Previous पूज्य श्री महाजगद्गुरु माते महादेवी लिंगायत वीरशैव वेगवेगळे (Lingayat Veershaiva are different) Next

बसवधर्म पीठ (रजि.) महामने महामठा, शरण लोक, कुडलसंगम

संक्षिप्त परिचय बसव धर्माचे महाजगदगुरु पीठ एक आदर्श संस्था समाज उत्तम रितीने पुढे चालवून नेण्यामध्ये महत्त्वाचे पात्र स्विकारून ते निभावून नेत आहे. विश्वधर्म प्रवचनांचे कार्यक्रम कर्नाटक तसेच सीमा भागातील प्रांतात करून, तसेच बसव तत्व शिक्षणाचेशिबीर घेवून, लोकांना प्रायोगिक शिक्षण दिले जाते. धर्मक्षेत्र कुडलसंगम येथील बसवधर्म पीठाच्या आवारात यात्रेकरूंना राहण्यासाठी सर्व सोईंनी सुसज्ज अशा खोल्या बांधून सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हेतर विशेष पूजा व अन्नदासोहाची पण व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी जानेवारी ११ ते १४ या काळात 'शरण मेळावा' या नावाने बसव तत्वाच्या अनुयायांचा समावेश कुडलसंगम येथे व तसेच मे १, २, ३ रोजी 'कल्याण पर्व' या नावाने शरण समावेश बसवकल्याण (जि. बिदर कर्नाटक) येथे भरविला जातो. त्याचप्रमाणे मार्च २००६ पासून अल्लमप्रभुगिरी (अल्लमप्रभू डोंगर, आळते गावाजवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर महाराष्ट्र) येथे ‘लिंगायत गण मेळावा' या नावाने लिंगायतांचा तीन दिवसाचा मेळावा प्रत्येक वर्षी चैत्रशुध्द प्रतिपदेस जोडून घेण्यात येतो. व त्या योगे लक्षावधी बसव धर्मीयांना बंधुत्व भावनेने जोडण्यात येते.

बसवधर्म म्हणजेच लिंगायत धर्माच्या प्रचारासाठी साहित्य, पुस्तके, | भावचित्रे, गाण्यांच्या कॅसेटस्, व्हीडीओ व ऑडीओ सीडी तयार करून मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा धर्म संस्थेला उधार हस्ते धनसहाय्य करून सुक्षेत्रांची व बसवधर्म साहित्य, संस्कृती व परंपरा वगैरेंची अभिवृध्दी करणे हे सर्व बसवानुयायींचे कर्तव्य समजावे.

विश्वगुरू बसवण्णांचा १०८ फूट उंचीचा भव्य पुतळा.

बीदर जिल्ह्यातील बसवकल्याण हा १२व्या शतकात क्रांती पुरुष बसवण्णांच्या नेतृत्वाने असंख्य शरणांना आकर्षिलेली शरणभूमी, येथे गुरुबसवण्णांच्या १०८ फूट उंचीचा भव्य पुतळा आणि अनेक शरणांच्या मुर्त्या व स्मारके निर्माण केले.
या विकासासाठी शरणांनी उदार हस्त दान करा..

1). आपल्या शक्तीनुसार भक्तीने कितीही देणगी दिल्यास ती आम्ही आनंदाने स्वीकारतो.
2) रुपये ११,०००/- व अधीक देणान्यांची नांवे (Donar Board) वर लिहिण्यात येतील.
3) रुपये २५,०००/- व अधीक देणा-यांची नावे सामुदायिकपणे शिला फलकावर कोरण्यात येतील.
4) रुपये ५०,०००/- व अधिक देणा-यांची नावे ग्रानाईट शिलावर कोरून पीठाच्या तीन भिंतीवर विशिष्ट ठिकाणी लावण्यात येतील.
5) रुपये १,००,०००/- व अधीक देणान्यांची नावे ग्रानाईट शिलावर कोरून पुतळ्याच्या पीठाच्या तीन भिंतीवर विशिष्ठ ठिकाणी आतील म्युझियममध्ये लावण्यात येवून त्यांचा एक फोटो पण प्रदर्शनात लावला जाईल.
बसव धर्म पीठ (रजि.) बसव महामने, बसवकल्याण - ५८५३२७, जि. बीदर

*
Previous पूज्य श्री महाजगद्गुरु माते महादेवी लिंगायत वीरशैव वेगवेगळे (Lingayat Veershaiva are different) Next