Previous बसवण्णांचे दीक्षा गुरु कोण ईष्टलिंग दाता विश्वगुरु बसवण्णा Next

धर्म गुरु बसव पूजा

✍ पूज्य श्रीमन् निरंजन महा जगदगुरु लिंगानंद स्वामीजी
आणि महा जगद्गुरु डा. माते महादेवि

*

धर्म गुरु बसव पूजा

लिंगायत समाजाने एक फार मोठी चूक केली आहे. ती म्हणजे आपल्या धर्म गुरू बसवेश्रांना योग्यरीतीने ओळखून आदराने पूजले नाही इस्लाम धर्म एकाच देवाला मानून ठामपणे निराकार उपासना करत असला तरी आपले धर्म गुरू हजरत महंमद पैगंबरानी सांगितलेले विसरला नाही. त्यांच्या स्थानाला धक्का लावला नाही.

खिस्ती सुध्दा एकदेवोपासना मानतात पण वास्तवात आचरणात एक गुरू उपासना करतात. म्हणजे येशु ख्रिस्ताची आराधना व स्तुती करतात. लिंगायतांनी हे दोन्ही न करता सांप्रदायीक हिंदू समाजाचे सर्व लोपदोष घेऊन धर्मगुरू बसवेश्वरांनाच विसरले. एकदेवोपासना लिंगनिष्ठा त्यांच्यात वाढली नाही. याला प्रमुख कारण म्हणजे त्यांनी आपले धर्मगुरू व समकालीन शरणांच्या संदेशाला सप्रमाण मानले नाही. आणखी कांहीजण मूर्ती पूजा करू नये ही गोष्ट अर्धवट समजून घेऊन गुरू बसवेश्रांना सोडून सर्व इतर विग्रह पौराणिक देवतांची पूजा करू लागले.

या समाजाची दुर्गती इथपर्यंत पोचली आहे की, नवग्रहपूजा सत्यनारायण व्रत, शनी पुराण पारायण देवीपुराण सुद्धा करतात. अनेक मठ पिठाधीश, आपापल्या मठस्थापकांचा प्रचार व थडगे निर्माण करण्यात मग्न होवून स्थानिक मंथ वाढू लागलेत. धर्मगुरु बसवेश्वरांचे महत्व, प्रचार न करता, स्वत:चा प्रचार करुन घेतात. हे कसे होते म्हणजे, झाडाच्या बुंध्यांला पाणी घालण्या ऐवजी फांद्यांवर पाणी शिंपडण्याासारखे आहे. एक धर्म व समाजाच्या हिताचे पाहिल्यास स्थानिक उपपंथाच्या पोषाणापेक्षा अखंड समाज्याचे हित महत्वाचे आहे हे विसरु नये.

१. बसवमूर्तीच ध्यानास मूळ
बसव किर्तीच ज्ञानास मूळ
बसव बसवा म्हणणेच भक्ती पहा
कपिल सिद्ध मल्लिकार्जुना
श्री सिध्दरामेश्वर

२. सुख एक कोटी आल्यास बसवेश्वरांनाच स्मरायचे
दुःख एक कोटी आल्यास बसवेश्वरांनाच स्मरायचे
बसवश्वराचे स्मरणच मला लिगार्चन


या वचनात शरण मडीवाळ माचव्या तेच विचार सांगून बसवेश्वरांची आठवणच खरी पूजा म्हटले आहे. याला समजून बसवेश्वरांची पूजा करणे अत्याश्यक आहे असे वाटते. शरणांच्या अभिप्रायानुसार गुरु, लिंग, जंगम हे पूजे योग्य आहेत. इथे गुरु म्हणजे व्यकतिगत गुरु म्हणून अर्थ न घेता, धर्मगुरु बसवेश्वर म्हणून समजले पाहीजे. लिंग म्हणजे विश्वाच्या आकारात असलेले विश्वात्म्याचे चिन्ह इष्टलिंग, जंगम म्हणजे असंख्यात शरण गण, महात्मा, शयोगी त्यागी असा समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने गुरू बसवेश्वरांची पूजा अनिवार्य व आद्य कर्तव्य आहे. बसवप्रणीत लिंगायत धर्मात दिक्षा गुरु, शिक्षा गुरु व मोक्ष गुरु अशी परिकल्पना आहे. दिक्षागुरु म्हणजे भक्ताला भक्त बनवून मंत्रोपदेश, अनुग्रह केलेली व्यक्ती. शिक्षा गुरु म्हणजे धर्माचे खरे स्व्रुप समजून देऊन परमात्मा, आत्मायोग, साधना वगैरे पटवून देणारी व्यक्ती, दिक्षागुरु व दिक्षागुरु वेगवेगळे असू शकतात. अथवा एकच व्यक्ती असू शकते, काही गुरु ज्ञानी नसले तरी शुद्ध अंत:करणाने शिष्यांना अनुग्रह करुन दिव्य पथ दाखवितात, पण त्यांना ज्यास्त उपदेश देणे शक्य असते, आणखी काही गुरु स्वत:च दिक्षा देऊन शिष्यांना दिक्षा गुरु व शिक्षा गुरु दोन्ही बनतात.

आता मोक्ष गुरु म्हणजे मंत्रपुरुष धर्मगुरु परमात्मा मुक्तीदाता झाल्यास धर्मस्थापकांनी मोक्षदायक गुरु म्हंटले जाते. ख्रिस्ती धर्माना येशू , बौद्ध धर्माला बुद्ध लिंगायत धर्माला श्री गुरु बसवेश्वर आद्य झाल्यामुळे त्यांनी त्या धर्मानुयायींचे मोक्षगुरु होतात. अक्का महादेवींच्या एका वचनात असे म्हटले आहे की,

अंधारात आरसा पाहून त्रासले मी
बसवेश्वरांच्या प्रकाशा शिवाय
मी कशी पाहीन सांगा ? चन्नमल्लिकार्जुना,


मोक्षगुरु बसवेश्वरांच्या कृपेतूनच, परमात्म्याचे अनुग्रह शक्य आहे, म्हणून आका महादेवीनी स्पष्टपणे सांगितले आहे. असे आध्यात्मिक साधना व समाजसंघटना दोन्ही दृष्टीने गुरु बसवेश्वरांची पूजा आवश्यक, अनिवार्य आहे व आमचे आद्य कर्तव्य आहे.

Reference: "Ivalasa Jhala Paramatma" -A prose written by Maha Jagadguru Lingananda Swamiji & Maha Jagadguru Mate Mahadevi.
Published by Suyidhana Sugrantha Maale, Vishwakalyan Mission, Basava Mantap, 2035, 20th Main, Rajajinagar, 2nd Block Bangalore - 560 010
अनुवाद: शरण श्री गुलाब हसन नदाफ.

*
सूचीत परत
Previous बसवण्णांचे दीक्षा गुरु कोण ईष्टलिंग दाता विश्वगुरु बसवण्णा Next