Previous लिंगायत कोण ? (Who is Lingayat) पूज्य श्री महाजगद्गुरु माते महादेवी Next

लिंगायत धर्मियांनी आचरण करावयाचे काही सण व जयंती उत्सवांची यादी.
(Lingayat's Important Festivals)

*
१. बसव क्रांतिदिन जनवरी १४
२. सिध्दरामेश्वर जयंती जनवरी १४
३. गणराज्योत्सव जनवरी २६
४. चन्नबसवेश्वर लिंगैक्यदिन माघ पौर्णिमा
५. सर्व शरण संताचे दिनाचरण महाशिवरात्री
६. अल्लमप्रभू जयंती गुडीपाडवा चैत्र प्रतिपदा
७. अक्कमहादेवी जयंती चैत्र पौर्णिमा
८. गुरू बसव जयंती वैशाखमास अक्षयतृतिया
९. मडिवाळ माचिदेव जयंती आणि कायक दिनाचरण मे १
१०. गुरू बसव पंचमी-बसव लिंगैक्यदिन श्रावण शुध्द पंचमी
११. नीलम्मा षष्ठी-नीलांबिकेचा लिंगैक्य दिनाचरण श्रावण शुध्द षष्ठी
१२. स्वातंत्र्य दिन ऑगस्ट १५
१३. कल्याण क्रांतिदि-महात्मा हरळय्या मधुवरस संस्मरण दिन महानवमी
१४. बसव धर्म विजयोत्सव आणि अक्क नागलांबिका संस्मरण दिन विजयादशमी
१५. चन्नबसव जयंती कार्तिक शुध्द प्रतिपदा

गुरू बसव जयंती

लिंगायत धर्मपुरुषांचे हृदय स्वरूप असलेल्या बसवेश्वरांची जयंती ही सर्व लिंगायतांनी सर्वश्रेष्ट समजून सर्वात मोठा सण म्हणून साजरा करावा. सर्व मानवांना स्वातंत्र्य मिळवून दिलेला, महापुरूषाला जन्म दिलेला पवित्र दिवस प्रतिवर्षी वैशाख शुध्द अक्षय त्रितिया दिवशी हा सण असतो. त्या दिवशी सर्व लिंगायतांच्या घरी स्नान पूजा वगैरे करून वचन शास्त्राचे पारायण करणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमंत, व्यापारी, आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्यांनी आपापल्या योग्यतेप्रमाणे बसवादि शरणांच्या वचनांच्या शेकडो प्रति छापून अगर खरेदी करून वाटाव्यात स्त्रीयांनी आपल्या मैत्रिणींना हळदी कुंकवाच्या निमित्ताने घरी बोलावून इतर कांही वस्तू देण्याऐवजी वचनपुस्तीकेची प्रत द्यावी. व्यापा-यांनी आपल्या दुकानात बसवेश्वरांचे मोठे भावचित्र सजवून पूजा करून सहोद्योगिंना आमंत्रण देऊन वचनग्रंथ वाटावेत. त्या दिवशी दुकानातील व्यापारापेक्षा गरीबांना आपल्याकडून होईल तितकी मदत करावी. वैद्यांनी मोफत तपासणी करून आपल्यातील सेवाभाव प्रकट करावा. मोठ्या प्रमाणांत बसवजयंती निमित्त मिरवणूक काढावी व त्यात सर्वांनी भाग घ्यावा. मी मोठा श्रीमंत, मी मोठा अधिकारी, मी गाढा पंडित अशा प्रकारचा अभिमान मनी न धरिता नम्रभावनेने गुरुभक्ती आणि समाजसंघटनेची प्रज्ञा प्रकट करावी.

आपल्यासाठी एक विशाल धर्म देऊन सर्व मानवांना सर्वप्रकारचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी झगडलेल्या बसवेश्वरांना आपण कृतज्ञता दर्शविली नाही तर आपण कृतघ्न ठरु. चैत्र पाडव्याच्या दिवशी अल्लमप्रभुदेवांची जयंती. चैत्रमासातील पोर्णिमेला अक्कमहादेवी जयंती, नवरात्रीच्या नवमी दिवशी हरळय्या-मधुवरस यांचे ‘मरण वे महानवमी' म्हटलेला हुतात्मा दिन दिपावलीच्या पाडव्यादिवशी चन्नबसव जयंती, मकर संक्रातीच्या दिवशी सिध्दरामेश्वर जयंती आणि सर्व शरणांचे दिनाचरण म्हणून शिवरात्रीच्या दिवशी सर्व लिंगायत बांधवांनी वर दिलेल्या सर्व जयंत्या साजच्या कराव्यात

गुरू बसव लिंगैक्य दिन

विश्वगुरू, मंत्रपुरूष, महाअनुभावी, मुक्तीदायक महात्मा बसवेश्वर हे श्रावण शुद्ध पंचमीच्या दिनी लिंगैक्य झाले. कूडल संगमक्षेत्रातील गुरुकुलात इष्टलिंगपूजा करीत ध्यानस्थ असल्यावेळी ‘आपण ज्या कार्याकरीता आलो ते पूर्ण झाले. परमात्म्याने दिलेली आज्ञा पूर्ण केली. हे अंतरात्म्याचे बोल जाणून, भू॒ ‘प्राणलिंगी स्थितीस जाऊन, काया व जीवाचे शिवण उसवून परमहंस झाले. आपल्या देहाचे विसर्जन करून, आपल्या परिशुध्द आत्म्याला परमात्म्याच्यात विलीन केले. अग्नी स्पर्श केलेल्या कापूराप्रमाणे, सागरात विलीन झालेल्या सरितेप्रमाणे एकरूप झाले.

बसव जयंती उत्सव उत्साहपूर्वक साजरी करावी. बसवपंचमी व्रतरूपाने साजरा करावा. श्रावण महिन्याच्या अमावस्येनंतर शुध्द प्रतिपदेपासून म.बसवेश्वर महाव्रतास प्रारंभ करावा. पंचमीला पांच व्रत पूर्ण होतात. पंचमीच्या दिवशी पूजेचे शेवट दिवस म्हणून बसवप्रसाद वाटावे. हा कार्यक्रम सामुदायिक करायचे असल्यास पांच दिवसाचा व्रत करून बसव पंचमीच्या दिवशी सर्वांनी मिळून प्रसाद दासोह करता येईल.

Reference: LINGAYAT HINDU NAVHET - A prose composition in Kannadda by Her Holiness Maha Jagadguru Mata Mahadevi, translated in Marathi by Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.

सूचीत परत
*
Previous लिंगायत कोण ? (Who is Lingayat) पूज्य श्री महाजगद्गुरु माते महादेवी Next