात आपले मूळ साहित्य असलेले वचन साहित्य सोडून कन्नड भाषेवरील प्रेमापेक्षा संस्कृत भाषेविषयी त्यांचा अभिमान वाढत चालला आहे. याचा परिणाम म्हणून त्यांच्यात व त्यांच्या अनुयायी लोकांत अप्रत्यक्षपणे सांप्रदायिक आचरण रूजले आहेत. ज्ञानपिपासेच्या दृष्टीकोनातून संस्कृत भाषेचा अभ्यास केल्यास कांहीच हरकत नाही. पण संस्कृतमधे असलेले सर्व मान्य असे समजून कित्येक लिंगायत धर्माचे विरूध्द असलेल्या तत्वांना स्वत:ला विकून घेतलेले आहेत.

असे अध्ययन केल्यास त्याचे फळ म्हणून स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती प्राप्त होते. सत्यार्थ निर्णय घेताना शास्त्र प्रमाणापेक्षा स्वानुभव प्रमाणच श्रेष्ठ मानून लिंगायतांनी विश्वास ठेवावा. या कारणे मूढ संप्रदायापेक्षा सत्य हेच श्रेष्ठ समजून स्वतंत्रपणे विचार करणाराच खरा लिंगायत होय.

सूचीत परत(Index)
*
Previous लिंगायत वीरशैव वेगवेगळे (Lingayat Veershaiva are different) पूज्य लिंगानंद आप्पाजी यांची थोडक्यात ओळख Next