Previous धर्म गुरु बसव पूजा बसवा पोस्टल स्टॅम्पवर आणि नाण्यावर Next

ईष्टलिंग दाता विश्वगुरु बसवण्णा
(Ishtalinga Inventor Guru Basava)

✍ पुज्य श्री महाजगद्गुरू डा.॥ माते महादेवी

*

इष्टलिंगाचे जनक कोण ?

लिंगायत धर्माचे जीव्हाळे झालेल्या इष्टलिंगाची कल्पना कोठून आली ? याचे आद्य कोण? हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न ‘जुने ते सोने' या म्हणी प्रमाणे मनोवृत्ती असलेले बहुतेक लोक शक्य तितक्या मागे जावून इष्टलिंगाचे मूळ, अस्तित्व व इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतात. हा भारतीयांना चिकटलेला एक प्रकारचा रोगच म्हणावे लागेल. वेदकाळापूर्वीचे म्हणून शिक्का मोर्तब करणारे साहसी पण पुष्कळ.

पुज्य लिंगानंद स्वामीजी पण पुष्कळ दिवस हडप्पा व मोहनजोदारो संस्कृतीत इष्टलिंग दिसून आल्याचे प्रतिपादन करीत होते. "लिंगतत्व दर्पण" या त्यांच्या जुन्या आवृत्तीत (१९७० मध्ये प्रकट झालेल्या ४ थ्या आवृत्तीत) असे लिहीले आहे.

बसवण्णांच्याही पूर्व काळात इष्टलिंगोपसना अस्तित्वात होती असा पूर्वग्रह पीडीत विश्वासाच्या आधारे वाटचाल करीत तेच दृढ करण्यासाठी साक्षाधार तयार करीत आलो आहोत. पण वचन साहित्याच्या क्षेत्रात जस जसे खोलवर अध्ययन करीत गेलो तस तसे नवीन विचार डोळ्यासमोर आले. आम्हाला "आघात - आश्चर्य- आनंददायी" वाद विषयांचे आकलन होत गेले.

गुरु बसवण्णाच इष्टलिंग दाता

इष्टलिंग ही पुज्य वस्तू (object of worship), प्रतीक, चिन्ह (Symbol) दिलेले दुसरे कोणी नसून गुरु बसवण्णांच! याच्या मूळ इतिहासाचा आरंभ बसवण्णांच्या पासूनच झाला. म्हणून इष्टलिंगच आधारभूत धरुन आलेल्या लिंगायत धर्माचा उगम, इतिहास, बसवण्णांच्या पासूनच झाला. (बसवण्णांना हे महत्वपूर्ण स्थान देण्याचे सौजन्य नसणा-या विद्वानांनी कृपया पूर्वग्रह पीडीत मत्सर पूर्ण दृष्टीकोण सोडून पुढील आधार पुरावे कृपाकरुन लक्षात घ्यावेत.)

समकालिनांचे अभिप्राय

विश्वगुरु बसवण्णांच्या समकालीना पैकी उन्नत स्थान लाभलेले, साहित्यिकांच्या दृष्टीने व मठ मठपतींच्या दृष्टीने, विरक्त परंपरचे आदिगुरु श्री मन् अल्लम् प्रभुदेव होत. तेंव्हा त्यांच्या अभिप्रायापासूनच सुरुवात करुया.

कन्नड: आदियल्ली नीने गुरुवाद कारणा निन्निंद हुट्टित्तू लिंग....
.........नीने सर्वाचार संपन्ननागि
पूर्वाचारी नीनेयाद कारणा
गुहेश्वर लिंगदल्लि चंदय्यंगे
लिंगद निजव तिळुहा, संगन बसवण्णा. (अल्लमप्रभुदेव व. सं. ९३७)

मराठी: सर्वप्रथम तूच गुरू झाल्या कारणे तुझ्या पासून जन्मले लिंग
........तूच सर्वाचार संपन्न होवून
पूर्वाचारी तूच झाल्या कारणे
गुहेश्वर लिंगायत चंदय्याला लिंगाचे
सत्य पटवून देणारे संगन बसवण्णा.


“बसवण्णा, तूच अदिगुरु, तुझ्या पासूनच इष्टलिंगाची कल्पना, उपासना प्रारंभ, त्यामुळे त्याचे मर्म व वैशिष्टये हे सर्व चंदय्यला तूच पटवून दे”

कन्नड: निरुपव काण बारदु, पूजिसुव परि एंतय्या ?
रुपिंगे केडुंटु, पूजिसुव परि एंतय्या?
सकल निकलवु पूजेगे कारण वल्ल, इन्नेंतय्या?
लिंगवंतरिगे पूजिसुव परि ?.............
गुहेश्वरय्या अरियबारद लिंगव अरिवंते
माडिकोट्टनु श्री गुरु बसवण्णा. (अल्लमप्रभूदेव व. सं. ७७०)

मराठी: आकारहीन न दिसणारे,पूजा करण्या योग्य म्हणावे ?
रुप असणारे नाशवंत, पूजा करण्यास योग्य असेही म्हणावे ?
सकल निखल, पण पूजेला निमित्त नव्हे असेही म्हणावे?
लिंगवंताना पुजण्यास अनुरुप ?.....
गुहेश्वर नाथा, जाणीव होणार नाही असे लिंग
जाणीव होईल असे करुन दिले, श्री गुरु बसवण्णांनी.

जुने असलेले सर्व तिरस्कारुन एखादे नवीन आचरणात आणण्याच्या प्रयत्नात बसवण्णांनी गंभीरपणे विचार केलेला दिसतो, देव निराकार निर्गुण त्याला धरुन कसे ठेवावे? पूजा कशी करावी? पुजेला काही तरी एखादी वस्तू पाहिजे म्हणून त्याला रुप दिल्यास त्याला अवयव असणार. म्हणजे ती वस्तू स्त्री किंवा पुरुष अशीच असल्यामुळे ती परमात्म्याच्या तत्वास च्युती येणारच. या संदर्भात चिंतन करुन साकार नसणारी पण पूजा करण्यास योग्य अशी विश्वाच्या आकारातच देवाचे प्रतीक निर्माण करण्याची योजना बसवण्णांची झाली होती, आराधनेस दृष्टियोगास अत्यंत सहाय्य होणारी पण कोणत्याही मुर्तिच्या आकारात नसरणारी अशा इष्टलिंगाची कल्पना देणारे गुरु बसवण्णांच होत हे वरील वचनावरुन स्पष्ट होते.

कन्नड: बयल मूर्तिगोळीसिद नोब्ब शरण
……………………………….
नानु निवार्णदल्लि निंदु अगम्यनादे नेंदरे
भक्तिकंपित नेनिसि एन्न तन्नलिगे बरिसिकोंडनोब्ब शरण
गुहेश्वरा, निम्म शरण संगन बसवण्णन
श्रीपादव कंडू शरणेदू बदुकिदेनु. (अल्लमप्रभुदेव व.सं. १३७९)

मराठी: बखळ मूर्तीत रुपांतर केलेला एक शरण
……………………………….
मी मोक्षाच्या मार्गात उभा असून अगम्य झालो म्हटल्यास
भक्तिच्या परिमळाचा आनंद देत मला तुझ्या जवळ
येईलसे केलेला एक शरण
गुहेश्वर, तुझा शरण संगन बसवण्णांच्या श्री चरणास
पाहून नमन करुन जगलो आहे.


निराकार असलेल्या शुन्यरुपी ब्रह्मास साकार केलेले बसवण्णा.

त्या पुर्वी प्रभुदेवांनी सर्व प्रकारच्या साधना करुन सिध्दी मिळविल्या असल्या तरी अध्यात्मीक. भक्तिपथास, लिंगयोग साधनेस आकर्षित झाले ते बसवण्णांच्या मुळेच!

अल्लमप्रभुदेवांचे गुरु अनिमिषय्या हे इष्टलिंग धारी झालेले होते. त्यांच्याकडूनच प्रभुदेवांनी इष्टलिंग प्राप्त करुन घेतले. असे म्हणणे म्हणजे ते आधीच होते असे म्हणावे? ह्या वादातून निर्माण होणा-या वरील प्रश्नास स्पष्ट उत्तर प्रभुदेवांच्या खालील दोन वचनात मिळते.

कन्नड: अनादि गणनाथन शिष्यनु आदि गणनाथनु
आदी गणनाथन शिष्यनु अध्यात्म गणनाथनु
अध्यात्म गणनाथन शिष्यनु आत्म गणनाथनु
आत्म गणनाथन शिष्यनु व्योमसिध्द गणनाथनु
व्योमसिध्द गणनाथन शिष्यनु बसवनेब गणनाथनु
बसवनेंब गणनाथन शिष्यनु अनिमिषनेब गणनाथनु
अनिमिषनेब गणनाथन शिष्य अल्लमप्रभुवेंब गणनाथनु
इंति अनादी विडिदु बंद अनुपम लिंगवु
गुहेश्वरनेंब हेसरन्नोळगोंडु
यन्न करस्यलक्के साध्यवायीतु काणा, सिध्दरामय्या (अल्लमप्रभुदेव व.सं.१२८५)

मराठी: अनादि गणनायकाचा शिष्य आदी गणनायक
आदी गणनायकाचा शिष्य अध्यात्म गणनायक
अध्यात्म गणनायकाचा शिष्य आत्म गणनायक
आत्म गणनायकाचा शिष्य व्योमसिध्द गणनायक
व्योमसिध्द गणनायकचा शिष्य बसव नाम गणनायक
बसवनाम गणनायकाचा शिष्य अनिमिष गणनायक
असे अनादि पासून आलेले अप्रतिम लिंग,
गुहेश्वर असे नांव धारण करुन माझ्या तळहातात आले पहा,
सिध्दरामय्या.

वरील वचनात पहिल्या पाच पंक्तीत विश्व उत्पत्ती (Cosmology) शास्त्राबद्दल सांगितले असून ६ व्या पंक्ती पासून इतिहासाची सुरुवात होते. ३६ तत्वांच्या आधारावर हे जग निर्माण झाल्याचे संक्षिप्त पणे इथे सांगितले आहे. अनादि गणनाथ म्हणजे परशिवा, अदिगणनाथ म्हणजे पर शक्ती, अध्यात्म गणनाथ म्हणजे शुध्दाशुध्द तत्वात येणारी माया. आत्म गणनाथ म्हणजे 'पुरुष' तत्व, आत्म तत्व यापुढे पंचभुताची उत्पत्ति. त्यातील आकाश सर्वात आदी. तोच व्योमसिध्द गणनाथ. असे परशिव- पराशक्ती - माया - पुरुष-प्रकृती इत्यादी ३६ टप्यातून जावून ही पृथ्वी निर्माण झाली आहे. म्हणजेच "शक्ती विशिष्टाद्वैत." वचनाचा पुढील भाग इतिहासासी संबंध असलेला.

परंपरेचा आरंभ बसवण्णांच्या पासून झाला. अनुग्रहित झालेला अनिमिष योगी. त्याचा शिष्य अल्लमप्रभुदेव असे अनादि स्वरुप असणारा परमात्मा गुहेश्वर हे वैयक्तीक नाव धारण करुन प्रभुदेवांच्या तळाहातात विराजमान होवून पूजा करवून घेतो.

“हा कोण नाथ प्रज्वलन करुन, तळहातावर स्थापन करुन दाखविलेला ? पूर्वाचारी, भक्ती भंडारी बसवण्णा तू मला गुहेश्वरलिंग दाखविले म्हणून लोकसर्व कणमात्र"

आणखीन एका वचनात सांगतात “गुरुंचे प्राण माझ्या इष्टलिंगात लपलेत, माझ्या गुरुचे गुरु बसवण्णा माझ्या डोळ्यासमोर आहेत'' प्रभुदेव अध्यात्म कांक्षी होवून संचार करीत जात असता गोग्गय्याच्या मळ्यात येतात व तेथे अनिमिषयोगी लिंगाग योगात समाधिस्त झालेले पाहतात. अत्यंत मौनपणे त्यांना अनुग्रह होतो. अनिमिषयोगीच्या तळहातावरील चकाकत असलेले चित्कलाभरीत इष्टलिंग आपल्या हातात घेताक्षणी वीज चमकल्याचा भास होवून चैतन्या वाहून येते. मातिच्या देवळात सापडलेल्या या माणिकाला गुहेश्वर असे नांव, त्याला त्याच नावाने बोलावून त्याच्या इतिहासाच्या शोधात निघतात .“एवढे सुंदर अर्थगर्भित असे योगीक, तात्वीक, संकेत असणारे प्रतीक कोणाची देणगी?'' “आपल्या गुरुचे गुरु बसवण्णा' असल्याचे कळते. अल्लमप्रभुंना माणिक मिळाले खरे पण त्या मागचे मर्म सांगू शकणारे कोण ? ते गुरु बसवण्णाच याची खात्री होवून ते त्यांच्या दिशेने निघतात.

असे अनिमिष्यांच्या कडून प्रभुदेवांना इष्ट लिंग आले. बसवण्णांच्याकडून इष्टलिंग अनिमिष्यांना कसे आले ? वसूधीश भूपाल आताच्या बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील पट्टदकल्लचा राजकुमार . एक दिवस राजकुमार भ्रमण करीत असता जंगलात येतो. त्यावेळी त्याला एका समस्येला तोंड द्यावे लागते. लिंग दर्शन झाल्याशिवाय जेवण न करण्याचा त्याचा नियम असतो. त्याच्या शोधात तो फिरत असतो. तेंव्हा त्याची बसवण्णांसी भेट होते. लिंग शोधत भटकण्याचे तुला कारण नसुन तुझ्या बरोबरच नेहमी असणारे लिंग देतो म्हणून सांगतात व त्याला इष्टलिंगाची दीक्षा देतात. ते मिळताच वसुधीशला फार आनंद होतो व पुजा करण्यात तो मग्न होतो. असे लिंग पूजेत जास्त वेळ आकर्षिला जावून लिंग योगात तल्लीन होत जातो. तेव्हा त्याचे मूळनांव मागे राहून अनिमिष्य म्हणून नांव पडते. असे अनिमिष बसवण्णांचा शिष्य झाल्यामुळे अल्लमप्रभु बसवण्णांचे शिष्य, चन्नबसवण्णा पण बसवण्णांचे शिष्य त्यामुळे आम्ही दोघेही बसवण्णांच्या परंपरेची मुले' असे म्हणतात चन्नबसवण्णा अल्लमप्रभुंना उद्देशून -

कन्नड : कुडलचन्नसंगय्यनल्लि अनिमिष प्रभुविंगे
बसवण्णा गुरवाद कारणा,
नानु निमगे चिक्क तम्मा केळा प्रभुवे.

मराठी: कूडलचन्नसंगय्यात अनिमिष प्रभुदेव दोघांना?
बसवण्णा गुरु झाल्या कारणे
मी तुमचा लहान भाऊ झालो ऐका प्रभुदेवा.


कन्नड : गुरु ओंदू, लिंग ओंदू, उपदेश ओंदू
कुडलचन्नसंगय्यन शरण बसवण्णन गरुडयल्ली
इब्बरिगेयू अभ्यास ओंदे काणा प्रभुवे.

मराठी: गुरु एक, लिंग एक, उपदेश एक,
कूडलचन्नसंगय्याचा शरण बसवण्णांच्या व्यायाम शाळेत
दोघांनाही शिक्षण एकच पहा प्रभुदेवा.

कन्नड : अनिमिषंगे लिंगव कोट्टात बसवण्णा
आ लिंग निनगे सेरित्तागि,
बसवण्णन संप्रदायद कंदनु नोडा नीनु
भक्ति दळदुळदिंद चन्नसंगमनाथ नेंब
लिंगवनवग्रहिसिकोंडेनागि
बसवण्णन संप्रदायद कंदनूनोडा नानू
इंतिब्बरिगेयू ओंदे कुलस्थलवाद कारणा,
कुडलचन्नसंगय्यनल्लि, बसवण्णन महामनेय
प्रसाद इब्बरिगेयु ओंदे काणा प्रभुवे॥ (चन्नबसवेश्वर ब.सं.९०९)

मराठी: अनिमिषांना लिंग दिलेले बसवण्णा
ते लिंग तुला मिळाल्या मुळे,
बसवण्णांच्या संप्रदायाचा पुत्र पहा तू
भक्ती उत्साहामुळे चन्नसंगमनाथ नाम
लिंग अनुग्रह करवून घेतल्या मुळे
बसवण्णांच्या संप्रदायाचा शिशू पहा मी
असे दोघांना पण एकच कुलस्थल झाल्या कारणे
कुडलचन्नसंगय्यात बसवण्णांच्या महामनेचा
प्रसाद दोघांनाही एकच पहा, प्रभुदेवा ||

असे “अनिमिषांना लिंग दिलेले बसवण्णा" असे चन्नबसवण्णा अत्यंत स्पष्टपणे सांगितल्याचे पाहातो. हे कसे शक्य? म्हणून आश्चर्य वाटेल. गुर बसवण्णा विद्याभ्यासानंतर संगम सोडून मंगळवेढ्यास जावून राजकारणाच्य वलयात गुंतलेले असता, प्रवास करीत असता, अरण्यात विहारासांठे आलेल्या वसुधीश भूपालाशी त्यांची गाठ पडते. लिंगदर्शना विना जेवण नाही म्हणून शिवालय हुडकत असता. बसवण्णा इष्टलिंगाचे मर्म समजावून सांगून ते त्यांना धारण करुन पूजेसाठी देतात. अत्यंत मोहित होवून पूजेस बसून वसूधीश समाधिस्त झालेला असता त्याचा परिवार त्याला शोधत तेथे आला असणार. पुढे अत्यंत नवीन असणारे तळहातातील माणिक मिळवलेले प्रभुदेव पुलकित होवून इष्टलिंग दात गुरुचा गुरु परमगु बसवण्णांच्या शोधात निघाले असणे सहज स्वाभावीक असणार.

कन्नड : हेसरिडबारद घनतर लिंगक्के हेसरिट्ट
वाङ्ञनक्कॆ गोचरवप्प लिंगव वाक्यक्के तंदु
“अत्यतिष्ठद्दशांगुलं'' एंब लिंगव चित्तके तंदु
सुत्तिर्द माया प्रपंचव बिडीसीद बसवणा ( सिध्दरामेश्वर व.सं.११६५)

मराठी: नाव न ठेवता येणा-या श्रेष्ट अशा लिंगास नाव ठेवून
वाचा मनास अगोचर असे लिंग वाचात आणून
"अत्यातिष्ठद्दशांगुलं" नावाचे लिंग चित्तात आणून
गुरफटलेल्या माया प्रपंचातून सोडविलेले बसवण्णा.
निराकार निर्गुण अशा परमात्म्यास एका विशिष्ट साकाराच्या
साहय्याने मूर्तस्वरुपात आणलेले बसवण्णाच होत हे इथे स्पष्ट होते.

कन्नड़: आवुदानोंद भक्ति बसवण्णनदय्या
आवुदानोंद युक्ति बसवण्णनदय्या
आवुदानोंद योग बसवण्णनदय्या
कपिलसिध्द मल्लिनाथय्या. ( सिध्दरामेश्वर व.सं.२३०)

मराठी: विशेष अशी एकभक्ती बसवण्णांची हो
विशेष अशी एक युक्ती बसवण्णांची हो
विशेष असा एक योग बसवण्णांचा हो
कपिलसिध्द मल्लिनाथ देवा.

बसवण्णांनी एक विशेष तत्वेहेची भक्ती शिकविली. देवाची पूजा करण्या युक्ती (इष्टलिंग पूजा) शिकविली. देवाचा साक्षात्कार करुन घेण्य दृष्टीयोगाच्या आधारावर अवलंबून असणारा लिंग योग शिकविला.

कन्नड: वेदादिगळिगे निलुकद, निखिळ शिवयोगिगळ मनक्के तोरद
परवस्तूव पाषाणदल्लिट्टु कोट्टेनेंदडे नंबबहुदे ज्ञानिगळू? ( सिध्दरामेश्वर व.सं.९६३)

मराठी: वेदादिंना न उमगलेले सर्व शिवयोगींच्या मनास न उमजलेले
परवस्तू पाषाणात ठेवून देतो म्हटल्यास
विश्वास करु शकतील का ज्ञानीलोक?

कन्नड : अरिद मूर्तिय निम्मली कुरुहिकोंडिरे बसवा
इष्टब्रम्हांडव घट्टीगोळिसिदिरी बसवा (श.कं.ब.२७०)

मराठी: असाध्य मूर्ती तुमच्यात चिन्ह करुन ठेवली बसवाने
इच्छित ब्रम्हांड घनरुप केले बसवाने

कन्नड : निराकार मूर्तिय आकारक्के तंदेयल्ला बसवा
आकार मूर्तिय हृदय कुंजदल्लि
वासगोंडु तोरिदेयल्ला बसवा.......
निन्नाकारव निराकारदल्लि अनुगोळिसबेकेदु
कपिलसिध्द मल्लिकार्जुनन हृदयदल्लि मरेयादेयल्ला बसवा ( सिध्दरामेश्वर व.सं.१८३९)

मराठी: निराकार मूर्ती आकारात आणून दिली तू बसवा
आकार मूर्ती हृदय कुंजात
वासकेलेले दाविले तू बसवा
तुझा आकार निराकारात सिध्द करण्यासाठी
कपिलसिध्द मल्लिाकार्जुनाच्या हृदयात दिसेनासे झालास तू बसवा.

कन्नड: अगलदनंतरद मिगे मिगे ब्रम्हवनु
तेगे तेगेदु तोरिदनु करतळदल्लि
अगणित जगदोळगे अळिदुळिदोळगादनु
सुगुण श्री गुरु बसवनै योगिनाथ

मराठी: विशाल असा संपूर्ण परमात्मा
काढून काढून दाविले करस्थळात,
अगणित अशा जगात मरुन उरलेला असा झाला
सद्गुण संपन्न श्री गुरुबसवण्णा, योगिनाथा.

घटस्थळ ज्ञानी चन्नबसवण्णा आपल्या खालील दोन वचनात याबद्दल मार्मिकपणे सांगतात.

कन्नड: बसवने बिल्लाळागी होसभक्ती अंबागी
एसेदनय्या आलिंगूवनु गुरिमाडी (चन्नबसवण्णा व सं.६५५)

मराठी: बसवच धनुर्धारी होवून नवीन भक्ती रुपी बाणा
सोडला नेम धरुन लिंगास

कन्नड़ : आदि बसवण्णा अनादि लिंगवेंदेबरु,
हुसि, हुसि, ई नुडिय केळलागदु
आदिलिंग, अनादि बसवण्णनु
लिंगवु बसवण्णन उदरदल्लि हुट्टितु
जंगमवु बसवण्णन उदरदल्लि हुट्टितु
प्रसारदवु बसवण्णन अनुकरिसलु आयितु
इंती त्रिविधक्के बसवण्णने कारणनेंदरिदेनय्या
कूडलचन्नसंगमदेवय्या ( चन्नबसवेश्वर व.सं.५ )

मराठी: आदी बसवण्णा अनादी लिंग असे म्हणतात
खोटे खोटे हे बोल ऐकवत नाहीत
आदी लिंग अनादी बसवण्णा
लिंग बसवण्णांच्या उदरात जन्मले
जंगम बसवण्णांच्या उदरात जन्मला
प्रसाद पण बसवण्णांचे अनुकरण करण्यासाठी झाले
असे त्रिविधास बसवण्णांच कारण हे जाणिले
देवा, कूडलचन्नसंगमदेवा.

इष्टलिंगच आदी, बसवण्णा अनादी असे म्हणणाच्या काहींना चन्नबसवण्णा सांगतात की, हे खोटे, बसवण्णा आदी व लिंग त्यानंतर बसवण्णांच्या हृदयमंदिरात रुप पावलेले “लिंग - जंगम-प्रसाद तत्व" असे सांगतात. हेच मरुळ शंकरदेव खालील आपल्या वचनात असे सांगतात -

कन्नड: भक्तिय कुलवनु बसवण्णने बल्लनु
प्रसादद नेलेयनु बसवण्णने बल्लनु
बसवण्णा नडेदुदे मार्ग अखिलगणंगळिगे,
नुडिदुदे वेद महापुरुषरिगे
बसवण्णनु अनादि, लिंगवादी एंदरिदेनागि
बसवण्णन नेनेवुतिर्दैनथ्यो. (संयुक्त व.सं. १११२)

मराठी: भक्तिचे कुळ बसवण्णाच जाणे
प्रसादाचे मर्म बसवण्णांच जाणे
बसवण्णांनी चाललेलाच मार्ग अखिल शरणगणांना
बोललेलेच वेद महापुरुषांना
बसवण्णा अनादि, लिंग आदि असे जाणिल्याने
बसवण्णांचेच स्मरण देवा मला.

“भक्तिचे कुळ प्रसादाचे मर्म, लिंगाचे सत्य दाखविलेले बसवण्णा” असे बोल मरुळ शंकरदेव यांच्या हृदयातून आलेले पाहातो.

समकालीन शरणांचा प्रमाण पूर्वक उल्लेख इथेच थांबवून, नंतरच्या कविचे अभिप्राय पाहू या.

कन्नड: कायदोळु गुरुलिंगजंगम
दायतनवनरियक्ले सुलभो
पायदिदिरिट्ट बाह्यस्थलक्के कुरुहागि
दायदोरी समस्त भक्तनि
कायवनु पावनव माडिद
रायपूर्वाचार्य संगन बसवा शरणार्थी.. (चामरस महाकवी)

मराठी: मानव देहास गुरु -लिंग- जंगम
आचरण करण्यास अत्यंत सोपा उपाय असलेले
प्रतीक तळहातात देवून भक्तांचा
उध्दार केलेला प्रथम आचार्य
संगन बसवास शरणू (नमन)

“मानव देहात असूनच गुरु-लिंग- जंगम यांचे मर्म जाणून अंगिकार कारण्यास अत्यंत सोपा उपाय असलेले प्रतिक (इष्टलिंग) देवून भक्तांचा उध्दार केलेल्या प्रथम आचार्यास नमन" असे म्हणतो चामरस महाकवी. हे शब्द दुस-या कोणासही न म्हणता बसवण्णांनाच उद्देशून चामरस कवीने का म्हणावे ?

सत्य बोलण्यात अग्रगण्य, धीरोदात्त व निश्चयवादी असा सर्वज्ञ कवी अत्यंत स्पष्टपणे सांगतो.

कन्नड: आदि गुरुरायनू भेदिसि लिंगव कोट्टा
मुदेवरोडेय मूजगद कर्तने
आदि गुरु बसवा ! सर्वज्ञा !! (सर्वज्ञ वचन)

मराठी: आदी गुरुराजाने भेदून लिंग दिले
तिन्ही देवांचा मालक तिन्ही जगाचा कर्ता
आदी गुरु बसवा ! सर्वज्ञ

कन्नड़: हरन गुरुवागि ता, मर्त्यलोकक्के बंदु
परशिव लिंगवनु करके तंदु कोट्ट
गुरुवे बसवण्णा ! सर्वज्ञा (सर्वज्ञ वचन)

मराठी: हरच गुरुहोवून तो मर्त्यलोकात येवून
परशिव लिंग तळहातात आणून दिलेले
गुरुच बसवण्णां ! सर्वज्ञ

बहुतेक एवढ्या स्पष्टपणे दुस-या कोणीही प्रतिपादन केले नसेल श्रेष्ठ दर्जाचे अनुभवी मैलार बसवलिंग शरण सांगतात

कन्नड : अरुहिन कुरुहिडिदु अवनि तलवकतरिसिद गणपाल

मराठी: ज्ञानाचे (परमात्याचे) चिन्ह धरुन धर्तिवर अवतरुन आलेला गणपालक

सत्य प्रतिपादनाचे जिवंत उदाहरण झालेले लोकगीत कार या रितीने सागतात -

कन्नड : अरियुदके कुरुहेंदु करलिंग नी कोट्टी
शरणेबु नुडिय छलमाडी॥ शिवमतक्के
गुरुबसवलिंग निज मंत्र॥ (लोकगीत)

मराठी: जाणीव होण्यास चिन्ह म्हणून करलिंग तू दिलेस
शरण बोलण्यास तू छलकेलास शिवमतास
गुरूबसवलिंग हे निज मंत्र ||

वचने एका रितीने आत्मकथेचे (Auto-Biography) तुकडे. एका प्रामणिक साधकाच्या दिनचर्येच्या पानाप्रमाणे आहेत काही तुकडे. गुरु बसवण्णाच आपल्या एका वचनात असे सांगतात.

कन्नड: मुन्निन जन्मदल्लि गुरु -लिंग- जंगम
पूजिसलरियद कारणा
बहु जन्मक्के तंदयिक्किदेयय्या एन्ननु
एनगे गुरुपथव तोरिदवरारु ?
लिंगपथव तोरिदवरारु?
जंगम पथव तोरिदवरारु?
पादोदक प्रसाद तोरिदवरारु?
तोरुव मनवे नीवेदरिदे.
एनगिन्नाव भयविल्ला, कूडलसंगमदेवा (बसव वचन दीप्ती ८२८)

मराठी: मागील जन्मात गुरु - लिंग- जंगम
यांची पूजा न केल्यामुळे
बहु जन्मास आणून ठेवले तु मला देवा,
मला गुरु पथ दाविलेले कोण?
लिंगपथ दाविलेले कोण?
जंगमपथ दाविलेले कोण?
दाविणारे मनच तुम्ही झाल्याकारणे
मला आता कसलीही भिती नाही, कूडलसंगमदेवा.

या वचनात ते आपल्याला कोणी गुरु नसल्याचे सांगून, लिंगपथ जंगममर्म, प्रसादस्थळ दाखविणारे मन त्यांचे झाल्यामुळे ते मनच परमात्म्याच्या वाणीचा प्रतिध्वनी (Echo) म्हणून सांगतात.

“हरप्पा- मोहोनजोदारो संस्कृतिमध्ये इष्टलिंग मिळाले होते, असे काही लोक अभिप्राय व्यक्त करतात. स्वत: श्री महाजगद्गुरु लिंगानंद स्वामीजीनी त्यांच्या लिंग तत्व दर्पण या ग्रंथात लिहिले आहे. कोणत्या तरी ग्रंथात वाचल्याचे आठवून म्हणा किंवा लिंगायत धर्म किती पुरातन आहे या अभिमास्तव अथवा खोलवर वचन साहित्याचे अध्ययन न केल्यामुळे असे लिहिले असणार. 'लिंग -तत्व दर्पण' या ग्रंथामुळेच या विषयाला अत्याधीक प्रचार मिळाला. त्याचप्रमाणे मी पण बराच काळ विश्वास ठेवून होते. पण शरणांची वचने जसजसी जास्त प्रमाणात वाचण्यात येवू लागली नसतसे इष्टलिंगाचे जनक बसवण्णांच होत ही भावना दृढ होत गेली. १९७६ मध्ये दिल्लीचे सुप्रसिध्द वस्तू संग्रहालय पाहिल्यानंतर ही भावना संपूर्णपणे पक्की झाली. हरप्पा - मोहेनजोदारो उत्खननात मिळालेले अवशेष लांछन, मुद्रा वगैरे वस्तू तेथे ठेवण्यात आल्या आहेत. त्यात वृषभमुद्रा - पशुपतिनाथाची चित्रे, स्थावर लिंगास साम्य दाखविणा-या वस्तू प्रमाणे दिसतात. विना इष्टलिंगाचा मागमूस कोठेही मिळत नाही. तेव्हा आमची पूर्वीची समजूत चुकिची असून ती सुधारण्याचा प्रामाणिक पणा दाखवावा लागला.

इष्टलिंगाची कल्पना बसवण्णांचीच देणगी या म्हणण्यास अजून एक वाद मांडता येईल. इष्टलिंगाची आराधना, पूजा आधीच होती असे म्हटल्यास अनेक जन त्याचा भारतभर प्रचार केला असल्यास अशा प्रकारचे इष्टलिंग भारतभर पाहण्यात येत नाहीत ? लिंग कांती करणारा संप्रदाय, कांती असणारे लिंग, गोलाकार असलेले इष्टलिंग कर्नाटक व सीमाभागातच का ? गुरु बसवण्णा आदी प्रमथ होवून त्याचे अनुयायी होवून शरणाचा समुह संचार केलेल्या प्रदेशात मात्र हे इष्टलिंगधारी लोक पाहावयास मिळतात. कर्नाटकाच्या काही भागात, शरणांचा प्रभाव पडलेल्या सीमा भागातील महाराष्ट्र, तेलगंणा, तामिळनाडू येथे मात्र असे लिंगधारी (लिंगायत) लोक पहावयास मिळतात. विना दुस-या कुठल्याही प्रांतात असे इष्टलिंगधारी लोक नाहीत. हा बसवपूर्व धर्मच झाला असल्यास कन्नड संस्कृती नसलेल्या इतर भागात जीवंत पणे जरी नसल्यास तेथे तेथे अवशेषांच्या रुपात तरी (आताची खाने सुमारी लिंगायत धर्मात असल्याप्रमाणे) असावयास पाहिजे होती ना?

एकेका धर्मास एक शास्त्रीय भाषा असते. ती त्याच्या मूळ प्रवादीची भाषा झालेली असते. लिंगायत लोक कोणत्याही राज्यात असू देत, कोणतीही भाषा बोलत असले तरी त्यांच्या घरातील बोली भाषा कन्नडच असते. अलिकडे भाषावार प्रातं रचना झाल्यानंतर त्या त्या राज्याची भाषा शिकून आपली भाषा विसरले असले तरी वेडीवाकडी का होईना कन्नड भाषा बोलतात. मग ते नागपुरातच का असेनात किंवा तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यात का असेनात, असा हा धर्म शुध्द कन्नड धर्मच होय.

इष्टलिंगधारी लिंगायत असणा-या ठिकाणी बसवण्णा, बसवेश्वर (वृषभ) देवालये आहेत. त्यांच्या घरी बसवण्णा चन्नबसवण्णा अशी नांवे आहेत. कोणताही सण साजरा केला नाही तरी बसव जयंती न चुकता साजरा करतात. बसव स्तोत्रे आपल्या प्रार्थना भजनात वापरली आहेत. गुरबसवण्णांच आमचे रक्षक व मोक्षदायक अशी विश्वासाची भावना पण बाळगून आहेत.

बसवण्णांनी इष्टलिंग देवून त्या योगे एक नवीन धर्म दिला असल्याचे सत्य मानावेच लागेल एवढे विपूल असे वचन साहित्य उपलब्ध असून त्याच्या प्रकाशात सत्य झाकून राहणे शक्य नाही. एक पक्ष बांधत असता त्यास एक प्रणाली, संविधान (Constitution) ध्वज, सदस्यत्वाचे विधान पाहिजे. हे सर्व दिलेला कर्ता म्हणजे बसवण्णांच होत या बद्दल संशय बाळगण्याचे कारण नाही.

Reference: SWAYAMKRUT BASAVANNA - A prose composition in kannadda by Her Holiness Maha Jagadguru Dr. Mata Mahadevi, translated in Marathi by Mallinath Ainapure.
Pub: Vishwakalyan Mission, Basav Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block, BANGALORE - 560010.

सूचीत परत
Previous धर्म गुरु बसव पूजा बसवा पोस्टल स्टॅम्पवर आणि नाण्यावर Next